“पुढे काय होणार?” या विचारांनीच मला कसे तरी होत होते. अर्थात वाईटात वाईट नकार होता आणि त्याचीच मला खात्री होती. किंबहुना त्यासाठी मी तयार होतो. केवळ ती गोष्ट मनात न ठेवता, मन मोकळ करुन तिला सांगुन टाकायचे हाच एक उद्देश होता.
ठरल्यावेळेला मी तिकडे पोहोचलो. थोड्याच वेळात आमच्या बाईसाहेब पण आल्याच. काही वेळ उगाचच इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. घड्याळाचे काटे पुढे-पुढे जात होते. शेवटी अधीक वेळ घालवण्यात अर्थ नाही म्हणुन मी सरळ विषयाला हात घालायचे ठरवले.
प्रथम मी तिला विचारले, “तुला माहित आहे का मी तुला कशाला इकडे बोलावले?”
ती हसली, जणु काही तिला माहीत होते कशाला ते! पण मला ‘नाही’ म्हणाली. [काय करावं.. सारखचं नाही]
मी: “ठिक तर, मग मी जे काही बोलेन, ते निट आधी ऐकुन घे आणी नंतर बोल.. आणी हो!!.. अजिबात हसायचे नाही.”..
तीः “ठिक आहे”.
मग प्रथम मी तिला माझ्याबद्दल थोडक्यात सांगीतले, माझे पालक, नातेवाईक, माझी शैक्षणीक वाटचाल, माझा स्वभाव, आवडी-निवडी, माझे भविष्याबाबतचे विचार वगैरे. मी तिला माझ्या जिवनात येउन गेलेल्या माझ्या प्रेमप्रकरणांबद्दल पण सांगीतले, हो उगाच नको अंधारात ठेवायला. तिने सगळे हे शांत पणे ऐकुन घेतले. त्यामुळे माझा आत्मविश्वास थोडा वाढला आणी मला जरा मोकळे-मोकळे वाटायला लागले. मग मी तिला माझे जोडीदाराबद्दल चे मत सांगीतले आणी म्हणालो “.. थोडक्यात ती तुझ्यासारखी असावी.” ती परत हसली. [मस्त रे !! छान टाकलास.. पोरगी हसली बघ!] मग एकदमच विचारले “माझ्याशी लग्न करशील??, ‘मला तु खुsssप आवडतेस’ असे मी म्हणणार नाही कारण ‘खुप’ शब्दाची व्याप्ती कमीच आहे, तु मला त्यापेक्षाही कितीतरी अधीक आवडतेस.”
अवकाशात शांतता कशी भासत असेल ते मी अनुभवले. मी हे सर्व खाली मान घालुनच बोलत होतो. माझे कान तिचे बोलणे ऐकायला असुसले होते.. पण ती काहीच बोलली नाही. मी वर पाहिले, ती माझ्याकडेच बघत होती. तिच्या मनात काय चालले असेल त्याची मला काडीचीही कल्पना येत नव्हती.
शेवटी मी म्हणालो..”तुला काही बोलायचे नाहीये का?”
तीः “तुच म्हणालास ना मधे काही बोलु नकोस!! तुझे झाले की सांग मग बोलते.”
मीः “बर.. मला माहिती आहे मी तुझ्याइतका चांगला नाही दिसायला, माझे मित्र म्हणतात त्याप्रमाणे ‘लंगुर के मुहं मे अंगुर’ असेल ही कदाचीत पण आयुष्याच्या शेवटा पर्यंत हाच चेहरा साथ देत नाही, साथ असते ते आपले मन आणी मनात असणारे प्रेम. मला माहीत आहे की तु मला ‘नाहीच’ म्हणशील पण माझे मन मला स्वस्थ बसुन देत नाही. तुच सांग त्याला समजाऊन. झाले माझे बोलुन आता बोल.”
तीः “तु आत्ता जे काही बोललास ते मला माहीत होते..!!!!! अशा गोष्टी लपुन रहात नाहीस. मला कुठुन तरी हे कळलेच. सर्वात प्रथम तुझ्याकडुनच कळले असते, तर मला आनंदच झाला असता, असो. दुसरी गोष्ट, हे लंगुर वगैरे तु जे काही बोललास ते मला आजिबात आवडले नाही. तु खरंच खुप चांगला आहेस, खरं तर मीच तुला योग्य नाहीये. मला पण तु आवडतोस, पण माझे काही प्रॉब्लेम्स आहेत. मला शक्य असते तर मी तुला नक्की हो म्हणले असते. पण कदाचित हे शक्य नाहीये.”
त्यानंतर ही ती बरेच काही बोलली पण माझे लक्षच नव्हते. माझा चेहरा खुप पडला होता. आयुष्यात काही शिल्लकच नाहीये असे वाटु लागले.
घरी जाताना मला म्हणाली “सावकाश जा. आणी घरी पोहोचल्यावर फोन कर.” मला घरी जायचा खुप कंटाळा आला होता, म्हणुन मी मित्राकडे गेलो आणी तेथुन घरी उशीराच गेलो. घरी गेल्यावर कळले बाईसाहेबांचा फोन येउन गेला. म्हणुन फोन केला तर मला खुप ओरडली.. ‘कुठे गेला होतास, फोन का नाही केलास वगैरे’.
दुसऱ्या दिवशी पण कॉलेज ला जायचा खुप कंटाळा आला होता, जरा ताप पण वाटत होता, म्हणुन उशीराच उठलो. जरा उशीराच जायचे ठरवुन आवरले, तेवढ्यात तिचा फोन आला..”कॉलेजला नाही जायचे का? नापास होयचेय?”
मग मी म्हणालो..”नाही.. बर वाटत नाहीये म्हणुन जरा उशीराच जाणार आहे.” मग जरा गप्पा मारुन फोन ठेवुन दिला. मग आंघोळ वगैरे आटोपली, आवरले, मेल वगैरे चेक केली तेवढ्यात बेल वाजली. सकाळी सकाळी कोण आले म्हणुन दार उघडले आणी पाहतो तर काय.. दारात पल्लवी उभी.. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिला बघीतले आणी ताप-बिप सगळे गेले, एकदम प्रसन्न वाटु लागले. साक्षात आमच्या बाईसाहेब आमच्या तब्येतीची चौकशी करायला आमच्या घरी दाखल झाल्या होत्या. मला काय करु आणी काय नको असे झाले. मग मी स्वयंपाक-घरात धाव घेतली, म्हणलं.. निदान सरबत तरी करावे, पण कुठे काही सापडतच नव्हते. माझी शोधाशोध चालुच होती, नुसते भांड्यांचेच आवाज येत होते. शेवटी तिच आत आली आणी सगळे शोधुन सरबत बनवले सुध्दा. तिला स्वयंपाक-घरात काम करताना बघुन मला उगाचच मी नवरा आणी ति माझी बायको वाटु लागले होते. कालच्या नकारानंतर सगळं मनातुन काढुन टाकुन एक निखळ मैत्रीच ठेवायच्या प्रयत्नात असणाऱ्या मनात परत विचारांनी गर्दी केली.
असो.. नंतर माझे आयुष्य पुर्वपदावर आले. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ मी जेव्हा शक्य होइल आणी जितका वेळ शक्य होइल तितक्या तिच्याशी गप्पा मारायचो, रोज रात्री फोन असायचा. आधी फक्त मीच करायचो, नंतर नंतर ती पण करायला लागली. या काळामध्ये मला अजुन बऱ्याच नविन गोष्टी कळल्या, ती डावखुरी आहे, हे कळल्यावर तर मला कोण आनंद झाला, का-कुणास ठाउक पण मला डावखुरी लोक फार आवडायची. ती दर गुरुवारी दत्ताच्या देवळात जाते, ३ वर्षापासुन जपानी भाषा शिकतेय, काळा रंग आवडत नाही [..पण मला फार आवडतो], भुताची फार भिती वाटते [मला मज्जा], चायनीज आवडते [मला ठिक वाटते] , पावसात भिजायला खुप आवडते [..मला आजिबात आवडत नाही] आणी बरेच काही. कधी सरळ सरळ तर कधी शब्दाच्या आडुन मी तिला मागणी घालुन पाहीले पण दर वेळी मला नकारच मिळाला. एक गोष्ट मात्र होती, ती मला खुप “मिस..” करायची, एक दिवस मी तिला फोन नाही केला तर तिने लगेच केलाच समजा, एक दिवस कॉलेज मधे नाही गेलो, तर दुपारी ती घरी येयची मला भेटायला. कॉलेज मधे आम्ही तासं-तास गप्पा मारत बसायचो. बऱ्याच वेळेला, एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरुन लहान-मुलासारखी मारामारी पण करायचो. एकदा असेच मारामारी करताना, तिच्या गाडीच्या कि-चेन ला लावलेले घुंगरू माझ्या हाताला लागले आणी थाडे रक्त आले होते, तिने लगेच मेडिकल दुकानातुन बॅड-एड आणले.
बारीक-सारीक गोष्टी होत्या पण तिच्या वागण्यातला बदल मला जाणवु लागला होता. वाटलं, कदाचीत तीचा विचार बदलला असेल, म्हणुन एकदा परत विचारलेही, “पल्लवी, खरंच शक्य नाही आहे का?” पण ती नाहीच म्हणाली होती.
मी खुपच वैतागलो होतो. काय चालु आहे काही कळतच नव्हते. हा अक्षरशः माझा मानसिक छळ चालु होता. मी तिला सारखे म्हणायचो “हो म्हण, हो म्हण, विचार कर”.. पण ती नाही म्हणायची. माझं मन सारख मला सांगत होतं की तिला नक्कीच तु आवडतोस, पण मग हा नकार का? कशासाठी?
आणी तो दिवस उजाडला. सकाळी कॅन्टीन मधे तिच्या वर्गातल्या ग्रुप बरोबर गप्पा मारत बसलो होतो. तिचा एक वर्ग मित्र होता- अभिजीत, त्याला माझ्या वर्गातली एक मुलगी जाम आवडायची-मानसी.. तो मला विचारत होता, ‘काय करु? काय बोलु? तु मदत करशील का??’
पल्लवी पण तिथेच होती. मी आधीच वैतागलेला होतो.. विचार करुन डोके बधीर झाले होते त्यात तो असे प्रश्न विचारत होता ज्याची उत्तरे मीच शोधत होतो. मी त्याला म्हणले, “अरे नको मुलींच्या नादी लागुस, वैतागशील. एकटा आहेस तेच बरे आहे रे बाबा!! बर तु तिला विचारलेस आणी ति हो म्हणली तरी चांगले, नाही म्हणाली तरी चांगले, पण नाही म्हणायचे, आणी ‘तुझ्याशिवाय जगणे अशक्य’ असे वागायचे हे फार वाईट. डोक्याचा नुसता भुगा होतो” आणी मी असे बरेच काही टोमणे मारत होतो.
पल्लवी ने लगेच त्याला अक्षेप घेतला, “ए काही नको सांगुस त्याला, मुली अश्या वगैरे अज्जीबात नसतात!”
मी: “अश्याच असतात. माझ्यासमोरच एक उदाहरण आहे ना!. ‘हो’ म्हणायचे नाही, आणि कारणही सांगायचे नाही, काय अर्थ आहे का याला?”
जाम उखडली ती.. मला म्हणे, ‘फार झाली तुझी नाटकं, तुझी वही दे एक मिनीट इकडे!’
मी: ‘कशाला? मला नाही द्यायची’
पण तोपर्यंत तिने वही हिसकावुन पण घेतली होती. मग तिने काही तरी त्यात लिहीले, वही माझ्या बॅगेत कोंबली आणी ती तेथुन पळुन गेल्या.
मी घाई-घाईने वही उघडली.. तर त्यात जपानी भाषेत काही तरी लिहीले होते.. ते काय होते ते मला कळले नाही. “एई अनाता..” असले काहीतरी अगम्य भाषेत लिहीले होते.. मला एकदम तो झपाटलेला सिनेमा आठवला.. तात्या विंचुः “ओम भग भुगे..भग्नी भागोदरी..ओम फट स्वाः” कदाचीत ती भाषा मला कळाली नसेल, पण ही इतका पण बुद्दु नाही की कुणाचा चेहरा वाचु शकत नाही तिचा चेहरा मला खुप काही सांगुन गेला.
मी पण लगेच कॅन्टिन मधुन सटकलो पण ती कुठेच दिसली नाही. मग मी सरळ आणि
कॉलेजच्या संगणक लॅबमध्येच घुसलो आणि गुगल महाराजांची मदत घेतली आणि संगणकाच्या पडद्यावर अक्षरं उमटली..”I love you” in japanese.. मी स्तब्धच झालो होतो. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, फुल्ल फ्लो ए/सी चालु असताना कानशील गरमं झाली होती. जे मी ऐकायला तरसलो होतो तेच समोर दिसत होते. खुप जोर जोरात ओरडावे, किंचाळावे असे वाटत होते. तेवढ्यात तिचा मोबाइल वर फोन आला, मला म्हणाली “कळले का काय ते?, सापडते आहे का गुगल वर?” मी इकडे तिकडे बघीतले तेंव्हा ती बाहेरुनच बोलत होती. मी लगेच बाहेर पडलो.
तीः “एवढा काही तु बुद्दु नाहीयेस न कळायला.. मध्ये शिकत होतास ना जॅपनीज मग तुला येत असेल की. नसेल येत तर बस्स शोधत!”
मी: “जगातल्या कुठल्याही भाषेत तु म्हणाली असतीस तरी मला कळले असते, after all
दिल की बात दिल ही समझता है!”
दुपारी सिनेमाला जाउ म्हणाली, पण खरं सांगु का? मी कसल्याच मनस्थीतीत नव्हतो, मला फक्त घरी जाउन एक शांत झोप हवी होती.
यथावकाश मला तिच्याकडुन कळाले की पहिला ‘नकार’ हा खरंच नकार होता. का तर म्हणे, मी कित्ती हुश्शार? कॉलेज मध्ये पहीला वगैरे येणारा आणि ती.. ‘सदानकदा नापास होणारी’
काय करावं या मुलींच कश्याचा संबंध कुठे जोडतील. आधी सांगीतले असते तर १० वेळा नापास व्हायला तयार होतो मी.
असो.. पुढे आमची मैत्री बहरत गेली आणि तीलाच समझले नाही ती कधी माझ्यावर प्रेम करायला लागली. पण तिने मला सांगीतले नाही कारण ती माझ्या जन्मदिनी म्हणजे २,ऑगस्ट ला सांगणार होती.. ‘अ परफेक्ट बर्थडे गिफ़्ट’ thats what she had thought. पण त्यादिवशी कॅन्टीनमध्ये माझे टोमटे तिला सहन झाले नाहीत आणि न रहावुन सांगुन बसली.. तो दिवस होता ११, जुलै, २००२. मी म्हणले, कसला वाढदिवस आणी कसले काय, तु अमावस्येला सांगीतले असतेस तरी चालले असते, मी किती तडफलोय ते मलाच माहीत.
मी जेंव्हा मित्रांना हे सांगीतले तेंव्हा कोणाचा विश्वासच बसला नाही..
पुढे १० महिन्यांनी आमचा साखरपुडा झाला, आणी नंतर ७ महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबर २००३ विवाह. ६ वर्ष झाली त्या घटनेला, पण आजही आम्ही ११ जुलै सेलेब्रेट करतो. तो दिवस आम्हाला दोघांनाही जिवंत ठेवायचा आहे, आयुष्याच्या शेवटापर्यंत.
हे सगळे लिहीताना एक गोष्ट आठवतेय, लगान सिनेमातल्या “ओ मितवा” गाण्याची सुरुवात.. “हर संत कहे, साधु कहे.. सच और साहस है जिसके मन मै, अंत मै जित उसीकी है..”
[समाप्त]
ता.क.: तुमच्या प्रतीक्रियेंबद्दल शतशः धन्यवाद. खुप मजा येत होती एक एक कमेंट वाचताना.
अनिकेत
पण तुम्ही लिहिलं ईतकं छान आहे की वाचायला मजा आली.
खुप खुप मेहेनत करावी लागली दिसते तुम्हाला. आमचं फार सोप्पं झालं होतं.. सांगिन नंतर कधितरी..
प्रतीक्रियेबद्दल धन्यवाद.
भाऊ एकदम मस्त रे…. मज्जा मज्जा आली वाचताना.
वसंत बहरला.
आभार.. धन्यवाद
Dude this is very nice……it worked out fine at the end..so you put across with great enthusiasm.
छान…तर सुरुवात गोड झाली…नाही कारण अश्या बाबतीत ’हो’ म्हणणं हा शेवट नसतो तर ती एका मधूर नात्याची सुरुवात असते..!!! बाकी आमचेही महेंद्रजींसारखे…..भेटलो आणि तीन महिन्यात निर्णय पक्का की हे लग्न होणे आहे….कोणीच कोणाला प्रपोज केले नाही…नेहेमी लोक विचारतात की अरे लव मॅरेज का मग कोणी केलं प्रपोज? गंमत म्हणजे आमच्याकडे उत्तरच नसते….
अनिकेत आणि पल्लवी शुभेच्छा…..
Hi Aniket,
Tinhi bhagasathi ekach comment dete aahe…
Khup maja aali wachatana…agadi college madhe tuzya friends group madhe aslyasarkha….mazya itar mitranchi margi lagaleli prakarana aathwali…
Copy right karun thev kuni movie wala dhapel nahi tar hi story line….
great writing. simply great. you have really captured the moments as they were.
विक्रांतच्या दुसऱ्या पोस्टवरच्या कमेंटवरुन अंदाज आलेलाच होता पण तुझ्याकडून तिसऱ्या भागात वाचायचे होते. तुझ्या लिहीण्याबद्दल काही बोलत नाही रे कारण आता ते सर्वश्रुत आहे आहेच…
पण जोड़ी मस्त जमली रे. असच असते रे. माझा लग्नाचा वाढदिवस तसा वेगळा पण आम्ही सुद्धा ५ ओक्टोबर साजरा करतो दरवर्षी. ती आठवण म्हणजे काहीतरी वेगळीच नाही का …
माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आयुष्यभर आहेत…
खूप छान लिहिलं आहेस… बारीक-सारिक तपशील तर खूपच रंगत आणतात.
प्रत्येक प्रेम-कथा किती वेगळी आणि तरी किती सारखी असते नाही?
छान लिहीले आहेस. तुमचे आमच्या नंतरचे म्हणजे १५ वर्षे पुढचे तरीही शेवटी मुले आणि मुलींची विचारसरणी तीच.
शुभेच्छा.
U r having very good writer very well written ……………… I enjoyed it a lot
Good !
A nice story……
I wish both of you a lovely life !!!!!
Regards
Deepak Parulekar
Mumbai.
मान्यवर !!!!! एकदम झक्कास.
काय भारी गोष्ट आहे.
तुमच्या लिखाणाला सलाम तर आम्ही केंव्हाच ठोकला आहे पण हा भाग इतका रंगला की बस्स !!.
खरे तर काही कामामुळे मी थोडा उशीराच वाचला. खात्री होती की खुप interesting असणार. तुम्ही दोघेही Made For Each Other आहात असे वाटते.
किती सुंदर आणि आत जाणारी Lovestory.
Congrats and best wishes for ever-rising love in your married life
1 no mitra .. eakdam zakas lehele aahes tu .. aavadle mala ..
मंगेश, तन्वी, अपर्णा, प्रणव, रोहन, श्रध्दा, महेंद, भानसा, अश्विनी, दिपक, विक्रांत, समीर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
मस्त लिखाण. मस्त रंगवला आहे हा अनुभव.
sahi ahe ha pan. tu ewadha changala lihatos he mahit nawhate…ekdam interesting lihatos.
बास का राव, तुमच्या नेक्ट टु नेक्ट क्युबीक मध्ये बसतो आणि तुम्हाला माहीती नाही
hehe sahi zaliy hi story.. bahutek adhi manogatavar vachli hoti.. pan parat vachaylahi majja ali!
Lovely writing ! straight from the bottom of the heart. a great effort to put forward your love story.
just one thing to say…Keep it Up…….
and one more thing —- you are lucky to have whatever you desired finally.
apratim, apratim, apratim dusre shabdach nahit, ya kadak unhalyat chan olya maticha sugandha yava, ani gar varychya zulka yavya asahot hota vachtana…………pan boss ek nakki tu khup lucky ahes, nahi nahich shevti HO far kami lokana ikayla milta…………lakud sparshachya sakshi ne (touch wood) dev tumhala asach nehami nehami anandat thevot……………
Sahi, mala college che diwas aathawle
Nice post, really liked it.
Thanks,
Rohit.
धन्यवाद, ब्लॉग वर असणारा लोभ असाच कायम ठेवावा
mazza ali vachayla..happy ending asunahi bor nahi zalo..muli mhanje ek codech(marathi) aste..comp var kitihi code lihila tari mulinche he code kahi sutat nahi..:) ajun kay lihitay..despartely waiting….
its 3 a.m. now….
nice story but u mentioned one line twice …means in tht adhuri pem kahani story and also in that mehandichya panawar..
line: tuza rang ajun gela nahi…
y it so?
any special moment related to this line…
Aniket,
chhan lihile aahes…..! wachatana mala pan mazya aaushatalya junya aathavni aathavalya…!
thanks re..!
tuza blog n chukata wachato…! mind refresh wyayala madat hote
hey bro, maafi asaavi , marathi typing available nahi mhanun eng madhe lihitoy karan itkya sundar goshti che english madhe kautuk karayla shabda nahit nasavet ….. pan aso yaaar tujhi goshte ani tujhe nasheeb donhi bhaaari ahe…..vachnarayla tu nasun to swatach ahe ase vatat rahte ….arthat shevti tu vegla hotos karan tula tujhi ti bhetate ( kay sudaiva).
baki tujhi goshta manapasuuun avadli…….ani tujhe lekhan suddha…..!!!!!!!!!! thanks re colg chya tya manat kuthetari ajunhi japlelya aathvani aathvun dilyabaddal….!!!!
khup chaan lihale aahe. prem he kiti sunder aahe he prem karanaryanch mahit asat
Aaaila ganya aavadha bhari pratikriya tuzya tondun….
………shabach nahit bolayala kiti apratim lihaly…..
tumchi story mazya love story sarkhi aahe. i like it.
I just LOVED this story…..VERY VERY NICE…:-)
भाग्यवान आहेस. मी शाळेत कधीच हुशार नव्हतो.
पण मी तिला नक्की बोलेल. धन्यवाद!
वसंत बहरला
Aniket mala tuzyashi kahi bolayche aahe……… tumcha email Id tumhi deu shakal ka……. pls mail me ….
neelmangalentertainment@gmail.com
I just LOVED this story…..VERY VERY NICE
धन्यवाद स्मिता
kay zakkas aahe re mast aahe khupach .
aani to hero tar superb ch vatala mala really nice .
कुठला हिरो? ही सत्यकथा आहे माझ्या आयुष्यातली!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
lai bhaari khup aavadali
mast maja ali. Vakyarachna agadi ok. Asech kahi kshan astat mansachya ayushyat ki je kadhich visarta yet nahit. Ani tumhi te share kelet amha vachakanshi.
Manapasun Dhanyavad
Mastach ahe tumchi katha pan khare sangu ka ?? Khup nashibvan ahat tumache lavkar julale ki rao, Nahi tar khup tapasharya karavi lagte?? btw, Nice story. Mastach rangli ahe.
I liked your love story Aniket…. Beautiful….. Pratyek love story chi aapli ek vegalich baat asate… Jashi tumchi hi ahe…. All the best
Kharach apratim love story aahe. Vactana sapurna chitra dolyasomor yet hote.
Thanks
Rajesh
Thanks Rajesh
Kharach yaar Aniket, tujh likhan Mhanaje Utkantha
Aani Hi Tujhi jadu kayam sagalyanvar rahnar yaat kahi Shanka Nahi
Mala Ek vicharavas Vatat! Tula he sagal suchat kasa, Mala Basik Shikav na..
……Mala Marathi typing Jamat Nahi.. mhanun he thodas…. Nahitar…………
!!!!!!!!!so sweet!!!!!!!
why don’t u try to write a novel… chaangli jamel tulaa. mast katha aahe hee. well done buddy… keep it up…
Hey I liked it a lot
thank you..
एक तर मी तुला आहो जाहो बोलायला हवाय कारण मी तुझ्यापेक्षा खूप लहान आहे

पण आज हि गोष्ट वाचल्यावर अजिबात कुठली हि formality ठेवावीशी वाटत नाहीये
sorry त्याबद्दल…
पण अतिशय सुंदर आहे तुमची कहाणी
खूप कमी लोकांची प्रेम कहाणी सफल होते आणि ते खरचं खूप भाग्यवान असतात
तुझी गोष्ट वाचून मला २ वर्षापूर्वीचे दिवस आठवले
अर्थात माझी कहाणी तुझ्यासारखी नव्हती पण प्रेम कहाणी हि प्रेम कहाणी असते आणि प्रत्येक प्रेम कहाणी आपल्या कहाणी इतकीच सुंदर वाटते प्रत्येकाला, अस मला वाटत
माझी कहाणी पूर्ण झाली नाही खरी पण आठवणी तशाच आहेत
आज हि गोष्ट वाचून सगळ्या आठवणी पुन्हा दाटून आल्या
देव करो आणि सगळ्यांच नशीब तुझ्यासारखंच असो
तुझ्या wife ला एक निरोप मात्र नक्की दे कि बर झाल होकार दिलास…कारण प्रेम सगळेच करतात पण इतक्या स्पष्टपाने सगळ्या जगासमोर आपली कहाणी सांगण्याची हिम्मत सगळ्यात नसते
आणि हो मुली हे पास नापास वैगेरे बाबत विचार करतात हं ! अगदी मनापासून
पु.ले.शु.
Apratim Story aahe………kupach chaan lihita tumhi…..
मस्त मस्त मस्त खुप छान खुप आवडली.

*खूप कमी लोकांची प्रेम कहाणी सफल होते आणि ते खरचं खूप भाग्यवान असतात. * पटल बुआ. एकदम खरं आहे हे.
“हर संत कहे, साधु कहे.. सच और साहस है जिसके मन मै, अंत मै जित उसीकी है..” हे वाचुनच खुप धीर आला
khupach chhan ahe story
hi aniket !
khup khup chan chan aahe tuzi prem katha mala agdi manapasoon aavdali
very good and secreat up to last fineeeeeeeeeeeeeeee
Tuamchi Story khupach chan ahe
Thanks Ashwini
SUPARB ,,,,,,,,,,,,,,,
hi aniket !
khup khup chan chan aahe tuzi prem katha
khup chhan….mast aahe katha…!
khupp chaan must …. vachtana collage madhle divas aathvle……..//