निबंध


माझा हा मराठी ब्लॉग आणि त्यावरील लिखाण बघुन माझ्या एका परीचीतांनी मला एक नविन कामगीरी सोपावली आहे, निबंध लिहीण्याची. त्याचा मुलगा दहावीच्या परीक्षेला बसत आहे आणि त्यासाठी त्याला मराठी निबंध हवे आहेत. त्यांनी मला परीक्षेत येऊ शकतील असे अपेक्षीत १५-२० निबंध लिहायला दिले आहेत. यापुर्वीही शाळेत सांगीतले म्हणुन काही निबंध मी लिहुन दिलेले आहेत.

मग विचार केला की हे निबंध जर ब्लॉग वर उपलब्ध करुन दिले तर कदाचीत इतर मुलांनाही थोड्याफार प्रमाणात मदत मिळु शकेल म्हणुन हा प्रपंच.

निबंधामध्ये काही संदर्भ हे महाजालावर उपलब्ध असणाऱ्या माहीतीच्या आधारे घेतलेले आहेत त्याचे राईट्स ज्या त्या लेखकाला साभार.

पुढील विषयांवर टिचकी मारुन तुम्ही ते निबंध वाचु शकता किंवा संगणकावर उतरवुन घेऊ शकता. निबंधाची लांबी जास्तीत जास्ती हस्ताक्षरात एक फुल-स्केप इतकी हवी असल्याने थोडक्यात लिहीले आहेत. त्यामुळे सर्व विषय निबंधाच्याच रुपात असतीलच असे नाही. काही ठिकाणी प्रमुख मुद्दे थोडेसे विस्तार करुन लिहीलेले आहेत. आवश्यकता भासल्यास आपण ते मुद्दे वाढवुन निबंधाची लांबी वाढवु शकता.

पुढील काही काळात अजुनही अनेक निबंध इथे जोडण्यात येतील, तेंव्हा या पानाला पुन्हा पुन्हा भेट देत रहा.

हे निबंध आपल्याला कोणत्याही प्रकारे उपयोगी पडल्यास प्रतिक्रिया जरुर कळवा.

त्यापुर्वी, “विक्रांत देशमुख” याच्या सौजन्याने काही पाट्या -

१) ’अनिकेत समुद्र’ यांचे ’निबंधालय’ – वेळ सकाळी ८ ते १०. रात्री ९ ते ११. (टीप – उरलेल्या वेळेत फोनवर negotiate करण्याचा आगाऊपणा करू नये)
२) येथे सर्व प्रकारचे निबंध (रास्त भावात) लिहून मिळतील (/In bigger Fonts/)असे समजू नये.
३) निबंधाचा दर त्याचा विषय, आशय आणि त्यातील काव्यात्मकता यावर अवलंबून राहिल.
४)निबंध नेण्यापुर्वी तपासून पहावा. एकदा नेलेला निबंध परत edit करून मिळणार नाही.
५)शुद्धलेखनाच्या अचुकतेचे वेगळे पैसे पडतील
६) एकच निबंध वेगवेगळ्या शाळेत जाऊ शकतो. ग्राहकांचे Uniquenessचे हट्ट पुरवले जाणार नाहीत.
७) निबंधातील काव्यपंक्तीच्या निवडीचे आणि वापराचे सर्वाधिकार लेखकाकडे. बापट, गदीमा, कुसुमाग्रज, ज्ञानेश्वर, तुकाराम, बोरकर अश्या मान्यवर कवींच्या अवतरणांना extra charge पडेल.
८) आमच्या येथे One by Two निबंधांची सोय नाही याची नोंद घ्यावी.
९) ग्राहकांनी विकत घेतलेले निबंध आपापल्या जबाबदारीवर शाळेत सादर करावेत. शिक्षकांच्या शंकांना आणि आक्षेपांना उत्तरे दिली जाणार नाहीत.
१०) Schemes Available – Family, Elite, Standard, Scholar, Literary, Multi-School, Multi-Standard, Rebell,

25 thoughts on “निबंध

  1. तुझा खरच हा नवीन प्रोजेक्ट आहे :P की कंसेप्ट आहे ???

    बाकी सर्व निबंध सहीच.. ;) खास करून फळ्याचे आत्मवृत्त, शाळेतील शिपायाचे आत्मवृत्त आणि वाड्याचे आत्मवृत्त भावले.

    सहीच आहेस तू… अजून काही विषय देऊ का … नवीन प्रोजेक्ट म्हणुन…. :D

    • याचे श्रेय मी टि.व्ही. वरील रटाळ, कंटाळवाण्या मालीकांना देतो. संध्याकाळी घरातले मालीका बघण्यात इतके गुंग झालेले असतात की इतर वेळा मी संगणकावर बसताच शिव्या घालणारे ह्या वेळेस काहीच बोलत नाहीत, त्यामुळे मग मला वेळच वेळ मिळतो.

  2. navneet cha wasa chaalwtaay raaw!
    changal aahe. aathwan aali majhya dahawichi.
    Fakt ekach gosht tya parichitanna nakki kalaw majhyakadun. ‘Widyarthi ki pariksharthi’ ha waad juna jhala aata. tyabaddal kahi bolat nahi. pan yatun kharach kuthala aadarsh ghalun det aahet te aaplya mulala? bordat yayla wattel te?

    Tyancha mulaga hushar asel, mehnati asel tar tyach yash fakt tyachach raahu de mhanaw. tyachya aanadat bhesal dekhil karu naka aani tyacahya mehnatichi thatta howun dewoo naka.

    • चांगला का केला कि त्याचाह श्रेया नक्कीच मिलता भागा निबंध लिहाना आणि लिहित राहणं हि खरच चांगली गोष्ट आहे मला पण खुपं आवडतात निभंद लिहायला पण आता मारतही मलिकन मधून पाहिजे तेवढा वेळ मिओलात नाही ना!!!

  3. तुमची निबंधालायाची शाळा मला भावली बर का! आजचे चित्र बघून ह्याची खरोखर गरज आहे असे मला तरी वाटते. तुम्ही चं केलय. पण मुद्दा हा आहे कि पालक किती मनावरघेतात.

    • का हो सर असं बदनाम करताय? पाहीजे तर सगळा ब्लॉग निट बघा.. मला दर वेळेस प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर द्यायला नाही जमत, जेंव्हा वेळ असतो तेंव्हा समोर जी कमेंट असते त्याला देतो उत्तर.. कृपया गैरसमज टाळा. ब्लॉगवर येणारी प्रत्येक प्रतीक्रिया मला मोलाची आहे मित्रा..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s