Bokeh


नाव वाचुन विचारात पडलात ना? हा काय प्रकार आहे? फोटोग्राफीमध्ये तुम्ही अगदी मुरलेले खेळाडु असाल तर कदाचीत हा शब्द तुमच्या अंगवळणी पडला असेल, पण इतरांसाठी, ’बोक्या’ शब्दाशी सार्धम्य दाखवणारा शब्द, एवढीच त्याची महती.

’व्यक्तीचित्र’ ह्या प्रकारातील फोटो काढताना त्या व्यक्तीच्या मागील पार्श्वभुमी ही शक्यतो धुसर येईल असा प्रयत्न असतो जेणे करुन ती व्यक्ती फोटोमध्ये उठुन दिसते. ह्यालाच फोटोग्राफीमध्ये ’डेफ्ट ऑफ फिल्ड’ असे म्हणतात. ’बोकेह’ ही त्याचीच पुढची पायरी. ह्यामध्ये साधारणपणे एखाद्या छोट्याश्या प्रकाश स्त्रोताला ’आऊट-ऑफ-फोकस’ अश्या प्रकारे करतात की तोच प्रकाश डोळ्याला सुखावह वाटतो. ह्या विभागातील फोटो बोकेह वापरूनच केलेले आहेत. ते कसे काढायचे ह्याबद्दल थोडी माहिती इथे जोडत आहे.

Bokeh

खरी गंमत तर पुढे आहे. ह्या दिव्यांनाच आपण वेगवेगळे आकार देऊ शकतो, फोटो काढतानाच!! तुमच्या लेन्स वर पुढच्या बाजुस चित्रात दाखवले आहे त्याप्रमाणे कागदाचा एक गोल कापुन चिकटवुन टाका आणि त्या कागदावर तुम्हाला जो आकार पाहीजे तस्सा कापुन घ्या. त्यानंतर पुढील चित्रात दाखवला आहे त्याप्रमाणे सर्व यंत्रणा सज्ज करा.

Bokeh Setup


म्हणजे एका ठिकाणी बारीक दिव्यांची माळ टांगुन ठेवा. दिव्यांच्या माळेच्या मागे आणि भिंतीच्या अलीकडे थोडी फार जागा राहील ह्याची खात्री करा (डेफ्ट-ऑफ-फिल्ड साठी). त्यानंतर त्या माळांपासुन बरेच पुढे, शक्य तितक्या दुर तुमचा ऑबजेक्ट, म्हणजे ज्या वस्तुचा फोटो काढायचा आहे ती वस्तु ठेवा. त्या वस्तु च्या शेजारीच एखादा झिरो शक्तीचा दिवा असलेला नाईट-लॅम्प लावा. त्याचा योग्य प्रकारे प्रकाश पडेल अश्या अंतरावर तुमचा ऑबजेक्ट ठेवा. माझ्या उदाहरणात एक खेळण्यातील कार वापरली आहे.

ऑबजेक्टपासुन थोडे पुढे तुमचा कॅमेरा ठेवा. हे अंतर किती असावे हे तुम्ही कोणती लेन्स वापरता आहात यावर अवलंबुन असते. मी कॅननची ५०एम.एम. एफ२.८ प्राईम लेन्स वापरली असल्याने अंतर फार नसले तरी चालले. तुम्ही टेलीफोटो वापरत असाल तर अंतर जास्ती लागेल. थोडे फार फोटो काढल्यावर हे अंतर किती असावे ह्याचा अंदाज तुम्हाला येईल.

एकदा का सगळी जुळवाजुळव झाली की खोलीतील सर्व दिवे मालवुन टाका. आता फक्त तुमची दिव्यांची माळ आणि तो नाईट-लॅम्प एवढेच चालु हवे. हे सर्व झाले की तुमच्या कॅमेराचा मोड ऍपेरटअर-प्रायोरीटी (AV) किंवा शटर-प्रायोरीटी (TV) वर ठेवा. एकुण प्रकाशाचा अंदाज घेउन आय.एस.ओ आणि एस्क्पोजरचे नंबर सेट करा आणि मग शटर एकवार अर्धे दाबुन फोटो कसा येतो आहे त्याचा अंदाज घ्या. योग्य वाटला की करा क्लिक-क्लिकाट :-) .

ऑटो फोकस मध्ये निट जमत नसल्यास एकवार फोकस सेट करुन झाल्यावर लेन्स वरील बटण वापरुन फोकस मॅन्युअलला सेट करा म्हणजे थोडीफार हालचाल झाली तरी फारसा फरक पडणार नाही.

हे सर्व जमल्यावर पुढील प्रकारचा फोटो मी काढला आहे. ह्यामध्ये कागदावर एका चांदणीची रचना मी केली असल्याने ’बोकेह’ चांदण्यांचा आभास निर्माण करत आहेत.

Sample Photo clicked in the above setup


@रत्नसागर रिसॉर्ट, रत्नागिरी

Ojas, our elder son

Dedicated to Sachin Pilgaokar's new marathi movie ‘शर्यत’

We are Family

Cup of lights

3 thoughts on “Bokeh

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s