…तो चेहरा [भाग ३ शेवटचा]

भाग २ पासुन पुढे…

राजेशने घाबरतच दार उघडले. दारात त्याच्या परीचयाचे इन्स्पेक्टर धायगुडे उभे होते. हो.. परीचयाचेच..त्याच्या पत्नीची हरवल्याची केस त्यांच्याकडेच असल्याने अधुन-मधुन भेटी व्हायच्या.

राजेशची भितीने गाळण उडाली होती, तरीही त्यात त्याने प्रसंगावधान दाखवले.. “काय झाले इंस्पेक्टर, सुमीची काही बरी-वाईट बातमी तर नाही ना घेउन आलात?”

‘स्वॉरी मि.राजेश, थोडा त्रास द्यायला आलो आहे. एक काम होते. हा नंबर तुमच्या ओळखीचा आहे का?” इन्स्पेक्टर ने एक कागद राजेशकडे दिला.. “तुमच्या बॅकेचाच हा नंबर आहे ना”
“हो..” राजेशने मान हलवत संमती दर्शवली
“एक फोन कॉल ट्रेस करायचा होता, शोध घेताना कळाले की तो तुमच्या इथल्याच जवळपासच्या एक्स्टेंशन वरुन केला गेला होता साधारण संध्याकाळी ५ च्या सुमारास. तुम्ही काही सांगु शकाल या वेळात हा फोन कुणी-कुणी वापरला होता. तुम्ही सांगीतलेली कुठलीही माहीती उपयोगी पडेल”, इ. धायगुडे म्हणाले.

राजेशचा जिव आता भांड्यात पडला. म्हणजे अजुन तरी त्याच्यापर्यंत काही आलेले नाही. त्या मुर्ख नितीनने फोन नसता केला तर पोलीस इथपर्यंत सुध्दा नसते आले.. थोडा विचार करुन राजेश म्हणाला..”नाही इंन्स्पेक्टर साहेब, काहीच कल्पना नाही. संध्याकाळ कॅश टॅली करण्याची, बॅक बंद होण्याची वेळ त्यामुळे गडबडीत लक्ष नव्हते. तसेच बरेचसे गिऱ्हाईक अर्जंट कामासाठी सुध्दा या फोनचा वापर करतात.. सो.. माफ करा पण काहीच कल्पना नाही.”

“काही हरकत नाही.. पण जर तुम्हाला काही आठवले तर मला जरुर फोन करा”, असं म्हणुन इ.धायगुडे निघुन गेले.

राजेशने खिश्यातुन रुमाल काढला आणि आपला घामाने डबडबलेला चेहरा पुसला. ‘नॅरो एस्केप, या वेळेस वाचलो.. पुन्हा असल्या भानगडीत पडायचे नाही’ असा विचार करत राजेशने स्वतःसाठी एक पेग भरला आणि तेथीलच खुर्चीवर डोळे मिटुन बसुन राहीला.

पुढील काही दिवस हनीची बातमी फ्रंट लाईन- ब्रेकींग न्युज राहीली आणी हळु हळु नवीन खाद्य मिळाल्यावर त्याचे महत्व कमी कमी होतं गेले.

************************
८ महीन्यांनंतर…..

राजेशच्या पत्नीचा, सुमीचा, अजुनही काही पत्ता लागला नव्हता. गेल्या ८ महीन्यात कुणाचाही शहरात खुन झालेला नव्हता. राजेशच्या जिवनात ‘माधुरी’ ने हलकाच प्रवेश केला होता. बॅकेत पैसे काढायला आलेल्या माधुरीची राजेशशी नजरानजर झाली आणि दोघांच्याही नकळत त्याचे रुपांतर मैत्रीत आणि हळु-हळु प्रेमात होतं गेले. पोलीसांचेही ‘हनी’ च्या केसकडे थोडेसे दुर्लक्षच झाले असल्याने राजेशही मनोमन खुश होता. सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटत असतानाच ती बातमी येऊन धडकली -
शहराबाहेरील लेक व्ह्यु जवळील निर्जन टेकडीवर एका प्रेमी युगुलावर माथेफिरु खुन्याचा हल्ला. युवकाच्या प्रसंगावधानामुळे युवती हल्ल्यातुन बचावली..

सर्व बातम्यांमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या युवतीचे फोटो आणि थोडाफार इंटरव्हु सुरु होते.

“अतीशय भयानक, भेसुर चेहरा होता तो..चेहऱ्यावर प्रचंड तिरस्कार, रागाचे भाव होते..” त्या युवतीने सांगीतले होते. पोलीसांनी सर्व प्रेमी-युगुलांना निर्जन स्थळी एकट्या-दुकट्याने जाण्यासाठी मज्जाव केला होता.

आज माधुरीचा वाढदिवस होता.. “चल ना रे राजेश कुठल्याश्या मस्त रेस्टॉरंट मध्ये जाऊ जेवायला..” माधुरी लाडात येउन म्हणाली.

“काही हरकत नाही.. जाऊयात.. तु सांग कुठल्या हॉटेलमध्ये जायचे? ‘गार्डन कोर्ट?, अप-अबोव्ह, ऍम्ब्रोसिया?”.. राजेश एक एक हॉटेल सुचवत होता..

“श्शी बाबा.. तु फारच अन-रोमॅन्टीक आहेस.. केवढी गर्दी असते ह्या हॉटेल्स मध्ये. असे एखादे हॉटेल पाहीजे जिथे फक्त तु आणि मी. शांत, गर्दीपासुन दुर… ए.. ते लेक व्ह्यु कसे आहे? मी कधी गेले नाही तिकडे.. जायचे?” माधुरी राजेशशी लगट करत म्हणाली.
“नको हा.. फारच दुर आहे ते.. आणि कित्ती निर्जन आहे तो भाग. त्यात ऐकलेस ना नुकताच तिथे माथेफिरुने हल्ला केला आहे.. उगाच नको.. आपण दुसरीकडे जाऊ” राजेश
“नाही.. मला तिथेच जायचे आहे.. आणि तो खुनी काय हल्ला करुन तिथेच थांबणार आहे का? गेला असेल तो दुसरीकडे. आणि तु बरोबर असताना मला भिती कश्याची? ते काही नाही. आपण तिकडेच जायचे.” माधुरी आपल्या हट्टावर ठाम होती. शेवटी राजेशला तिचे ऐकावेच लागले.

माधुरीचा चॉइस चांगला निघाला. हॉटेल मस्तच होते. जेवणही अप्रतीम झाले. निर्जन स्थळी असल्याने गर्दीही जवळ जवळ नव्हतीच. जेवणानंतर कॉफी घेउन दोघं परत निघाले. तेथीलच तळ्याशेजारी एक बांबुचे छोटेसे वन होते..”राजेश आपण तिकडे बसुयात थोड्यावेळ? चंद्राचे तळ्यात पडलेले प्रतीबिंब न्ह्याहाळत माधुरीने राजेशला विचारले..” अर्थात राजेश नकार देउ शकला नाही. त्याने आपली गाडी त्या वनामध्ये नेउन लावली.

माधुरीने आपले डोक राजेशच्या छातीवर टेकवले..”राजेश, तुला काही सांगायचे आहे.. सांगु? तु चिडणार नाहीस ना?”
“नाही चिडणार.. सांग ना!” तिच्या केसांमधुन हात फिरवत राजेश म्हणाला..
“राजेश, तु माझ्या आयुष्यात आलास आणि माझे आयुष्यच बदलुन गेले. खरं तरं मी परत प्रेमात पडीन असं मला कध्धीच वाटलं नव्हतं..” माधुरी..
“..परत? म्हणजे..?” राजेशने तिचे वाक्य तोडत तिला विचारले.
“सांगते रे.. मध्ये मध्ये मला थांबवु नकोस..”, लटक्या रागाने माधुरी म्हणाली.. “तु माझ्या आयुष्यात येण्याच्या आधी माझ्या आयुष्यात एक जण होता..पण त्याची ना फारच नाटकं असायची मी असंच वागलं पाहीजे, दुसऱ्या कुणाशी बोलायचे नाही हे आणि ते.. याला काय अर्थ आहे रे.. माणसांनी कसे ही वागायचे आणि आम्हा मुलींनी थोडेपण फ्लर्ट करायचे नाही का? मग आमची फारच भांडण व्हायला लागली.. शेवटी दिले मी त्याला सोडुन..” माधुरी बोलत होती..मध्येच थांबुन तिने राजेशकडे बघीतले..राजेश शांतपणे विचार करत होता..”काय झालं राजेश? चिडलास? हे बघ आता तु आहेस ना? मला आता दुसरं कोणी नक्को..”

एवढ्यात राजेश एकदम सतर्क झाला..आणि इकडे तिकडे पाहु लागला.
“काय झालं..?” माधुरीने ही इकडे तिकडे बघत विचारले
राजेशने तोंडावर हात ठेवुन तिला गप्प बसायची खुण केली..”कोणी तरी आहे बाहेर..” राजेश हळुच बोलला. माधुरीच्या चेहऱ्यावर एकदम भिती पसरली.. “चल आपण जाऊ पटकनं”, तिने सरळ बसत राजेशला सांगीतले.
“एक मिनीटं थांब मी बघतो कोण आहे” असं म्हणुन राजेश हळुच गाडीतुन खाली उतरला. माधुरी गाडीच्या खिडक्या बंद करुन घाबरुन बसली होती.

राजेशने हळुच गाडीभोवती चक्कर मारली. मागुन पुढे येत असताना त्याला ‘तो’ दिसला.. “तोच भयानक, भेसुर, विद्रुप चेहरा, हातामध्ये तळपता सुरा घेउन हळु हळु पुढे सरकत होता..” राजेशला आपल्या ह्या रुपाचे फार अप्रुप वाटायचे. स्वतःचाच तो भयानक विद्रुप चेहरा गाडिच्या आरश्यात न्हाहाळताना राजेश मनोमन हसत होता. हनीच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला आठवले जेंव्हा तिने राजेशला हातात चाकु घेउन पाहीले.. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव बघुन किंकाळीसाठी उघडलेले तोंड शब्द सुध्दा बाहेर फेकु शकले नाहीत.. आणि राजेशने तिला तशी संधी सुध्दा दिली नव्हती. क्षणार्धात त्याने तो सुरा तिच्या छातीच्या आरपार केला होता. “साली छिनाल..तु पण तसलीच निघालीस तर”, माधुरीबद्दल विचार करत तो हळु हळु पुढे सरकत होता..”तुम्ही सगळ्या बायका तसल्याच.. तुमच्यासाठी एकच न्याय… भयानक मृत्यु. आधी माझी आई.. बाबांना सोडु दुसऱ्याबरोबर पळुन गेली.. बाबांना एकटे तडफडत जगणे मी पाहीले आहे.. त्यानंतर या ना त्या रुपात प्रत्येक स्त्रीच मला अशी भेटत गेली. कधी पत्नी म्हणुन तर कधी कॉल गर्ल म्हणुन. आज तुला त्या सगळ्यांपाशी पोहोचवणार” असा विचार करतच त्याने दरवाजा उघडला.. हातातला चाकु सरसावुन तो हल्ला करणार तोच त्याच्या लक्षात आले की गाडीत कोणीच नाही.. माधुरी गेली कुठे..??” त्याची ती भयानक नजर तिला शोधु लागली..तिच्या पोटात खुपसण्यासाठी हातातला चाकु तडफत होता तोच अचानक समोर दिवे लागले..”पोलीस, मि. राजेश हातातला चाकु खाली टाकुन शरण या नाहीतर आम्हाला गोळी झाडावी लागेल..” दुरुन आवाज आला.

आपण पुरते फसल्याची राजेशला जाणीव झाली. हातातला चाकु खाली टाकुन तो पळत सुटला. पोलीसांनी फैरी झाडल्या, त्यातील एक गोळी राजेशच्या वर्मी बसली आणि तो खाली कोसळला. छातीतुन रक्ताची एक धार निघाली. अतीव वेदनेने राजेशने डोळे मिटुन घेतले. डोळे उघडले तेंव्हा धुसरश्या नजरेने त्याला समोर माधुरी दिसली..
“माधुरी.. तु?..”.. अस्प्ष्ट आवाजात राजेश म्हणाला..
“माधुरी नाही मि. राजेश.. सि.आय.डी. इन्स्पेक्टर माधुरी. त्या दिवशी तुम्ही तुमच्या इथुन कोणीच फोन केला नाही असे सांगीतलेत, पण पोलीस चौकशी तिथेच थांबली नाही. पुढील तपासात नितीन सापडला आणि त्याने कबुल केले.. त्याने हे सुध्दा सांगीतले की तुला माहीत होतं नितीन ने हा फोन केला होता. तसेच हनीचा फोन नंबर तुला दिला होता. मग राजेश तुम्ही खोटं का बोललात? कदाचीत मित्राला वाचवण्यासाठी? कदाचीत स्वतःला वाचवण्यासाठी? शक्य आहे.. पण संशयाची सुई तुमच्याकडे फिरली होतीच ना. मग आम्ही तुमची माहीती काढायला सुरुवात केली. तुमची आई आणि नंतर पत्नीचे वागणे समोर आले आणि साम्य म्हणजे दोघीही जणी काही दिवसांनंतर बेपत्ता झाल्या होत्या. मग वॉचमनने सांगीतलेले वर्णन जुळु लागले. इ. धायगुडेंनी बोलताना तुम्हाला एक नंबर दाखवला होता, त्या कागदावर तुमचे हाताचे ठसे घेण्यात आम्ही यशस्वी झालो. संशय पक्का झाला होता. गरज होती तुम्हाला रंगे-हात पकडण्याची. त्यासाठी मला यावे लागले इतकेच.”

“कायदा इतका मुर्ख आणि अंधळा नसतो.. प्रत्येक माणसाच्या आत दडलेला तो भेसुर चेहरा ओळखण्याचे सामर्थ्य आहे ह्या कायद्यात.. यु आर अंडर ऍरेस्ट मि. राजेश..” माधुरी बोलत होती.

पण माधुरीचे हे शेवटचे शब्द ऐकायला राजेश जिवंत नव्हता.

[समाप्त]

…तो चेहरा [भाग २]

भाग १ पासुन पुढे..

राजेशला दरदरुन घाम फुटला. भितीची एक सळसळती लाट मणक्यातुन जाताना त्याला जाणवली. राजेशच्या चेहऱ्याकडे रोखलेले तिचे ते उघडे परंतु निस्तेज डोळे भेसुर दिसत होते. राजेशने बॅटरीचा प्रकाश इतरत्र फिरवला आणि त्याचे लक्ष तो जिथे उभा होता तिथे गेले. त्याच्या पायाखाली रक्ताचे एक मोठ्ठे तळे साठले होते. राजेश पटकन त्यातुन बाहेर आला. भितीची संवेदना जरा कमी झाल्यावर राजेश आता काय करावं याचा विचार करु लागला. “पोलीसांना फोन करावा?”, त्याने मनाशीच विचार केला.. “..पण नाही. त्याचा आणि हनीचा संबंध काय? तो इथे काय करत होता? केवळ गप्पा मारण्यासाठी तो एका कॉल-गर्ल कडे आला यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का? मोकाट फिरणाऱ्या माथेफिरु खुन्याचा शोध नं लागल्याने पोलीस यंत्रणेवर चोहोबाजुने टीकेची झोड उठली होती. अश्यावेळेस पोलीसांना आयतीच संधी मिळेल. तात्पुर्ते, गुन्हा सिध्द होईपर्यंत का होईना ते राजेशला, हाच तो माथेफिरु म्हणुन तुरुंगात टाकु शकत होते. तो अगदी योग्य सापळ्यात अडकला होता.. नाही पोलीसांना फोन करुन जमणार नाही. इथुनच कसं तरी करुन निसटले पाहीजे.”

इतक्यात हॉल मधील टेलीफोनची घंटा वाजु लागली. त्या शांततेत तो आवाज कानाला प्रचंड त्रास देत होता. बऱ्याच वेळ फोन वाजला आणि बंद झाला. थोडा वेळ शांततेत गेला आणि परत तो फोन वाजु लागला. राजेश बाहेर जाण्यासाठी वळला आणि त्या रक्ताच्या डबक्यात घसरुन पडला. त्याच्या हाताला रक्त लागले, शर्टवर सुध्दा थोडे शिंतोडे उडाले. चरफडतच तो फोनपाशी पोहोचला. त्याने फोन उचलला आणि काही नं बोलता कानाला लावला. पलीकडुन हळु आवाजात कोणीतरी बोलत होते, “हनी, सॅम बोलतोय. जोसेफ तुरुंगातुन सुटला आहे. मगाश्शीच तो इथे येऊन गेला, तुझी चौकशी करत होता. जरा जपुन रहा..” असे बोलुन फोन बंद झाला.

“कोण हा जोसेफ? त्यानेच तर हनीला नसेल मारले? आणि नसेल तर तो कुठल्याही क्षणी इथे येण्याची शक्यता आहे त्याच्या आत इथुन सटकले पाहीजे.” राजेश ने विचार केला. त्याने फोन जागेवर ठेवला, बॅटरी बंद केली आणि अंदाज घेत तो दाराकडे निघाला. आणि अचानक त्याला आठवले.. त्याचे ठसे.. हाताचे, पायाचे, रक्ताने भरलेल्या बुटांचे.. सर्व घरभर होते. पोलीसांना सब्बळ पुरावा होता तो. राजेश हळुच माघारी फिरला. खिश्यातुन रुमाल काढुन प्रत्येक वस्तु जी त्याने हाताळली होती ती सावकाश, काळजीपुर्वक पुसुन घेतली. मनाशी दहा वेळा त्याने उजळणी केली आणि प्रत्येक वस्तु पुसुन झाली आहे ह्या बद्दल समाधान झाल्यावर तो हळुच दारातुन बाहेर पडला आणि खाली आला.

“दुसरा पुरावा”, त्याने विचार केला..वॉचमनने त्याच्या गाडीचा नंबर लिहुन घेतला होता. संध्याकाळी ११०२ मध्ये कोण-कोण आले होते याची पोलीस तपासणी करतील तेंव्हा वॉचमनकडच्या नोंदवही मध्ये त्याच्या गाडीचा नंबर त्यांना मिळणार होता.. त्याचे लक्ष वॉचमनच्या खोलीकडे गेले. खोलीमध्ये मेणबत्तीचा मंद प्रकाश पडला होता. अंधारातुन, कडेकडेने राजेश वॉचमनच्या खोलीत गेला. वॉचमन खुर्चीवर बसुन पेंगत होता. राजेशची चाहुल लागल्यावर तो उठुन बसला.

“फारच जोराचा पाऊस आहे नाही?”, राजेश वॉचमनला म्हणाला ..” अश्या पावसाळ्यात तुमच्या सारख्या वृध्दाने खरं तर आपल्या परीवाराबरोबर घरात असायला हवं”.. आपल्या हातातील किंमती सिगारेट पुढे करत तो वॉचमनला म्हणाला.

“खरं आहे तुमचं म्हणणं पण पोटापाण्यासाठी करावं लागतं. तळहातावर पोटं असणारी माणसं आम्ही..”, वॉचमन सिगारेट पेटवण्यासाठी काड्यापेटी शोधत म्हणाला. त्याचे लक्ष मागे टेबलावर ठेवलेल्या काड्यापेटी कडे गेले. चरफडत अंगावरची शाल बाजुला करुन सावकाश तो उठला आणि काड्यापेटी आणण्यासाठी जावु लागला. त्याची पाठ वळताच राजेश त्याच्या टेबलावर शोधाशोध करु लागला. कडेला त्याला त्याची ती नोंदवही सापडली. त्याने पटकन ती नोंदवही खिश्यात कोंबली. वॉचमन सिगारेट पेटवुन परत येउन बसला. पावसाचा जोर कमी झाला तसा राजेश म्हणाला ..”चला आजोबा. निघतो मी” आणि तो बाहेर जावु लागला.

“एक मिनीट..” वॉचमनने मागुन आवाज दिला ..”तुमच्या जाण्याची नोंद करायला हवी.. पण माझी नोंदवहीच सापडत नाही.. कुठे ठेवली बरं.. आजकाल ना स्मरणशक्ती कमीच झाली आहे. एक काम करतो.. तुम्ही गाडीचा नंबर परत एकदा सांगा मी इथे कागदावर लिहुन घेतो नंतर वही सापडली की त्यात लिहुन टाकीन”

राजेशने इकडे-तिकडे नजर टाकली. थोड्यादुरवर एक गाडी उभी होती. राजेशने त्याच गाडीचा नंबर वॉचमनला सांगीतला आणि तेथुन झरझर पावलं टाकत तो बाहेर पडला. शहरामध्ये रात्रीची पोलीसांची गस्त वाढवली होती. कुठल्या पोलिसाने चौकशीसाठी गाडी थांबवु नये म्हणजे झालं..असा विचार करत राजेश नेहमीच्याच वेगाने गाडी चालवत घरी आला.

दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या त्याने सगळा पेपर चाळुन काढला परंतु हनिच्या खुनाची बातमी कुठ्ठेच नव्हती. “याचा अर्थ अजुन कुणाला पत्ता लागलेला नाहीये तर” राजेशने विचार केला.. “जेवढ्या उशीरा पोलीस या केसवर येतील तेवढे आपल्याला चांगले. म्हातारा वॉचमन तो पर्यंत माझे वर्णनहि विसरुन जाईल.” मग त्याने रक्ताचा डाग असलेले बुट आणि शर्ट एका पिशवीत भरून कपड्याच्या कपाटात कोंबुन ठेवले. मग त्याने स्वतःचे आवरले आणि बॅकेत कामाला गेला. गाडी लावतानाच त्याला नितीन भेटला..

‘काय रे गेला होतास का हनी कडे काल मग?’ नितीन ने त्याला विचारले?
हनीचे नाव ऐकताच राजेश चपापला.. “नाही रे.. मी सांगीतले ना तुला मला इंटरेष्ट नाही म्हणुन मी काल घरीच होतो.”
नितीनच्या चेहऱ्यावर संशयाची एक छटा येउन गेली.. “घरी? पण मी तुला २-३ दा फोन केला होता.. मग उचलला का नाहीस?”
“शक्यता आहे. काल मी व्होडकाचे दोन लार्ज पेग मारुन लवकर झोपलो होतो आणि पावसाच्या आवाजात ऐकु नसेल आला..” असं म्हणुन राजेश आपल्या डेस्क वर जाउन बसला.

बॅंक बंद व्हायच्या थोडे आधी नितीन राजेशच्या डेस्क वर आला.. ‘अरे आज बायको ४ दिवसांसाठी माहेरी गेली आहे. मी चाललो बाबा आज हनी कडे. तिला आता फोन करुन अपॉईंटमेंट घेउन टाकतो म्हणजे झाले..” असं म्हणुन त्याने शेजारील फोन उचलला आणि त्याने हनीला नंबर लावला. राजेशचे ह्रुदय जोरात धडधडत होते. तो चोरट्या नजरेने नितीनच्या चेहऱ्याकडे बघत होता. काही क्षणातच नितीनचा चेहरा पांढरा फटक पडला आणि त्याने पटकन फोन खाली आपटला.

“काय रे? काय झालं?”, राजेशने नितिनला विचारले
“अरे काही तरी गडबड झाली आहे. हनीच्या घरी पोलीस आहेत. ते लगेच हा नंबर ट्रेस करतील आणि कुठल्याही क्षणी इथे येतील.. चल जाऊ पटकन आपण घरी..” असे म्हणुन नितीन घरी निघाला सुध्दा. राजेशसुध्दा थोड्यावेळाने घरी परतला.

“म्हणजे पोलीसांपर्यंत ही बातमी पोहोचली तर.. पोलीसांनी तपास चालु सुध्दा केला असेल. त्या म्हाताऱ्या वॉचमनने वर्णन पोलीसांना दिले असेल आणि सर्व चौक्यांमध्ये ते पोहोचले सुध्दा असेल..” राजेशने टि.व्हि. चालु केला.. ” हनी ची बातमी सर्व न्युज-चॅनलवर थडकली होती त्याचबरोबर राजेशला ज्याची भिती होती तेच झाले होते.. “सर्व न्युज चॅनलवर ११०२ ला भेट दिलेल्या ‘त्या’ व्यक्तीचे वर्णन झळकले होते आणि हाच तो माथेफिरू म्हणुन न्युजवाल्यांनी त्याला अमाप प्रसिध्दी दिली होती.”

एवढ्यात बाहेर गाड्या थांबल्याचा आवाज आला.. राजेशने खिडकीतुन डोकावुन बघीतले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बाहेर पोलीसांच्या दोन गाड्या उभ्या होत्या आणि त्यातुन दोन पोलीस आधीकारी उतरुन राजेशच्या घराकडे येत होते. राजेशचा श्वास अडकल्यासारखे झाले. “आता आपले काही खरं नाही..पोलीसांनी पकडुन वॉचमन समोर उभे केले तर वॉचमन मला सहज ओळखेल, घराच्या तपासणीमध्ये कपाटात कोंबलेले आणि हनीच्या रक्ताचे डाग असलेले बुट आणि शर्ट मिळेल. सर्व पुरावे माझ्या विरोधात आहेत”, एवढ्यात दारावरची बेल वाजली.

[क्रमशः]

पुढचा भाग>>

…तो चेहरा

“अजुन एका मुलीचा भोसकुन खुन, शहरात मनोरुग्ण, सिरीयल खुन्याचा वाढता तांडव, पोलीस यंत्रणा कुचकामी. नागरीकांमध्ये भयाचे वातावरण”, या आणि यांसारख्या वाचुन वाचुन चोथा झालेल्या बातम्यांनी आजचा पेपरही भरुन गेला होता. थोडे फार चाळुन झाल्यावर राजेशने पेपर खाली ठेवला. तिन आठवड्यांपासुन त्याची पत्नीही नाहीशी झाली होती. तर्कवितर्कांना उधाण आले होते. कधीही फोन वाजला की ‘पोलीस स्टेशन मधुन तर फोन नसेल?’, किंवा दार वाजले तर दारात ‘अशुभ बातमी घेउन एखादा पोलीस तर आला नसेल?’ या विचारांनी राजेशच्या मनाचा थरकाप उडत होता.

मोठ्या मुश्कीलीने त्याने स्वतःचे आवरले आणि तो बॅकेत पोहोचला. बॅंकेत नेहमीसारखीच वर्दळ होती. राजेश ‘हेड कॅशीयर’ असल्याने त्याचा काऊंटर नेहमीच गजबजलेला असे. पलिकडच्या काऊंटर वर बसलेल्या नितीन ला राजेश ने हात केला आणि आपल्या कामात तो बुडुन गेला. आधीच जाड आणि घामाने डबडबलेला नितीनचा चेहरा, उकाड्यामुळे अधीकच लाल झाला होता. दिवसभर त्याला बोलायला वेळच मिळाला नाही. कामं संपवुन संध्याकाळी कॅश टॅली झाल्यावर नितीन आणि राजेश दोघंही एकत्रच बाहेर पडले. नितीनला राजेशबद्दल फार सहानभुती वाटत होती परंतु त्याच्यावर बेतलेल्या परिस्थीतीत कोणीच काहीच करु शकत नव्हते.

“संध्याकाळी काय करणार आहेस राजेश?”, नितीनने राजेशला विचारले.

“काही विशेष नाही. ‘सुमी’ नाहीशी झाल्यापासुन घरातले सगळे आवरायचे राहीले आहे. आज तेच काम काढणार आहे. नंतर नेहमीप्रमाणे कुठल्याश्या पडीक हॉटेलमधुन काहीतरी पोटात ढकलुन झोप.”, राजेशने उत्तर दिले.

“एक सांगु? तुला थोड्या बदलाची आवश्यकता आहे. वहिनींच्या नाहीश्या होण्याने तुझ्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची मला कल्पना आहे, पण तु किती दिवस असेच ढकलणार आहेस? शेवटी पोलीस त्यांचे काम करत आहेतच ना?” नितीन

“मग मी काय करावे असं तुला वाटते?”, राजेशने प्रश्नार्थक नजरेने नितीनला विचारले.

नितीनने दोन मिनीटं स्वतःशीच विचार केला आणि मग त्याने खिशातुन एक कार्ड बाहेर काढुन ते राजेश समोर धरले. “मिस हनी! म्हणलं तर माझी मैत्रिण म्हणलं तर माझी कोणीच नाही. म्हणलं तर कॉल गर्ल म्हणलं तर जस्ट अ गर्ल नेक्स्ट डोअर. जेंव्हा बायको बऱ्याच दिवसांसाठी माहेरी जाते तेंव्हा एखादी संध्याकाळ मी तिच्याबरोबर घालवतो. मला वाटतं तु तिला भेट, मला खात्री आहे तुझी संध्याकाळ मस्त जाईल.”, नितीन डोळे मिचकावत म्हणाला.

“नाही, नको.. मला असल्या गोष्टींमध्ये इंटरेष्ट नाही” राजेश ते कार्ड परत करत म्हणाला.

“अरे तु समजतोस तसली हनी बाजारु नाहीये. खुप चांगले आणि प्रतिष्ठीत लोकं तिची गिऱ्हाईक आहेत. तु एकदा भेट तिला, बोलं, नाही पटलं तर परत ये. नथिंग टु लुझ”, नितीनने ते कार्ड राजेशच्या खिश्यात कोंबत म्हणलं.

घरी येताना राजेशने बरोबर एक थंडगार बिअर ची बाटली आणली. बुट कोपऱ्यात फेकले आणि सोफ्यावर ग्लास मध्ये बिअर घेउन तो टि.व्हि समोर बसला. टि.व्हि.वर तेंन तेच माथेफिरु खुन्याबद्दल ब्रेकिंग-न्युज चालु होत्या. ‘कौन है वो चेहरा जो इस खुन के पिछे है?’ नेहमीच्या तार स्वरातील प्रश्नफेक चालु होती. राजेशला उबग आला होता त्या बातम्यांचा, त्याने टि.व्हि. बंद करुन टाकला. उन्हाळ्यातील दिवस मोठा असल्याने बाहेर अजुनही बराच प्रकाश होता. पावसाळा बराच लांबला होता. राजेशने आकाशात नजर टाकली. दुरवर काळे ढग जमा झाले होते. परंतु पाऊस पडेल याची खात्री मात्र देत नव्हते.

राजेशने खिश्यातुन ‘मिस. हनी’ चे कार्ड बाहेर काढुन टेबलावर ठेवले. वेळ कसा घालवायचा याचा मोठ्ठा प्रश्न त्याच्या समोर होता. “नितीन म्हणतो तसे असेल का ही जी कोण हनी आहे ती असेल का चांगली? का रस्त्यावर उभ्या असतात त्यांच्यापैकीच कोणी असेल? पण तो म्हणतोय की तो बऱ्याच वेळा जातो तिच्याकडे म्हणजे असु ही शकेल चांगली. फोन करुन बघायला काय हरकत आहे? आवाजावरुन चांगली वाटली तर जाऊ नाहीतर आहेच नेहमीचे” राजेशने विचार केला. हो-नाही करता करता शेवटी त्याने समोरचा फोन उचलला आणि कार्डवर दिलेला नंबर डायल केला. बऱ्याच वेळ रिंग वाजत राहीली. ‘बहुदा घरी नसावी ती’, म्हणुन फोन ठेवणार एवढ्यात पलीकडुन फोन उचलला गेला.

‘हॅलो’, पलीकडुन हळुवार शांत आवाज आला.
बोलावं का फोन खाली ठेवुन द्यावा या द्विधा मनस्थीतीनंतर थोड्या वेळाने राजेश बोलला ‘हॅलो.. मिस हनी?’
‘येssस’, परत तोच शांत आवाज
‘मला एका मित्राकडुन तुमचा नंबर मिळाला. आज संध्याकाळी तुम्ही काही करणार नसाल तर..”, राजेश
“मी संध्याकाळी मोकळीच आहे. ११०२ ब्ल्यु व्हिला, एम.जी.रोड हा माझा पत्ता आहे. ७ वाजता मी तुमची वाट बघत आहे.” असं म्हणुन फोन बंद झाला.

राजेश पुन्हा एकदा जावे की जावु नये या द्विधा मनस्थीतीत अडकला. शेवटी आवाजावरुन तरी बरी वाटते आहे. प्रत्यक्ष भेटु आणि नाही आवडली तर येउ परत असा विचार करुन राजेश उठला. ग्लासमधील बिअर संपवली. दाढी उरकुन फ्रेश होऊन तो बाहेर पडला. पत्ता सापडायला फार वेळ लागला नाही. एम.जी. रोड सारख्या रहदारीने भरलेल्या रस्त्यापासुन थोडा आतमध्ये, एकांतात, ब्ल्यु-व्हिला ची ७ मजली बिल्डींग उभी होती. गाडी लावत असतानाच एक वृध्द थकलेला वॉचमन पुढे आला. खिश्यातुन एक जिर्ण झालेली वही काढुन त्याने पेनने त्यामध्ये राजेशच्या गाडीचा नंबर आणि कुणाला भेटायचे आहे हे लिहुन घेतले.

“भेटण्याचा कालावधी? कित्ती वेळ थांबणार आहात?” वॉचमनने विचारले, नंतर स्वतःशीच म्हणाला, “११०२ मध्ये येणाऱ्या लोकांना किती वेळ लागेल हे कुठे आणि कसे सांगता येईल?” आणि स्वतःशीच हसत तेथुन निघुन गेला. राजेशने ११०२ फ्लॅट ४थ्या मजल्यावर आहे हे पाहुन लिफ्ट मधुन तो वर गेला. दारापाशी आल्यावर एकदा इकडे-तिकडे पाहुन आपल्याला कोणी बघत तर नाहीये ना याची खात्री केली आणि बेलचे बटन दाबले. थोड्यावेळाने दार उघडले गेले. दारात एक २५-२६ची तरुणी चेहऱ्यावर हास्य घेउन उभी होती. डस्की कॉम्प्लेक्शन, कुरळे केस, ५.७”, उत्तम फिगर असे थोडेसे वर्णन करता येईल अशी ‘मिस हनी’ दारात उभी होती.

‘प्लिज कम’, असे म्हणुन तिने राजेशला आतमध्ये यायला जागा दिली.

“‘मिस हनी’ चे उत्पन्न नक्कीच चांगले असावे”, प्लॅटचे अंतर्ररुप बघुन राजेशने स्वतःशीच विचार केला. समोरील शोकेस मध्ये मोजक्याच परंतु उंची-मद्याच्या बाटल्या रचुन ठेवल्या होत्या. भिंतींवरील चित्र, घरातील प्रकाश-योजना, सुटसुटीत फर्निचर सारेच काही आकर्षक होते. राजेश विचार करत असतानाच हनी त्याच्या शेजारी, त्याला खेटुन येऊन बसली.

“सो?.. काय प्लॅन आहे आजचा?”, अर्थपुर्ण नजरेने तिने राजेशला विचारले
“माफ करा, माझा इथे येण्याचा उद्देश शरीर-संबंध नक्कीच नाही. मी माझा एकटेपणा घालवण्यासाठी इथे आलो होतो. तुमची हरकत असेल तर मी जातो इथुन”, असे म्हणुन राजेश उठु लागला.
“नाही नाही, माझी काहीच हरकत नाही. फक्त माझी ‘फी’ तिच राहील. मग आपण आता काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”, हनी
“तुमची हरकत नसेल तर आपण कुठेतरी एखाद्या चांगल्याश्या रेस्ट्रॉरंट मध्ये जाऊन जेवण घेउ, बाहेर जरा फिरु, गप्पा मारु आणि परत येउ. चालेल?”, राजेशने विचारले.
“ठिक तर, मी दोन मिनीटांत कपडे बदलुन येते. बेडरुमचा दरवाजा उघडाच आहे, तु आत आलास तरी माझी काही हरकत नाही”, हनी डोळे मिचकावत म्हणाली.
“नको.. मी इथेच ठिक आहे”, राजेश थोडासा संकोचुन म्हणाला.
“ऍज यु विश..”, असे म्हणुन हनी कपडे बदलायला आत गेली.

पुढचे काही तास राजेशने हनीबरोबर घालवले. नितीन म्हणाला तसे हनी खरंच एक छान मुलगी होती. तिच्याबरोबर असण्याने, तिच्याशी बोलण्याने मनाला आलेला एक थकवा दुर झाला होता. गावाबाहेरील असलेल्या एका हॉटेलमध्ये दोघांनी एकत्र जेवण घेतले. राजेशचे प्रत्येक म्हणणे, बोलणे हनी कान देउन ऐकत होती. आकाश्यात ढगांचे युध्द सुरु झाले, ढगांचा गडगडात पावसाची वर्दी देउ लागला तसे दोघं जण घरी परतले.

राजेशने पार्कींग मधुनच निरोप घेण्याचे ठरवले होते, परंतु हनी ने त्याला कॉफीसाठी दिलेले निमंत्रण नाकारु शकला नाही आणि तो तिच्या सोबत परत वर आला.

“फक्त दोनच मिनीट बसं, मी कपडे बदलुन येते”, असं म्हणुन हनी आतमध्ये गेली.
बाहेर वादळी पावसाला जोरदार सुरुवात झाली होती आणि अचानक लाईट गेले. बऱ्याच वेळाने राजेश अचानक भानावर आला. हनी अजुनही कपडे बदलुन बाहेर आली नाहीये याची त्याला जाणीव झाली. त्याने हनीला आवाज दिला पण तिचा काहीच आवाज आला नाही. आपल्या व्यतीरीक्त या खोलीत अजुनही कोणीतरी आहे याचा राजेशला भास होऊ लागला.

“कोण आहे? कोण आहे तिकडे?.. हनी आर यु देअर?”, राजेशने कंपीत आवाजात हाक मारली परंतु कुणाचाच आवाज येत नव्हता. राजेशच्या हाताला कंप सुटला होता. चेहरा घामाने डबडबला होता. अंधारातच त्याने आपला मोबाईल काढला आणि त्याच्या मिणमिणत्या प्रकाशात शोकेसमधील कपाटातुन त्याने बॅटरी शोधुन ती पेटवली. ती हातात घेउन तो बेडरुमच्या दिशेने जाउ लागला. सर्वत्र प्रचंड शांतता होती. घरात तिसरे कोणी असेलच तर ते आता गेले होते. राजेशने बेडरुमचा दरवाजा हळुच ढकलुन आतमध्ये प्रवेश केला. अडखळत तो बेडला खेटुन उभा राहीला आणि बॅटरीच्या प्रकाशात तो आजुबाजुला पाहु लागला. बॅटरीचा प्रकाश बेडवर स्थिरावला आणि राजेशला एक जोरदार धक्का बसला.

बेडवर हनीचा देह विवस्त्र अवस्थेत पडला होता आणि तिच्या छातीत भोसकलेला होता एक खोलवर रुतलेला व्हिएतनामी पध्दतीचा सुरा….

[क्रमशः]

पुढचा भाग>>

प्रेरणास्थान: जगविख्यात रहस्य आणि गुन्हेगारीच्या कथा लेखक जेम्स हॅडली चेस आणि त्यांची असंख्य पुस्तकं.

कॉमेडी सि.आय.डी.


सोनी टि.व्ही वर प्रदर्शीत होणारी सि.आय.डी. ही मालीका (बहुतेक करुन) अजुनही चालु आहे. कोणी बघतं का ही मालीका? मी आधी खुप बघायचो, पण एक पोलीस कथानक म्हणुन नव्हे तर एक कॉमेडी म्हणुन.. ह्या मालीकेतील काही मजेदार गोष्टी

  • कुठलाही गुन्हा घडला की ती केस सरळ सि.आय.डी. कडेच जाते. पोलीसांकडे नाही. माझ्या माहीतीप्रमाणे ज्या केसेस फारच सेंसीटीव्ह असतात, किंवा राजकीय दृष्ट्या महत्वाच्या किंवा ज्याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे अश्याच केसेस सि.आय.डी. कडे दिल्या जातात. यात तर पोलीस कुठ्ठेच दिसत नाहीत.
  • सि.आय.डी. नेहमी रिकामेच असतात. कुठलीही केस आली की ते ती घेउ शकत्तात. मुख्य म्हणजे गुन्ह्याची बातमी द्यायला लोकं सि.आय.डी. ला फोन करुन कसे बोलावतात. लोकं नेहमी फोन (खाकी वर्दीतील) पोलीसांना करतात ना?
  • गुन्ह्याच्या ठिकाणी थोडीशी जरी शोधाशोध केली की धडाध्धड पुरावे मिळायला लागतात. अजुबाजुला एखादे तरी पात्र नक्की असते जे खुप घाबरलेले असते. घाम फुटलेला असतो. अश्या पात्राने १००% गुन्हा केलेला नाही हे समजुन चालावे.
  • संशयीताला प्रश्न विचारायाला लागल्यावर तो किंवा ती लग्गेच रडायलाच लागतात. या वेळेस कॅमेरा प्रचंड प्रमाणात हालत असतो. वर/खाली, जवळ/लांब विवीध कोनांतुन त्याचे रडणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते.
  • प्रत्येक संशयीतावर हे सि.आय.डी. काही पुरावे नसताना सरळ-सरळ आरोपच करतात.. “सच बताओ तुमने ये खुन क्यु किया?”
  • प्रत्येक भागात सि.आय.डी इमारतीमध्ये एखादी काचेची खोली असते आणि आतमध्ये अभिजीत किंवा दया कुठल्यातरी गुन्हेगाराला बुकलत असतात आणि तो गया-वया करत असतो असे दृष्य दिसते.
  • ह्या ग्रुप मधील ‘दया’ हाच बहुतेक वेळा ड्रायवर असतो, फ्रेड्रीक / फ्रेडी हा नेहमी पांचट विनोदी प्रकार करत असतो तर एक आयटम महीला पोलीस (बऱ्याचवेळेला वेगवेगळी असते) खांद्याला बंदुकीचा पट्टा लावुन चेहऱ्यावर न शोभणारे रागीट भाव आणुन बरोबर असते.
  • प्रत्येक भागात एखादा फोटो नाहीतर एखादे तरी पात्र असे असतेच ज्याला बघुन ए.सी.पी. ला वाटते ‘इसकी शकल कुछ जानी पहचानी सी लग रही है!’
  • डॉक्टर आणि ए.सी.पी. प्रद्युमन त्यांच्या संभाषणातुन उगाचच निरर्थक विनोद फुलवायचा प्रयत्न करतात.
  • गुन्हेगाराच्या मागावर असताना एखाद्या ठिकाणी त्यांची गाडी थांबते. उतरल्यावर जवळपासच त्यांना काहीतरी पडलेले दिसते.. “सर ये देखो यहा पे क्या गिरा है!” दर वेळेस कसा काय असा योगायोग असतो हे अजुन न सुटलेले कोडं आहे
  • न पटणारा संगणकाचा वापर. दाखवायचे म्हणुन काय वाट्टेलते दाखवतात. उदाहरणार्थ गुन्हेगाराचे नाव ‘रोहीत शर्मा’ असेल तर ते संगणकावर शोधल्यावर सर्च लिस्ट मध्ये बरोब्बर त्याच गावातल्या त्याच रोहीत शर्माचे डिटेल्स पहीले येतात.
  • संगणकावर ‘रोहीत शर्माचा’ ठावठिकाणा शोधला की एखाद्या ठिकाणी एखादा लाल बिंदु चमकताना दिसतो. संगणकाला कसं कळते की तो ‘रोहीत शर्मा’ आहे? ‘सर वो देखो रोहीत शर्मा भाग रहा है.. चलो उसे पकडते है’ म्हणुन ते लगेच त्याच्या मागावर निघतात. त्या ठिकाणी पोहोचल्यावर लग्गेच त्यांना दुर कुठेतरी रोहीत शर्मा ‘भागताना’ दिसतो. अमेझींग टेक्नॉलॉजी.
  • गुन्हेगाराच्या श्रिमुखात २-३ भडकवल्यानंतर तो लगेच रडायला लागतो आणि गुन्हा कबुल करतो
  • बहुतेक वेळेला ज्याच्यावर अज्जीबात संशय नसतो असेच एखादे पात्र गुन्हेगार असते. गुन्ह्याचे कारण काहीही ओढाताण करुन जुळवलेले असते.

खुप्पच मज्जेदार आहे बाबा हि मालीका, सहज यु.ट्युब वर शोधले तर बरेच एपीसोड्स मिळाले, चला म्हणजे आजचा दिवस हसण्यात जाणार तर :-)

एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-३-शेवटचा]

भाग क्र. २ पासुन पुढे…

कॉफी शॉप मध्ये राधीकानेच ऑर्डर दिली, “टु लात्ते (caffè latte) प्लिज!!”
रोहन, “तुला काय माहीत मला लात्ते आवडते?”

राधीका, “अरे म्हणजे काय, कॉलेज मध्ये नाही का एकदा आपण नविन कॅफे सुरु झाले होते तेंव्हा गेलो होतो.. तेंव्हा तु हिच घेतली होतीस कॉफी आणि म्हणाला पण होतास तुझी फेव्हरेट आहे म्हणुन!”

“असेल.. पण झाली त्याला आता ६-७ वर्ष!”, रोहन मनोमन आपली आवड राधीकाच्या लक्षात आहे हे ऐकुन सुखावला होता.

“A Lot Can Happen Over Coffee”, बाहेर लिहिलेल्या वाक्याकडे बोट दाखवत राधीका म्हणाली, “खरंच कित्ती साधे पण तितकेच परीणामकारक वाक्य आहे हे नाही?”

“हम्म..” कॉफी पित-पित, रोहन म्हणाला..”बरं ते जाऊ देत, काय गं, कॉलेज मध्ये तुझ्या मागे तो सुजित होता.. काय झालं पुढे त्याचे? नंतर काहीच कॉन्टाक्ट नाही ना?”

“:-) नाही रे.. मला तर तो निटसा आठवत सुध्दा नाही. आणि तोच काय, कित्तीतरी जणं माझ्या मागे होते :-) ), अगदी तु सुध्दा.. हो ना?”, राधीका रोहन च्या डोळ्यात खोलवर पाहात म्हणाली.

“ए चल.. काहीही.. तसं काही नव्हते. आणि आपण असं कित्तीसं भेटलो होतो कॉलेज मध्ये?”, रोहन तिची नजर टाळत म्हणाला.

“अरे सांग रे.. डोन्ट वरी, शरयुला नाही सांगणार मी, खरं सांग”, राधीका
“नाहीsss, तसं काही नव्हते..” रोहन प्रयत्नपुर्वक आपल्या म्हणण्यावर ठाम रहात म्हणाला.
“बरं बाबा.. ठिक आहे”, राधीका

रोहनने तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहीली होती, जी काही क्षणासाठी आली आणि परत निघुन गेली. नंतर दोघांनी खुप्प गप्पा मारल्या. विषय एक असा कुठलाही नव्हता. खरं कारण होतं ते म्हणजे दोघंही जण एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते. मग त्यांनी एकत्र जेवण घेतले, (यावेळेसही राधीकानेच ऑर्डर दिली होती).

घरी परतत असताना राधीका वाकुन वाकुन गाडीचा स्पिडोमिटर बघत होती. शेवटी रोहनने न रहावुन विचारले, “काय झालं?”

“अरे स्पोर्ट्स कार ना तुझी? मग असा ४०-६० च्या वेगाने काय गाडी चालवत आहेस? जरा चालव ना वेगाने? का मी चालवु?” राधीका

मग रोहनने गाडीला तुफाने वेग दिला. बऱ्याच दिवसांनी त्याने त्याची लाडकी कार अशी पळवली होती. नाही तर शरयु असताना तिचे नेहमी तुणतुणं असायचं, “गाडी हळु चालव, गाडी हळु चालव.” ‘कित्ती फरक आहे दोघींच्यात!’ रोहनच्या मनात विचार चमकुन गेला.

रोहनने राधीकाला तिच्या घरी सोडले आणि तो त्याच्या घरी परतला. खुप मस्त संध्याकाळ गेली होती त्याची. घरी आला तेंव्हा शरयु नुकतीच आली होती. नेहमीप्रमाणेच तिची स्वयंपाक घरात काहीतरि खुडखुड चालु होती. रोहनला बघताच ती म्हणाली, “अरे, बरं झालं तु आलास. अरे ह्या गॅस-हब ला बघ ना काय झालेय? सुरुच होतं नाहीये. आत्ताच तर आणला ना आपण? उद्या सकाळीच आपण दुकानात जाउन दाखवुन आणु. वॉरंटी मध्ये आहे तर तो करुन तरी देईल ना!”

रोहन चांगली संध्याकाळ घालवुन परतला होता. घरी आल्या आल्या शरयुची कटकट त्याला नकोशी झाली. “काय वैताग आहे हिचा.. काय अवतार आहे?”, स्वतःशीच तो बोलत होता, नकळत त्याचे मन शरयु आणि राधीकाला कंपेअर करत होते आणि अर्थात त्याचे झुकते माप राधीकाच्याच बाजुला होते. कपडे बदलले आणि बेड-वर बसणार एवढ्यात त्याचा मोबाईल एस.एम.एस आला म्हणुन किणकिणला. “Thanks a lot for a wonderful evening, evening that i will cherish in my life”, राधीकाचाच मेसेज होता. मेसेज वाचुन त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. मेसेज ठेवावा का काढुन टाकावा या विचाराने त्याची थोडी चलबिचल झाली आणि शेवटी त्याने तो मेसेज काढुन टाकला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी रोहन गाडीत बसला. कालचा राधीकाने लावलेला परफ्युमचा सुगंध अजुनही गाडीत दरवळत होता. काहीतरी जादु होती त्या सुवासामध्ये. मन वेड करणारा तो सुगंध रोहनलाही वेड करत होता. त्याला असं वाटत होतं तडक राधीकाकडे जावं आणि तिला आपल्या बाहुपाशात घ्यावे. मग अचानक तो भानावर आला. राधीकासाठी असणारी मनाची ओढ त्याला जाणवत होती, पण त्याचवेळी शरयुची आठवण त्याला मागे खेचत होती. मनाची ही ओढाताण त्याला असह्य करत होती. दिवसभराचे काम कसे तरी संपवुन तो घरी निघणार होता एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. मोबाईलवर राधीकाचा नंबर बघुन त्याने तो पटकन उचलला.

“हाय रोहन, कसा आहेस?”, राधीका
“हाय!, मी मस्त मज्जेत. बोल कसा काय फोन केलास?”. रोहनला माहीती होतं की तो मज्जेत नाहीये. कसली तरी अनामीक ओढ, हुरहुर त्याला शांत बसु देत नाहीये.
“अरे, काल तु एवढा मला सोडायला आलास आणि मी तुला घरी सुध्दा बोलावले नाही कॉफी साठी. संध्याकाळी काही करणार नसशील तर ये ना घरी. मी फार वेळ नाही घेणार तुझा”, राधीका

“त्यात काय एवढं? ठिक आहे ना.. परत कधीतरी येईन. मी आणि शरयु दोघंही येउ, आज नको”, रोहन

“तुम्ही दोघं यालच रे, पण मला तुला थॅक्स म्हणायला नको का? काय पण माझा मुर्ख पणा, एवढी साधी गोष्ट पण मी तुला विचारली नाही काल यासाठीच मन खातेय माझं मला. प्लिज!!?”, राधीका विनवणीच्या स्वरात म्हणाली.

रोहनने एकदा नाही म्हणुन झाले होते.. परत नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मग त्याने शरयुला फोन करुन “क्लायंट मिटींग आहे, घरी यायला थोडा उशीर होईल” असे कळवुन टाकले होते. सकाळ पासुन पडलेला चेहरा आणि मुड-ऑफ असणारा रोहन आता एकदम खुलला होता.

त्याच्या एका सहकाऱ्याने-मित्राने विचारले सुध्दा, “काय साहेब, एकदम खुशीत दिसताय? सकाळ पासुन तर सुतकी चेहरा करुन बसला होतात? काय भानगड काय आहे?”
तसा रोहन म्हणाला, “अरे फार द्विधा मनस्थीतीत आहे. काय करावं कळतं नाही. बायकोची एक मैत्रिण आहे रे..” आणि मग रोहनने कालचा प्रसंग सांगीतला..”मनातुन जातच नाहीये अरे ती. आणि मला असं वाटतेय की तिला सुध्दा मी आवडतो! आज संध्याकाळी कॉफीला बोलावले आहे तिने घरी.. एकट्याला.”

“अरे व्वा.. तेरी तो निकल पडी!.. जा जा.. ऐश कर”, मित्राने पाठीवर थाप मारत रोहनला म्हणले.

“अरे नाही रे.. एकीकडे सतत असे वाटत रहाते, आपण बायकोला फसवत तर नाहीये ना?”, रोहन

“हे बघ, माझं वैयक्तीक मत तरी असं आहे की जो पर्यंत तु दुसऱ्या कुणाशी इमोशनली – मनाने ऍटॅच होत नाहीस तो पर्यंत तु जोडीदाराशी फसवणुक केली असं म्हणता येणार नाही. शरीर काय रे..नाशवंत आहे, मर्त्य आहे, आत्मा अमर आहे”, मित्राने आध्यात्माची जोड दिली.

“बरं बरं प्रभु.. जातो आता, नाही तर उशीर होईल”, असे म्हणुन रोहन निघुन गेला.

रोहनने बेल वाजवली तेंव्हा राधीकानेच दार उघडले. पांढरा टॉप आणि लेमन रंगाच्या स्कर्ट मध्ये राधीका नेहमीपेक्षाही अधीक सुंदर दिसत होती.

“काका, काकु नाहीत घरी?”, रोहनने आतमध्ये येत विचारले.
“अरे नाही.. ते लग्नाला गेले आहेत नगर ला.. उद्याच येतील”, राधीकाने उत्तर दिले.

रोहन तेथीलच एका सोफ्यावर बसला. हवेत सुखद गारवा होता. ‘केनी.जी’ ची रोमॅनटीक इंन्स्ट्रुमेंटल मंद आवाजात वाजत होती.

“तुला आवडतो केनी.जी?” राधीकाने आतुन कॉफी घेउन येताना विचारले. “कित्ती छान वाजवतो ना. काहीही धांगड्धिंगा नाही, हजारो वाद्यांचे ताफे नाहीत तरीही त्या ट्युन्स वेडं करतात, बेहोश करतात”

राधीकाचा तो परफ्युम्सचा सुगंधच खरं तर रोहनला वेड करत होता. राधीकाने कॉफीचा एक कप त्याला दिला आणि दुसरा स्वतःला घेउन त्याच्या शेजारीच बसली.

“रोहन, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, म्हणुनच खरं तर मी तुला घरी बोलावले. मला आजकाल फार असं वाटतंय की मी मोठ्ठी चुक केली आहे. कॉलेज मध्ये एक मुलगा होता. शांत, गरीब, लाजाळु. मला माहीती आहे, त्याला मी आवडायचे. आणि कदाचीत मला पण तो थोडाफार आवडायचा. पण आमच्या जास्ती गाठीभेटी झाल्या नाहीत. त्यामुळे मी ठरवु शकले नाही. त्याचबरोबर त्यावेळेस एक प्रकारचा माज, इगो मनात होता ना, मी म्हणजे कोण ग्रेट! आत्ता वाटत त्याचवेळेस त्याच्याशी बोलले असते तर बरं झालं असतं, आज पश्चात्ताप करण्याची वेळ माझ्यावर आली नसती. तुला माहीती आहे कोण होता तो मुलगा?”, राधीकाने रोहनला विचारले.

“नाही”, रोहन उत्तरला.

एक दीर्घ श्वास घेउन राधीका म्हणाली, “तु रोहन.. तु होतास तो मुलगा. इतक्या वर्षांनंतर तुला भेटले आणी वाटलं मी तुला गमावलं रोहनं. नंतर अनेक जण भेटले, पण नकळत सगळ्यांमध्ये मी तुझाच चेहरा शोधत राहीले जो मला कध्धीच सापडला नाही.”

“अगं पणं…”, रोहनचे वाक्य अर्धवटच राहीले. राधीकाने आपले बोट त्याच्या ओठांवर ठेवले.. “श्शुssss! काही बोलु नकोस”, राधीकाने आपले हात त्याच्या मानेभोवती गुंडाळले. मला सगळे कळते रोहन, मला सगळे माहीती आहे, तु बोलायची आवश्यकता नाही. तिने आपले ओठ त्याच्या कानाजवळ न्हेले आणि त्याच्या कानात जाऊन हळुच म्हणाली, “माझ्यावर विश्वास आहे ना? मग मी सांगते तसं करं, प्रश्न विचारु नकोस. थोड्यावेळाने मला जोरात ढकल आणि फक्त म्हण ‘हे होऊ नाही शकत’”

रोहनला काहीच कळत नव्हते, तो प्रश्नार्थक नजरेने राधीकाकडे बघत होता. शेवटी त्याने होकारार्थी मान डोलावली. थोड्यावेळाने त्याने राधीकाला जोरात ढकलले. राधीका सोफ्यावरुन खाली कोसळली. पाठोपाठ रोहन तिच्यावर ओरडला, “नाही राधीका हे नाही होऊ शकत.. प्लिज!”

त्याचबरोबर मागुन “येस.. मी जिंकले.. मी जिंकले” असा कुणाचा तरी आवाज आला. रोहनने मान वळवुन मागे बघीतले तर एका खोलीतुन शरयु नाचत बाहेर येत होती. शरयुला इथे बघुन रोहनला धक्काच बसला. तो आळी-पाळीने राधीकाकडे आणि मग शरयुकडे बघत राहीला.

शरयुने जवळ येउन रोहनला अलिंगन दिले आणि मग म्हणाली, “स्वॉरी आणि थॅक्स रोहन, सांगते सगळं सांगते. ही राधीका आहे ना.. हिला फार गर्व होता कि ती कुणालाही पटवु शकते, अगदी विवाहीत माणसालाही. मग मीच तिला इमेल मध्ये म्हणलं शक्यच नाही. माझ्या नवऱ्यासारखा, रोहनसारखा शोधुन सापडणार नाही. मला सोडुन तो परस्त्रीकडे बघणारच नाही. तेंव्हा हीनेच बेट लावली होती. पण आज तु तिला खोट्यात पाडलंस, तु दाखवुन दिलंस कि तु फक्त माझाच आहेस.. थॅक्स रोहन.. खरंच थॅक्स”

रोहनला काय बोलावं अजुनही कळत नव्हतं. तो राधीकाचा झाला होता. त्याने राधीकाचे प्रेमही मगाशीच स्विकारले असते. ऐनवेळेस राधीकाने त्याच्या तोंडावर बोट नसतं ठेवले तर रोहन काहीतरी बोलुन गेला असता. त्या विचारानेच त्याला कसंतरी होतं होतं “थोडक्यात वाचलो ह्या बायकांच्या मुर्खापायी मेलोच असतो”, रोहन स्वतःशीच विचार करत होता.

थोड्यावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर रोहन आणि शरयु जायला निघाले. जाताना रोहनने एकदा वळुन राधीकाकडे बघीतले. राधीका त्याच्याकडेच बघत होती. चेहऱ्यावर मिलीयन डॉलर्स स्माईल. हसतानाच तिचा उजवा डोळा नाजुकपणे बंद होऊन परत उघडला होता. रोहनने तो बरोब्बर टिपला..”यालाच मराठीत ‘डोळा मारणं’ असं म्हणतात”, रोहनने मनाशी विचार केला.. “शरयु साठी हे सर्व एक नाटक असेल, पण राधीकासाठी हे नक्कीच नाटक नव्हते. नाहीतर जिंकण्यासाठी तिने माझ्याकडुन मगाशीच वदवुन घेतले असते की येस… आय लव्ह हर. पण तिने तसे केले नाही.. तिला तसे होऊ द्यायचे नव्हतेच. हे नक्कीच नाटक नव्हते.. आय नो.. राधीका लव्हज मी..शी इज माईन.. शी इज माय ‘एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर..‘”

[समाप्त]

एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-२]

भाग १ पासुन पुढे चालु…

कसं असतं ना.. असं म्हणतात की नवऱ्याच्या मनात काही पाप असेल तर बायकोला कळु नये म्हणुन तो तिच्याशी जास्ती प्रेमाने वागतो.. (असं म्हणतात बरं का..) दुसरा दिवस, रविवार सुट्टीचा पुर्ण दिवस रोहन ने शरयु बरोबरच घालवला. दिवसभर फिरणं, शॉपिंग, हॉटेलस. नविन आठवड्याला सुरुवात झाली आणि रोहन कामात मग्न होऊन गेला. राधीकाबद्दलचे त्याचे विचार हळु हळु कमी होत गेले.

शनिवारी संध्याकाळी रोहन टी.व्ही चाळत बसला होता इतक्यात बेल वाजली. रोहनने दरवाजा उघडला आणि समोर राधीकाला बघुन क्षणभर स्तब्ध झाला. गडद निळ्या रंगाचा सलवार-कुर्ता, हातामध्ये मॅचींग बांगड्या, डोक्यावर चढवलेला गॉगल, चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे कोसळणारे केस आणि चेहऱ्यावर तेच ते चार्मिंग स्माईल. ‘गॉर्जियस’, रोहन स्वतःशीच पुटपुटला. मागोमाग शरयु आल्यामुळे त्याला काही बोलताच आले नाही.

“सरप्राईज”, राधीका शरयुला म्हणाली, “चल लवकर तयार हो.. आपल्याला बाहेर जायचे आहे”.
“अगं पण कुठे?”, शरयु ने विचारले.

“मस्त प्लॅन आहे पिक्चरचा. दोन तिकीटं काढली आहेत. नविन हॉरर सिनेमा लागला आहे विजयला, चलं पटकनं..” शरयुला जवळ जवळ ढकलतच राधीका म्हणाली.

“आत्ता? अगं पण आधी विचारायचसं तरी!”, शरयु कपाळावर हात मारत म्हणाली.

“का? काय झालं? तुमचा काही दुसरा प्लॅन होता का?”, राधीका

“नाही गं. प्लॅन वगैरे काही नाही. आम्ही आत्ता आई-बाबांकडे जाणार होतो. आई ने पापड काढले आहेत करायला.. तर मी जाणार होते मदत करायला.”, शरयु म्हणाली.

“काय गं..:-( उद्या जा ना! मस्त आहे सिनेमा.”, राधीका निराश होतं म्हणाली.

“नाही गं. आईने सगळी तयारी करुन ठेवली असेल. उद्या परत नाही जमणार. आणि तुझ्याबरोबर सिनेमाला आले तर रोहनचे जेवायचाही प्रश्न येईल कारण आम्ही आई कडेच जेवणार होतो त्यामुळे स्वयंपाकही काही केला नाही मी”, शरयु

“श्शी बाबा.. माझंच चुकलं आधी विचारायला हवं होतं. आत्ता या तिकीटांचं काय करु? वायाच गेली म्हणायचं!”, राधीका हताशपणे तिकीटांकडे बघत म्हणाली.

दोन क्षण शांततेत गेले.

मग शरयुच म्हणाली, “नाही तर एक काम करतेस का? रोहनला घेउन जा ना सिनेमाला. तसेही त्याला आई बाबांकडे यायचे नव्हतेच. उगाच तु काढलेली तिकीटं नको वाया जायला”
रोहन या अनपेक्षीत धक्याने दचकलाच होता..”ए नाही हा. मी नाही जाणार तुला एकटीला सोडुन, आपण जाऊ नंतर सिनेमाला.”

“अरे खरंच जा रोहनं, मी आत आईबरोबर पापड करत बसणार तु तसाही कंटाळशील. त्यापेक्षा जा ना तिच्याबरोबर. आणि ती काय तुला नविन आहे का? कॉलेजपासुनची आहेच की ओळख”, शरयु.

राधीका आपल्या भुवया थोड्याश्या उंचावुन म्हणाली, “बघं गं, मला काही प्रॉब्लेम नाही, पण नंतर तुच म्हणशील माझा नवरा पळवला म्हणुन!!” आणि दोघीही हसायला लागल्या.
रोहनने लगेच आपले कपडे बदलले. राधीकाबरोबर सिनेमाला जायचे यात एकदम थ्रिल्ल होते, पण त्याच बरोबर शरयुला एकटीला सोडुन जायला ही नको वाटत होते. शेवटी काय हरकत आहे. तसेही शरयु म्हणत आहे म्हणुनच जात आहे ना, लपुन-छपुन तर जात नाहीये. उगाच त्यांचे पापड-लाटणे बघण्यापेक्षा सिनेमा बघीतलेला बरा.. असं मनाला समजावुन तो बाहेर पडला.

दार लावतानाच शरयु म्हणाली..”आणि हो.. बाहेरच काही तरी खावुन या.. घरी काही केलेले नाहीये..”

गाडीत बसल्यावर पहीले काही क्षण शांततेत गेले. रोहनचे ह्रुदय जोरात धडधडत होते. त्याचा आवाज राधीकाला ऐकु जाईल की काय या विचाराने त्याने गाडीतील एफ.एम ट्युन केले.

“सोss”, राधीका आणि रोहन एकदमच बोलले.
राधीका त्यामुळे छानसी हसली.. तिच्या हसण्याने गाडीतील ताण थोडा कमी झाला.. “बोल बोल..” राधीका रोहनला म्हणाली.

“:-) सो.. कसे वाटले ऑस्ट्रेलिया? तु परत भारतात येणार आहेस असं शरयु म्हणाली”, रोहन
“हो अरे.. कंटाळा आला मला तिकडे. भारतात जसं मस्त मोकळं, स्वतंत्र वाटतं ना तसं नाही वाटत तिकडे. आपलं असं कोणीच नाही. आणि परत सध्या भारतीयं लोकांवर चाललेले हल्ले, त्यामुळे आई-बाबा पण म्हणत होते ये इकडेच म्हणुन.. मला काय, काहीतरी कारणंच हवं होतं” राधीका बोलता बोलता वाऱ्याने उडणारे केस सावरतं म्हणाली.

पुढील काही वेळ ऑस्ट्रेलिया तेथील विद्यापिठ, नोकरीचा अनुभव यावर राधीका बोलतं होती आणि रोहन ऐकत होता.

“मग आता भारतात येउन लग्न करण्याचा विचार असेल नाही का? शरयु म्हणाली तु अजुन लग्न नाही केलेस, आश्चर्य आहे. बाकी तु अज्जीब्बात बदलली नाहीस, होती तश्शीच आहेस.”, रोहन

“नाही रे.. अजुन मनासारखा मिळालाच नाही बघ. शेवटी सगळे शरयु सारखे लक्की थोडे ना असतात.. बाकी तु मात्र खुssप बदलला आहेस हं”, राधीका

“तु पण ना..” असं म्हणत रोहनने गाडीला वेग दिला. थोड्याच वेळात थिएटर आले. गाडी पार्क करुन थिएटर मध्ये शिरताना तेथील चित्र बघुन राधीका घाबरली होती.

“तुला माहीतीए मला ना, जाम भिती वाटते भुतांची वगैरे. सगळे हसतात मला, लहान आहेस का म्हणुन. मग या वेळेला हा सिनेमा लागला तेंव्हा ठरवलेच होते, काही झालं तरी हा सिनेमा बघायचाच, एकदाची भिती घालवुनच टाकायची”, राधीका विस्फारलेल्या डोळ्यांनी बाजुची भयानक चित्रं बघता-बघता बोलत होती.

सिनेमा सुरु झाला आणि राधीकाला वाटणारी भिती, टेंन्शन अंधारातही रोहनला जाणवत होते. खुर्चीला घट्ट पकडुन राधीका ताठ बसली होती. रोहनला खरं तर मनातल्या मनात हसु येत होते, पण मोठ्या प्रयत्नांनी तो हसु दाबुन ठेवत होता.

चित्रपटामध्ये नायीका रात्रीची एकटीच जंगलातुन जात असते. कॅमेरा हळु हळु तिच्या मागुन येत असतो. सगळीकडे धुके सदृश्य धुर असतो. नायीका घाबरलेली असते तरीही पुढे पुढे जात असते. कुठल्याही क्षणी कुठुन तरी कोणी तरी येईल अशी वेळ आलेली असते. अचानक रोहन त्याच्या हाताला झालेल्या स्पर्शाने दचकला. राधीकाने त्याचा खुर्चीवर ठेवलेला तळहात घट्ट पकडला होता. रोहनने तिच्याकडे बघीतले. राधीका अजुनही डोळे मोठ्ठे करुन पडद्याकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर पसरलेली भिती रोहनला स्पष्ट दिसत होती. कॅमेरा नायीकेच्या जवळ जवळ जात होता तसं-तशी राधीकाच्या हाताची रोहनच्या हातावरील पकड घट्ट होतं होती. आणि अचानक पडद्यावर भुताची ऐंन्ट्री झाली, त्याबरोबर राधीकाने डोळे घट्ट मिटुन घेतले आणि मान रोहनच्या खांद्यावर झुकवली.

तिच्या त्या दाट-कोमल केसांचा स्पर्श, हातावरील तिची पकड आणि दंडावरील तिच्या गरम-उच्छवासाने रोहनच्या अंगावर रोमांच उभे राहीले. थिएटरमधील थंडगार ए/सी मध्येही तिच्या हाताचा गरम स्पर्श रोहनला जाणवत होता. पडद्यावरील ‘तो’ सिन संपल्यावर राधिका बाजुला झाली.

“स्वॉरी हं..” आपले केस सावरतं राधीका हलकेच रोहनला म्हणाली, “..कसला भयानक आहे सिनेमा. मी नाही बघु शकत अजुन. प्लिज आपण बाहेर जायचे? प्लिज?”

“ओ.के”, असं म्हणुन रोहन उठला, मागोमाग राधीकाही उठली आणि दोघं जण थिएटरच्या बाहेर पडले. राधीकाचा श्वासोच्छवास अजुनही जोरात चालु होता. ती अजुनही टेंन्स्ड दिसत होती.

मग रोहनच म्हणाला, “चल कॉफी पिऊ यात, तुला बरं वाटेल.”

दोघांकडेही भरपुर वेळ होता..काय घडलं असेल पुढे? वाचत रहा भाग क्र. ३

[क्रमशः]

पुढचा भाग>>

एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-१]

“अरे रोहन, रात्री जरा माझ्याबरोबर येशील प्लिज?”, शरयु ने स्वयंपाक-घरातुन हात पुसत-पुसत विचारले.

“आता कुठे? मोठ्या मुश्कीलीने शनिवार-रविवार मिळतात त्यात तुझी काम!”, रोहन नाराजीच्या स्वरात म्हणाला.

“अरे, एअर-पोर्ट वर जायचे आहे. तुला ती राधीका आठवते? आपल्या कॉलेज मध्ये होती? माझी मैत्रिण? ती येणार आहे ऑस्ट्रेलियाहुन. तिला आणायला जायचे आहे.” शरयु

राधीकाचे नाव ऐकताच रोहनचे कान टवकारले. राधीका, कॉलेजमधील एक हॉट-बेब, कुणालाही आवडावी अश्शीच. रोहनला ही आवडायची. पण तो कधी तिच्याशी याबद्दल बोलु शकला नाही. पुढे शरयुशी त्याची ओळख झाली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्न केले. ७-८ वर्षांनंतर मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असलेली ‘राधीका’ आणि तिच्या आठवणी रोहनच्या मनात उफाळुन बाहेर आल्या.

“हो.. आठवते आहे, थोडी-थोडी. पण ती कधी ऑस्ट्रेलियाला गेली?”, रोहन

“अरे, तिला तिकडच्या विद्यापिठात स्कॉलरशीप मिळाली म्हणुन शिक्षणासाठी गेली होती. नंतर काही वर्ष नोकरी सुध्दा केली तिकडे. आता भारतात परतायचे म्हणतेय. एअर-पोर्ट तुला माहीतेय ना कित्ती दुर आहे, आणि रात्रीच्या वेळी टॅक्सी-रिक्षा सुध्दा मिळत नाहीत, त्यातुन तिने एकटीने येणे म्हणजे… म्हणुन तिच्या इमेलमध्ये मीच तिला म्हणले, मी येते न्यायला म्हणुन.. प्लिज.. चल ना रे रोहन!!”, शरयु.

“एकटी? का? तिचा नवरा कुठे गेला?”, रोहन
“अरे तिचे नाही झाले लग्न अजुन तर नवरा कुठुन येणार? एकटीच आहे अजुन ती”, शरयु.

रोहनला उगाचच आनंद झाला. मग त्याने आढेवेढे घेत होकार दिला.

घड्याळाचा काटा मोठ्या मुश्कीलीने पुढे-पुढे सरकत होता. वेळ झाली तशी रोहनला पटकन उठुन आवरावेसे वाटत होते. पण उगाचच आपल्याला काहीच घेणे-देणे नाही अश्या आवेशात, उपकार केल्यासारखे तो थोडा उशीराच उठला.

“आओगे जब तुम, मेरे साजना… अंगना.. फुल खिलेंग..”, लोकल एफ-एम वर गाणं लागलं होतं. रोहन शरयु चे लक्ष नाही बघुन सारखा आरश्यात बघुन स्वतःला ठिक-ठाक करत होता. ‘कशी दिसत असेल राधीका आता? होती तश्शीच असेल का बदलली असेल?’, मनात विचारांचे चक्र चालु होते. शरयुशी नजरा-नजर तो शक्यतो टाळत होता. आपल्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावरील ओसंडुन वाहणाऱ्या उत्साहवर त्याचेच नियंत्रण नव्हते. उगाचच शरयुला काही-तरी वाटेल म्हणुन तो तिच्याकडे पहाण्याचे टाळत होता.

एअर-पोर्ट वरील राधीकाची फ्लाईट एक तास उशीरा आहे कळल्यावर रोहन मनोमन अतिशय चरफडला होता. मनातली आगतीकता दाखवु न देता तो शक्यतो नॉर्मल रहाण्याचा प्रयत्न करत होता.

शेवटी ‘सिडने’ वरुन येणारी फ्लाईट उतरली आणि रोहनची नजर गेट कडे लागली. थोड्याच वेळात त्याला राधीका येताना दिसली. लाल रंगाचा गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक, तिचा ट्रेड-मार्क असणारा गॉगल, नेहमीच्याच स्टाईल-मध्ये केसांमध्ये अडकवलेला, खांद्याला पर्स, हातात स्ट्रॉली आणि दुसरा हात सतत चेहऱ्यावर कोसळणारे केस सावरण्यात. अगदी तश्शीच जशी रोहनने तिला शेवटचे पाहीले होते. किंबहुना वय वाढुनही अंगी बळावलेल्या आत्मविश्वासाने चेहरा, चालण्यातील ठसका अधीकच मन मोहुन घेणारा.

रोहन उगाचच आपले लक्ष नाही असे दाखवत इतरत्र बघत होता, तरीही शक्य असेल तेंव्हा तो तिच्याकडे बघत होता.

“ए.. ती बघ राधीका आली”, शरयु राधीकाकडे बोट दाखवत रोहनला म्हणाली, आणि तिच्याकडे जवळ-जवळ धावतच गेली.

ह्रुदयाची वाढलेली धडधड, श्वासाचा वाढलेला वेग, हाताला आणि पायाला सुटलेला कंप रोहनला जाणवत होता. दीर्घ श्वास घेउन तो आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करत होता. इतक्या वर्षांनंतर राधीका ओळखेल का आपल्याला? काय बोलेल? आपण काय बोलायचे याचाच विचार मनात चालु असताना राधीका आणि शरयु त्याच्या जवळ पोहोचले सुध्दा.

“हाय रोहन.. ओळखलंस?”, राधीकाने आपली मिलीअन डॉलर स्माईल देउन रोहनकडे बघत हात पुढे करुन विचारलं

“म्हणजे काय? ओळखलं ना!”, रोहनने तिच्याशी हात मिळवत उत्तर दिले. तिच्या स्पर्शाने रोहनच्या अंगातुन विज सळसळली.

“अरे, कित्ती बदलला आहेस तु? स्मार्ट झाला आहेस अजुन. शरयु लकी आहे हं” असं म्हणुन राधीका पुढे चालु लागली.

राधीकाच्या त्या अनपेक्षीत वाक्याने रोहनं एकदम खुष झाला. गाडीमध्ये शरयु आणि राधीकाच्या जोर-जोरात गप्पा चालु होत्या. रोहन जणु त्यांच्यात नव्हताच. रोहनही आपले जणु लक्ष नाही दाखवत होता, परंतु त्याचे पुर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होते. मधुनच तो आरश्यातुन राधीकाला न्याहाळत होता. एका बेसावध क्षणी अचानक आरश्यात त्याची आणि राधीकाची नजरानजर झाली तसा तो चपापला. मग मात्र त्याने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले.

रात्री बिछान्यावर पडल्यापडल्या रोहन राधीकाबद्दल विचार करत होता. शरयु स्वयंपाकघरातुन आवरुन बेडरुम मध्ये आली. आवरुन झाल्यावर ति रोहन शेजारी पांघरुणात शिरली आणि रोहनला बिलगली. रोहनने तिच्या विनंतीला मान देउन तिच्याबरोबर आला म्हणुन शरयु खुष होती. रोहनला इतक्या वेळानंतर प्रथमच शरयुची जाणीव झाली. “काय करतो आहेस रोहन तु? तुझ्या लग्नाला चार वर्ष होऊन गेली. शरयु तुझी बायको आहे आणि तु परस्त्रीचा विचार करत आहेस? शोभते का तुला? अरे कोण कुठली राधीका? किती वेळा बोलला आहेस तिच्याशी तु कॉलेज मध्ये? सगळे कॉलेज तिला ‘फ्लर्ट’ म्हणुन ओळखायचे, तिच्यासाठी तुला बायकोचा विसर पडला? शेम.. शेम”.. रोहनला स्वतःच्याच कृत्याची लाज वाटली. मग त्याने मोठ्या कष्टाने राधीकाला मनातुन तात्पुरते का होईना दुर केले आणि दिवा मालवुन तो शरयुला जवळ घेउन झोपी गेला.

राधीकाच्या मनात काय होते? तिलाही रोहन-बद्दल आकर्षण वाटले होते का? त्या दोघांमध्ये काही केमीस्ट्री शिजत होती का? सर्व काही पुढील भागात.. :-)

[क्रमशः]

पुढचा भाग>>

आवाज….

बहुतांश लोकांची आयुष्याची सुरुवात “टॅहॅ.. टॅsssहॅ” च्या खणखणीत आवाजाने होते आणि त्यानंतर आयुष्यबर निरनिराळे आवाज मनुष्याच्या कानावर कळत नकळतपणे पडत असतात.

लहानपणी गालावर कळी खुलवणारा आई-बाबांचा आवाज थोडं मोठ्ठ झाल्यावर खेळ सोडुन आभ्यासासाठी बोलावणारा आवाज त्रासदायीक ठरतो. ‘धप्पा, भोज्जा, आऊट, सिक्स, लगोरीsss, डबडा-ऐस-पैस’, मित्र-मैत्रिणींच्या हाका, शाळांमधील गाणी, गोष्टी, जनगणमन, एक-साथ नमस्ते पासुन गुड-मॉर्निंग टिचर पर्यंत. टि.व्हि. शी नाते जमले की कार्टुन्स, विविध जाहीराती, गाणी, पुढे पुढे सिनेमे. हळुहळु गजराचा आवाज आयुष्याचा अनभिज्ञ भाग होऊन जातो. कधी अभ्यासासाठी तर कधि नोकरीसाठी आयुष्य गजराच्या आवाजाचे गुलाम होऊन जाते.

टेलिफोनचा आवाज, मोबाईल्सच्या रिंगटोन्स, निवडणुकीतील ‘आवाज कुणाचा’, तर गणपतीमधील ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि विसर्जन मिरवणुकीमधील ढोलताशे ते स्पिकर्स च्या मोठमोठ्या भिंतींमधील धडधड. बसगाड्यांचे आवाज, गाड्यांचे हॉर्न्स, रेल्वे-गाडीची धडक-धडक, प्लॅटफॉर्म्स वरील अनॉउन्समेंन्ट्स. टाईपराईटर्सचा तालब्ध्द आवाज ते पंख्याची संथ घरघर. कोकीळेची कुहु-कुहु पासुन सिमेलगतच्या गावात ऐकु येणारे बॉम्ब गोळ्यांचे आवाज.

कित्ती वैविध्य आहे प्रत्येक आवाजात. लता मंगेशकर आणि आशा भोसले, बहीणी-बहीणी असुनही दोन टोकांचे आवाज. खरंच कित्ती आवाज ऐकत असतो माणुस आयुष्यभर कळत-नकळत..प्रत्येक आवाजाला प्रत्येकाची निराळी प्रतिक्रिया..

एकच आवाज.. एकच आवाज माणुस ऐकु शकत असुनही कित्तेक वेळा त्याचा गुलाम होऊ शकत नाही. परिस्थीतीपुढे हतबल होऊन माणुस तो आवाज दुर्लक्षीत करतो.. मनाचा आवाज.. आपला आवाज, आपल्या सगळ्यात जवळचा आवाज.. जबाबदारीमुळे, परिस्थीतीमुळे कित्तेक वेळा माणुस मन मोडुन, मनाचा आवाज दुर्लक्षीत करुन वागत रहातो.

मनाचा आवाज..इतक्या जवळचा असुनही इतक्या लांबचा. भगवंता, शक्ती देशील का रे तु मनुष्याला त्याच्या मनाचा आवाज ऐकण्याची, त्याप्रमाणे वागण्याची? बदलु शकशील का रे तु व्याख्या ‘स्वार्थी, मतलबी’ शब्दांची? का घंटाच्या घणघणातात, प्रार्थनेच्या आवाजात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आमच्या मनाचे आवाजच एवढे क्षिण पडले आहेत की ते पोहोचतच नाही आहेत तुझ्या पर्यंत??

सिंड्रेला (रिलोडेड)

एक आटपाट गाव होते. त्या गावात ‘सिंड्रेला’ नामक एक अतीशय फटकळ, आगाऊ, उध्दट मुलगी रहात होती. येता जाता लोकांना घालुन पाडुन बोलणे, आई वडीलांचा उध्दार करणे यातच तिचा हातखंडा होता. दिसायला बरी असली तरी त्याचा तिला माज होता. स्वतःला मारे ‘बिप्स’ (बिपाशा बासु) समजत असे. पोरीला जन्म देताच आई देवाघरी केली. पोरीच्या त्रासाला कंटाळुन बापाने दुसरे लग्न केले, निदान आई मुळे पोरगी सुधारेल. पण घडले उलटेच, त्या बिचाऱ्या सावत्र-आईचा सासुरवास चालु झाला. सिंड्रेला ने तिचे जगणे नकोसे करुन टाकले होते..

सावत्र आई: “बेटा सिंड्रेला, सकाळचे ११ वाजले आहेत. तुझ्या दोनही बहीणींनी घरातला केर काढुन घेतला आहे. घर स्वच्छ पुसुन झाले, बागेत पाणी मारले. मी तुझ्या साठी ब्रेकफास्ट बनवला आहे. उठतेस का आता?”

सिंड्रेला: “(डोळे चोळत उठते), अगं भवाने, झाली का तुझी पिरपीर सकाळ पासुन सुरु? बापाला कुठुन अवदसा आठवली अऩ तुला आणला घरात. जा आण गिळायला काहीतरी आणि तुझ्या त्या भिक्कारड्या पोरींना पाठव माझे पाय दाबायला, फुट्ट”

थोड्या वेळाने तिच्या दोन बहीणी दबकत दबकत आत मध्ये येतात. एक कोपऱ्यात मान खाली घालुन उभी रहाते, तर दुसरी वाहणारे नाक फाटक्या ड्रेसच्या बाहीला पुसत पुसत उभी असते.

सिंड्रेला: “आत्ता!!, काय ओवाळु का तुम्हाला? चला कामाला लागा! काल डान्स बार मध्ये नाचुन नाचुन तुकडे पडले पायाचे, चेपुन द्या निट!”

दोघी बहीणी, लगबगीने पुढे येउन कामाला लागतात.

सिंड्रेला: “(समोर ठेवलेला ब्रेकफास्ट घश्यात कोंबत असते. मध्येच खाताना ठसका लागतो.), ए नटवे, जा आय कडनं घश्यात ओतायला काहीतरी थंड घेउन ये, नरड्यात आग पडलीय, पळ पटकन!”

सिंड्रेलाच्या दोन सावत्र बहीणी आणी तिची सावत्र आई, तिच्या त्रासापुढे हतबल झालेले असतात.

तेवढ्यात खाली दवंडी पिटवणारा येतो.
आपल्या राज्याचे राजकुमाराचे स्वयंवर आयोजीत करण्यात आले आहे. राज्यातल्या सर्व कुमारींना आज रात्री राजवाड्यात आयोजीत करण्यात आलेल्या संगीत समारंभाला जाहीर आमंत्रण देण्यासाठी, ही दवंडी वाजवत आहे होssssss!

एक बहीण सिंड्रेला ला घाबरत घाबरत विचारते, “ताई, तु जाणार आज स्वयंवराला?”
सिंड्रेला, “अगं टवळे, ऐकले नाहीस काय सांगीतले ते? सर्व ‘कुमारींना’ बोलावले आहे. मी काय…!!!’ पण नंतर सिंड्रेला विचार बदलते, जाऊन तर येउ, बघु काय प्रकार आहे तो. सिंड्रेलाच्या बहीणी सिंड्रेलाचा बदला घेण्याचा विचार करतात. तिला खाण्यातुन झोपेचे औषध देऊन तिला खोलीत कोंडुन ते निघुन जातात. सिंड्रेलाला जाग येते तेंव्हा तिला फसवले गेल्याची जाणीव होती. अतीशय संतापाने ती जोरजोरात ओरडायला आणि रडायला लागते. तिचा आवाज ऐकुन तिकडुनच जाणा़ऱ्या एका परीला तिची दया येते.

परी: “मुली, का रडत आहेस? काय झाले? मी काही मदत करु शकते का?”

सिंड्रेला: “ए नौटंकी, तु नाही तर काय तुझा ‘बा’ मदत करणार? मला राजपुत्राच्या स्वयंवराला जायचे आहे. मला एकदम टकाटक कपडे हवेत, त्यावर मॅचींक ऍक्सेसरीज, सुंदर चप्पला आणि गाडी हवी आहे”

परी: “अगं, तिथला डि.जे. एवढा काही खास नाहीये असं ऐकले आहे. त्यापेक्षा दोन चौक पलीकडे बार मध्ये एक मस्त पार्टी रंगली आहे, पाहीजे तर मी तुला तिकडे न्हेउन सोडते”

सिंड्रेला: “नाही नाही नाही, मला राजपुत्राच्या स्वयंवरालाच जायचे आहे”

परी: “ठिक तर मग. तुला जे काही हवे आहे ते सगळे मिळेल, मात्र एक लक्षात ठेव, १२ वाजायच्या आत तुला घरी परतावे लागेल. तसे झाले नाही तर तुझा चेहरा विद्रुप होऊन जाईल”

सिंड्रेला तिची अट मान्य करते आणि तिने दिलेले कपडे घालुन राजवाड्यावर जाऊन पोहोचते.

******

राजवाड्यामध्ये संगीत मैफील जमलेली असते. गावातल्या कुमारी राजकुमाराला रिझवण्यासाठी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य करुन दाखवत असतात त्याच वेळेस सिंड्रेलाचे राजवाड्यात आगमन होते. असल्या टुकार गाण्यांवर सिंड्रेलाला नाचण्याची सवय नसते. ती सरळ तिथल्या डि.जे. कडे जाते..

सिंड्रेला, “मुडदा बशीवला तुझा!!, असली सडकी गाणी लावण्यापेक्षा एक लावुन गटारात जाउन पड मेल्या. चल लाव ‘बिडी जलैले’ लाव बिप्स चे!

डि.जे. गाण बदलतो. सिंड्रेला झोकुन नाचण्यात मग्न होते. राजकुमारालाही आपले जुने दिवस आठवतात. तो पण डिस्को-थेक वर उतरतो, खिश्यातील नोटांची जुडी काढतो आणि सिंड्रेला वर पैश्यांची उधळण करतो.

वेळ कसा जातो कळतच नाही आणि घड्याळात १२ चे ठोके पडतात. त्याचबरोबर सिंड्रेला भानावर येते आणि राजवाड्यातुन पळत सुटते. राजकुमारही तिच्या मागे धावत सुटतो. पळताना सिंड्रेलाचा एक बुट निघुन पडतो. सिंड्रेलाच्या विरहाने दुःखी झालेला राजपुत्र एका हातात सिंड्रेलाचा बुट तर दुसऱ्या हातात बियरचा ग्लास घेऊन प्रतिज्ञा करतो की उद्या जिच्या पायात हा बुट बसेल ती माझी राणी होईल.

दुसऱ्या दिवशी सर्व गाव भर राजपुत्र आणि त्याचे सैनिक गावभर तो (वास मारणारा, भद्दासा) बुट घेउन फिरत असतात पण कुणाच्याच नाजुक पायात तो भला मोठ्ठा बुट बसत नाही. मजल-दर-मजल ते सिंड्रेलाच्या घरी येउन पोहोचतात.

सिंड्रेला नाटकी-पणाने लाजुन मान खाली घालुन बसलेली असते. राजकुमार हातात तो बुट घेउन सिंड्रेलाच्या जवळ येतो. एका हाताने तिचा पाय उचलुन तो त्या बुटात घालतो आणि तो बुट तिला बरोब्बर बसतो.

सिंड्रेला हळु हळु आपली मान वर करत राजकुमाराकडे बघते, राजकुमारही सिंड्रेलाकडे बघतो. दोघंही जोरात किंचाळतात. कालचा मेक-अप दोघांचाही उतरलेला असल्याने दोघांचेही भयानक, विद्रुप, कुरुप चेहरे एकमेकांना दिसतात.

राजकुमार तो बुट फेकुन देतो आणि घराबाहेर पडुन रस्त्याने वेड्यासारखा पळत सुटतो. सिंड्रेला आपल्या दातांची फळकुटं बाहेर काढुन अर्धवट रडत, अर्धवट हसत आपल्या खोलीत निघुन जाते.

कसं काढु मी ‘तिला’ मनातुन बाहेर?

शेवटी आज धीर करुन ‘ति’च्या बद्दल लिहीण्याचेच ठरवले आहे. देवासमोर एकच प्रार्थना आहे, “प्लिज हा पोस्ट बायकोच्या नजरेस पडुन देउ नकोस”. बायकोने जर हा पोस्ट वाचला तर तिला काय वाटेल? एक असताना दुसरीचा विचार? पण काय करु? मोह, माया या अश्या गोष्टी आहेत ज्याच्यावर माणसाने अजुनही विजय मिळवलेला नाहीये.

लग्नानंतर काही वर्षातच तिची आणि माझी नजरानजर झाली. पहिल्यांदा ओझरतीच दिसायची, पण नंतर बऱ्याच वेळेला नजरानजर होऊ लागली. ती नेहमी आपल्याच तोऱ्यात असायची, मी मात्र एका जागी स्तब्ध होऊन ती नजरेआड होई पर्यंत तिला डोळे भरून पहात असे. तिचे ते रुप काळजात घुसले होते. वाटायचे ही आपली झाली तर? पण छे, कसं शक्य आहे, घरी एक असताना!!

‘तिला’ मिळवण्यासाठी खरंच सांगतो मी काहीही करु शकतो, तिच्यावर कित्तीही पैसे उधळण्याची, खर्च करण्याची माझी तयारी आहे. खरं तर पोराच्या शिक्षणासाठी पैसे साठवण्याचे दिवस, पण तरी दुसरे मनं शांत बसुन देत नाही. या वयात असले ‘धंदे नाही करायचे तर मग काय म्हातारे झाल्यावर करायचे का?’

माझ्या स्वप्नांवर खरं तर फक्त बायकोचाच हक्क असावा, रोज माझ्या स्वप्नात तीच यावी असं नेहमी वाटायचे, आता ही वाटते, पण हळुच, चोरुन स्वप्नातही आजकाल ‘तिचा’ शिरकाव झाला आहे. स्वप्नात ‘तिच्या’ बरोबर घालवलेले काही तास, तिच्या बरोबर पावसाळी संध्याकाळी केलेली लॉंग ड्राईव्हच्या आठवणी ही दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर रोमांच फुलवतात.

एकदा वाटतं मनमोकळे पणाने बायकोला सांगुन टाकावे, मनावरचा ताण तरी हलका होईल. पण ती कशी रिऍक्ट करेल? काय म्हणेल मला? आणि म्हणुनच तर शेवटी ब्लॉग लिहायला घेतला. शेवटी मनातले बाहेर काढण्यासाठीच, मन मोकळे करण्यासाठीच तर ब्लॉग असतो नाही का?

काय करावं? आधीची असताना दुसरीच कसं जमवावं? दुसरीसाठी पहीलीला सोडुन दिले तर? बाहेर किती भिषण परीस्थीती आहे! कित्ती खराब आहे मार्केट, रिसेल व्हॅल्यु पण येणार नाही. वर्ष तर झालं स्विफ्ट घेउन आणि स्कॉर्पियोचा विचार चालुच आहे. परवडणार आहे का तुला? पैसे जमवं न निट, तोपर्यंत स्विफ्ट आहेच की, झक्कास गाडी आहे. बायकोला स्कॉर्पियो बद्दल काही बोलु नकोस अजुन, आधीच शिव्या खाल्या आहेस ना तिच्या, एवढी मोठ्ठी गाडी आपल्याला काय करायची आहे म्हणुन? मग? ते काही नाही. काही दिवस कळ सोस, मग स्कॉर्पियो तुझी होईलच यात शंकाच नाही. ‘ति’ तुझीच आहे, आणि तुझी होईलच यात शंका नाही.

अर्र.र्र.. माफ करा हं. मी संदिग्ध बोललो का? अहो मी स्कॉर्पियो गाडी बद्दल बोलत होतो. घरी नुकतीच घेतलेली स्विफ्ट असताना, दुसरीचा विचार कसा करणार, परवडत नाही हो.. बाय द वे.. तुम्हाला काय वाटलं मी कशाबद्दल बोलत आहे???

तेंडुलकर दुधवाले

नेहमीच्या वेळेस सकाळी दुधवाल्याने बेल वाजवली, दार उघडले आणि तोंडातुन अचानक शब्द बाहेर पडला ‘आईला..!!’ दारात चक्क ‘सचिन तेंडुलकर’ उभा होता. “अरे सचिन तु? मी कुठल्या स्पर्धेत ‘लकी ड्रॉ’ वगैरे जिंकलो की काय?”

सचिन: “नाही नाही.. आजपासुन मीच रोज दुध टाकायला येणार आहे!”
मी: “तु?? दुध?? काही कळाले नाही बाबा!!”
सचिन: “अरे दुधाच्या धंद्यात उतरलो नाही का मी!! सध्या तसेही काही काम नाहीये मला. वर्ल्ड कप काही मी खेळत नाहीये, इतक्यात दुसऱ्या महत्वाच्या क्रिकेट मॅच पण नाहीत. मंदी मुळे ‘तेंडुलकर्स’ चा पण धंदा जरा बसलाच आहे, त्यामुळे ह्या धंद्यात उतरलो बघ!”
मी: “अरे पण तु रोज जा ये कसे करणार? फेरारी आहे तुझी, पण ती थोडी ना परवडणार तुला. एक तर कस्टम ड्युटी सुध्दा तु भरली नाहीस, पेट्रोलसाठी मात्र तुच टाकतोस ना रे बाबा? का ते पण स्पॉन्सर्ड?”
सचिन: “आता काय सांगु? लोकांचे एवढे प्रेम आहे माझ्यावर नाही म्हणवत नाही रे. मी दुधाच्या धंद्यात उतरत आहे म्हणल्यावर सगळ्या दुधवाल्या भैय्यांनी मिळुन मला एक बुलेट आणि दुधाच्या ४ मोठ्ठ्या बरण्या भेट दिल्या आहेत त्याच वापरणार भांडवल म्हणुन या धंद्यात.”
मी: “मज्जा आहे बाबा तुझी, अजुन काय उद्योग करणार आहेस?”
सचिन: “भारतीय संघाची स्पॉन्सरशिप मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघाने फक्त तेंडुलकर्स दुधच पिले पाहीजे”
मी: “सहीच.. आणि मध्ये ते २०० मुलांना जेवु-खाऊ घातलेस, त्यांना दत्तक घेतलेस, बऱ्याच दिवसांनी तुझ्या हातातुन काही सुटल्याचे ऐकण्यात आले बघ!”
सचिन: “नाही रे, मी नेहमीच काही ना काही तरी सार्वजनीक कार्य करत असतो, फक्त त्याचा उल्लेख करत नाही बघ. आता हेच बघ ना, न्युझीलंड मध्ये मी पहीले शतक ठोकले आणि लगेच ते तेथील नष्ट होत चाललेल्या वाघांना अर्पण केले”
मी: “अरे तुझे शतक घेउन ते वाघ काय करणार? त्यापेक्षा ‘मॅन ऑफ द मॅच’ चे पैसे वगैरे दिले असतेस तर…”
सचिन: “.. बर चल जातो मी आता, आजुन बऱ्याच ठिकाणी दुध टाकायचे आहे, आणि जास्ती बोलवत नाही रे, ते आयडीया च्या स्किम मध्ये माझा नंबर देउन बसलो आणि इतके लोकांचे फोन येतात ना. दमछाक झाली आहे बघ. त्याचाच परीणाम मुंबई-इंडीयन्स मधील माझ्या कामगिरीवर झाला.. बरं जाउ देत जातो आता”

कित्ती मेहनती आहे बिच्चारा, पोटा-पाण्यासाठी काय काय करावे लागते आहे. सचिनच्या या नविन कामाला मनापासुन शुभेच्छा देउन मी दार लावुन घेतले.

या चिमण्यांनो परत फिरा रे

.. अश्या रीतीने चॅम्पीयन (?) भारतीय संघाचे T20 विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. साखळी स्पर्धेतील बांग्लादेश आणि आयर्लंड विरुध्दचे डचमळीत विजय बघता तज्ञांनी याचा अंदाज बांधलाच होता. पुन्हा एकदा भारतीय संघाची मदार असलेली फलंदाजी नेहमीप्रमाणे कोलमडुन गेली. ‘लिडींग फ्रॉम फंट’ म्हणवणारा भारतीय कॅप्टन धोनी यावेळेस ‘सपोर्टींग फ्रॉम बॅक’ सुध्दा करु शकला नाही. सर्व मॅचेस मध्ये त्याचे कप्तानी नेतृत्व, यष्टीरक्षण आणि फलंदाजीतील कामगीरी निराशाजनक ठरली. गंभीरने फारच निराशा केली. रैनाला सुरुवातीला धोनीमुळे संधी मिळु शकली नाही, परंतु मिळाल्यावर आय.पी.एल मधील आपला फॉर्म तो कायम ठेवु शकला नाही. या विरुध्द जवळ जवळ सर्वच सामन्यात गोलंदाजांनी चांगलीच कामगीरी केली.

असो.. डोक्यावर चढवलेला भारतीय संघ आणि डोक्यात गेलेला धोनी आता जमीनीवर येतील अशी आशा करुयात.

इंग्लंड संघाचे आभार. त्यांच्यामुळे अनेक भारतीय पाठीराख्यांना यापुढे निरर्थक जागरण टाळुन शांत झोप घेता येईल. कित्तेक टेलीव्हिजन बंद असल्यामुळे तेवढीच उर्जा वाचेल. भारतीय संघ चुकुन-माकुन काल जिंकला जरी असता तरी सेमीज मध्ये जायची खरं सांगायचे तर लायकी वाटत नव्हती. आणि गेला जरी असता तरी तेथे सपाटुन आपटला असताच.

सगळ्यात शेवटी, भारतीय संघाला आयर्लंड सारख्या नवख्या संघाकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे. भविष्यात भारताने आयर्लंड संघाबरोबर अधीक सामने आयोजीत करावेत असे मनोमन वाटते.

‘या चिमण्यांनो ..परत फिरा रे… घराकडे आपुल्या..
सगळ्या मॅचेस आपण हारल्या..!!’

ऍडव्हेंचर्स ऑफ टिनटिन

मराठी माध्यमातुन शिक्षण असल्याने लहानपणी इंग्रजी प्रकार कमीच वाचनात आला. परंतु “ऍडव्हेंचर्स ऑफ टिनटिन” ची मात्र सगळी पुस्तक वाचुन झाली आहेत आणि आता त्याच्या एपिसोड्सची डि.व्ही.डी सुध्दा संग्रही आहे.

बेल्जीयन आर्टीस्ट हर्ज (Hergé) हा टिनटिनचा जन्मदाता. १० जानेवारी १९२९ रोजी बेल्जीयन पेपर मध्ये पहिल्यांदा टिनटिनची मालीका ‘कॉमीक-स्ट्रिप’ म्हणुन प्रसिध्द झाली. सर्व कथानक फिरत रहातात टिनटिन- बेल्जीयन रिपोर्टर आणि त्याचा पेट-स्नोवी यांच्या भोवती. अनेक गुन्हे हा टिनटिन उधळवुन लावतो त्याच्या कथा २४ गोष्टींमधुन प्रसिध्द झाल्या आहेत. जवळ जवळ ५० भाषांमधुन ही पुस्तक प्रसिध्द झाली आहेत.

त्याच्या ह्या गोष्टींमध्ये प्रमुख व्यक्तीरेखा आहेत कॅप्टन हॅडॉक, थॉम्पसन ऍन्ड टॉम्पसन, प्रोफेसर कॅल्क्युलस आणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा रॅस्टापॉप्युलस. कॉमीक्स वाचायला जेवढी मज्जा येते तेवढीच मज्जा त्याचे ऍनीमेशन सिरीज बघताना येते.

निखळ मनोरंजन आणि काहीशी ‘बॉईज थिंग’ असलेले टिनटिन कॉमीक वाचनीय आणि बघणीय सुध्दा.

टिनटिन बद्दलच्या अधीक माहीतीसाठी किंवा त्याच्या पुस्तकांच्या स्टोरी-लाईनसाठी इथे टिचकी मारा किंवा टिनटिनची सर्व अती-उत्तम कॉमीक्स संगणकावर उतरवुन घेण्यासाठी इथे भेट द्या ->

‘ते’ तीन तास

गोष्ट फार पुर्वीची, १० एक वर्षांपुर्वीची, जेंव्हा मी काही कामासाठी मध्य-प्रदेशातील एका छोट्याश्या खेडेगावात गेलो होतो. तेथीलच एका हॉटेलमध्ये ३ दिवस मुक्काम होता. माझ्या बरोबर माझा एक मित्र पण होता जो याआधी १-२ दा येउन गेला होता. हॉटेलचा मॅनेजर ही चांगला ओळखीचा होता. आम्ही हॉटेलवर पोहोचलो तेंव्हा तो ‘कामा’त बिझी होता. नंतर त्याने एका बाईशी ओळख करुन दिली आणि म्हणाला ‘काही’ हवे असेल तर सांगा, ही संध्याकाळी पाठवुन देइल. आम्ही नम्रपणे नकार दिला.

उकाडा ‘मी’ म्हणत होता. तापमान नाही म्हणलं तरी ४६ च्या आसपास होते. घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यात खोलीला असलेले पत्रे खोलीमधील उष्णता अजुनच वाढवत होते. म्हणुन मग रात्री जेवणं वगैरे उरकुन झाल्यावर आम्ही वऱ्हांड्यात गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात हॉटलचा मॅनेजर आला आणि नाकाला बोट लावत म्हणाला, ‘कुछ भेज दु रुम मै?’ म्हणलं.. “नही भैय्या कुछ नही चाहीये..”

‘अरे आपसे जादा पैसे थोडे ना लुंगा? आप जो चाहे दे देना. एक बार देख तो लो..’ असे म्हणुन त्याने कुणाला तरी हाक मारली. बाहेरुन दोन मुली आमच्या इथे आल्या. आम्ही म्हणालो..’अरे नही चाहीये क्यु पिछे पडे हो?.. ले जाओ इन्हे!!’ मग त्यातील एका मुलीने भावाची घासाघीस चालु केली.. ‘चलो.. आधा पैसा दे देना.. बाबु (मॅनेजर) के खातीर!’ आम्ही ठामपणे नकार देत होतो. तेवढ्यात हॉटेलचा एक नोकर धावत धावत आला आणि बाबुच्या कानात काहीतरी पुटपुटला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. एकदा त्या मुलींकडे आणि एकदा आमच्याकडे तो आळीपाळीने पाहु लागला. त्याला पाहुन काय झाले तेच कळेना. मग तोच एकदम म्हणाला..’मर गये.. पोलीस की रेड पडी है!, अगर इनको यहा पे देख लिया तो हम सब अंदर जायेंगे’

‘अरे हम क्यु अंदर जायेंगे? हमने नही बुलाया इनको यहा पे!.. तुम ही लेके आये हो!.. तुम संभालो जो करना है!!’, आम्ही आमची बाजु संभाळण्याचा प्रयत्न केला.

‘बताके देखो पोलीस को.. वो थोडीना मानने वाले है!!. सबसे पहले तो यहा पे कुछ नही सुनेंगे, पहले हथकडी डालके पोलीस थाने.. फिर वहा समझाना उनको!!’ बाबु.

‘अब क्या करेंगे?’ आम्ही.
‘एक तरीका है, मै आप सब लोगोंको आपकी रुम मै बंद करके बाहर से ताला लगा देता हु. पुलीस सिर्फ उसी कमरोंको तलाशती है जिसमै कस्टमर ठहरे है! आपको सिर्फ अंदर चुप रहना है जबतक पुलीस नही जाती’, बाबु

आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, लगेच आम्ही खोलीत घुसलो. बाबुने बाहेरुन कडी आणि कुलुप लावुन टाकले. थोड्याच वेळात बाहेरुन पोलीसांचे, त्यांच्या बुटांचे आवाज यायला लागले. शेजारची खोली उघडली गेली होती. थोडावेळ चौकशी करुन ते पुढे गेले. आमचा थरकाप उडाला होता. खोलीमध्ये अंधार, पंखा, दिवा काही चालु नाही. उकाड्याने आणि भितीने घामाच्या धारा लागल्या होत्या. पाय थरथर कापत होते. त्या दोन मुलींना मात्र कसलेच भय नव्हते, त्यांची काही तरी खुस-पुस चालु होती. त्यांचा ‘धंद्याचा टाईम’ वाया चालला होता याची जास्त काळजी होती. आम्ही मात्र जाम टरकलो होतो. थोडा वेळ शांततेत गेल्यावर बाहेरुन परत आवाज यायला लागले. थोडा कानोसा घेतल्यावर लक्षात आले की काही पोलीस मंडळी आणि बाबु बाहेर व्हरांड्यात पेय-पान करायला बसले आहेत. नशीब इतके खराब ना की आम्ही व्हरांडा म्हणुन या बाजुची खोली घेतली होती आणि आता आम्ही पश्तावत होतो. त्यांच्या गप्पांचे आवाज स्पष्ट ऐकु येत होते. बाबु हर-तऱ्हेने त्यांची काळजी घेत होता. सोडा आण, चकाणा आण, वेगवेगळी पेय आण चालुच होते.

आत मध्ये आमची काय अवस्था झाली होती आम्हालाच माहीत. घड्याळ्यातील सेकंद काट्याची टक-टक आणि छातीच्या ठोक्यांची धडधड सुध्दा आम्हाला ऐकु येत होती. पोटामध्ये खड्डा पडला होता. घश्याला कोरड पडली होती. ओठांवरुन वारंवार जिभ फिरवुन आणि आवंढे गिळुनही काही फरक पडत नव्हता. कानशीलं गरम झाली होती. हातांची सारखी चुळबुळ चालु होती. प्रत्येक सेकंद कित्तीतरी मोठ्ठा वाटत होता. काहीतरी आवज होईल या भितीने पापणी हलवायलाही भिती वाटत होती.

मनामध्ये काळजीचे काहुर उठले होते. “या पोरींनी कंटाळुन काही गडबड केली म्हणजे? यांना तर असले प्रकार नेहमीचेच. पण आमचे काय? पकडलो गेलो तर? घरी कळले तर? छी-थु होईल, काय म्हणतील सगळे? परत पोलीस-केस झाली तर पुढे पासपोर्ट मिळवण्यात अडचण.” नाही नाही ते विचार डोक्यात येत होते. माहीत असतील नसतील तेवढ्या सगळ्या शिव्या मनातल्या मनात बाबुला घालुन झाल्या होत्या. एकदा.. जे केलेच नाही त्याची भिती कशाला बाळगा, पोलीसांवर विश्वास ठेवु, बाहेर जाउन जे घडले ते सांगुन टाकावे असाही विचार मनात डोकावुन गेला. पण एकतर आपण परराज्यात, इथे कुणाशी ओळख नाही. त्यात हे असले खेडेगाव, फोन लावायचा म्हणलं तरी लगेच लागेल याची खात्री नाही म्हणुन मग तो विचार काढुन टाकला.

घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. २.३०-३ तास होऊन गेले, तसे एक एक करत पोलीस लोक उठुन निघुन गेले. नंतर १५-२० मिनीटांनी बाबुने दरवाजा उघडला. घामाने आम्ही चिंब झालो होतो. हात-पाय अजुनही थरथरत होते. आमच्याकडे बघुन ‘त्या’ मुलींनाही हसु आवरले नही..’क्या रे.. इतना क्या डरनेका? थोडा पैसा दिया इन लोगोंको तो हो जाता है काम. और हमारा क्या है.. जादासे जादा एक बार फोकट मै जाना पडेगा इनके साथ.. आपने हमारे धंदे-के टाईम खोटी किया!’ असं म्हणुन फिदी-फिदी हसत निघुन गेल्या.

परत आल्यानंतर उगाच कुणाला हा किस्सा सांगुन उगाच कशाला आपलं हसं करुन घ्या म्हणुन ह्या बाबत कुणाकडेच वाच्यता केली नव्हती. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘मनातले’ ह्या ब्लॉग वाटे मनात दडलेले ‘ते’ तीन तास बाहेर पडले.

.. त्याने वाटले घटस्फोटाचे पेढे

दैनिक सकाळ मधील या बातमीने आज माझे लक्ष वेधुन घेतले. विदर्भातील एका युवकाने बराच संघर्ष करुन घटस्फोट मिळवला आणि चक्क त्याचे पेढे वाटले. त्यांच्यातील नातेसंबंध कित्ती ताणले गेले असतील हे त्याच्या या वागण्यातुन स्पष्ट होते. दुसरी एक बातमी, नवऱ्याला भुतबाधा झाली म्हणुन एका मांत्रीकाच्या सांगण्यावरुन एका स्त्रीने तिच्या नवऱ्याला वटपोर्णीमेच्या रात्री जाळुन मारले.

महाशक्तीकडे वाटचाल करणारा भारतातील आपण जोडीदाराची निवड करताना अजुनही मागासलेलेच आहोत का? बऱ्याच वेळेस लग्न जमत नाही म्हणुन एखादे आलेले ‘स्थळ’ तितकेसे पसंद नसतानाही लग्न उरकली जातात आणि मग त्याचे भोग आयुष्यभर भोगावे लागतात.

डोळ्यासमोर घडलेला एक किस्सा सांगतो. माझी आणि पत्नीची एक कॉमन मैत्रिण आहे, कॉलेजच्या दिवसांपासुनची. कॉलेजमध्ये लय पोरं तिच्या मागे, आणि ती पण.. पण शेवटच्या क्षणी.. I am committed. तिचा लहानपासुनचा मित्र.. मनिष आणि तीचे जिव्हाळ्याचे संबंध. कॉलेज दिवसांत, ‘माझा मनिष असा, माझा मनिष तसा’ यावर प्रवचन चालु. पुढे हा मनिष शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला. वर्षभरातच घरातला विरोध न जुमानता दोघांनी लग्न केले. विरोधाचे कारण एकच.. मुलाला नोकरी तरी लागु देत, मग करा लग्न. पण नाही. बापाच्या पैश्यावर दोघंही ऑस्ट्रेलियाला स्थाईक झाले. पहिले वर्ष आनंदाचेच होते. दर आठवड्याला दोघांचे फोटो, मेल्स येत राहील्या. कधी मेलबर्न, कधी सिडने, तर कधी अजुन कुठले तरी ठिकाण.

मग हळु हळु संसाराची झळ जाणवायला लागली. मुलाने शिक्षणाबरोबरच एका बॅंकेत निचांकी जागेवर नोकरी पत्करली, तर संगणक अभीयंती असुनही मुलीला एका कॅफे मध्ये क्लेरीकल जागेवर नोकरी करावी लागली. अश्या परीस्थीतही दिवस गेले आणि बाळाच्या जन्मासाठी दोघंही परत भारतात (खरं तर जमीनीवर) आले. बाळाचे संगोपन करणे ऑस्ट्रेलियात एकाच्या पगारावर शक्य नव्हते म्हणुन काही दिवस भारतातच रहाण्याचा निर्णय घेण्यात आला. आता मुलाला इथे नोकरी नाही. तुटपुंज्या पगारावर मार्केटींग ची नोकरी चालु आहे. दोघांमध्ये वारंवार खटके उडतात. मुलीची रडारड, आई-वडीलांची..’तुला सांगीतले होते, नको करु लग्न, ऐकले नाहीस’ म्हणुन तुणतुण, नविन बाळाची ‘पिर-पिर’ स्वर्गातुन नरकात येयला कित्ती कमी वेळ लागला?

पेपर मध्ये अनेक जाहीराती असतात. ‘मुलगा अमेरीकेवरुन २ आठवड्यांसाठी लग्नासाठी आला आहे, मुलगी हवी आहे..अशी..अशी’ आणि लग्न जमतात.. मी स्वतः डोळ्यासमोर उदाहरण बघीतले आहे. त्या मुलाचे आणि मुलीचे नशीब की दोघंही अनुरुप निघाले नाहीतर अजुन एक आयुष्य कोलमडले असते.

या विरुध्दचे दुसरे उदाहरण ‘लिव्ह-इन-रिलेशनशिपचे’ दोन वर्ष होऊन गेली. दोघंही प्रचंड सुखी आहेत. एकत्र राहुनही वेगवेगळे. कुणाचे कुणावर बंधन नाही. पटले तर पुढचेही वर्ष एकत्र नाहीतर रस्ते वेगवेगळे.

‘लिव्ह-इन’ ला विरोध करणारे बहुतांश लोक मध्यम-वयाचे आहेत. याला अनेक कारण आहेत, पण त्यापैकीच बहुदा एक म्हणजे त्यांचे वार्धक्यातील काही स्वप्नांचे. घरामध्ये सुन, नातवंड नांदावीत, एकत्र कुटुंब असावे आणि वार्धक्य आनंददायी जावे असे असु शकते. पण मला सांगा आज एकत्र कुटुंब पध्दती खरंच तितकीच बळकट आहे का? एका घरात सोडा, एका गावात सुध्दा सोडा आजकाल मुल बाळ पर-राज्यात किंवा परदेशात स्थाईक झालेले असतात.. आई-वडीलांना सोडुन. पर-राज्यात मी एकवेळ समजु शकतो, पण मला आश्चर्य वाटते अशी कुठली नोकरी आहे जी भारतात मिळत नाही.. परदेशातच जाउन करावी लागते? अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे. त्याला दुमत असु शकते.. असणारच!! पण म्हणुन आई-वडीलांना सोडुन जायचे.. या बाबतीत गुजराती लोकांचे मला कौतुक वाटते.. जिथे पण जातील आजुबाजुला पुर्ण गोतावळा घेउन जातील.

एनिवेज.. मुद्दा वेगळा आहे. आज अमेरीकेसारख्या प्रगत देशात लिव्ह-इन खुपच कॉमन आहे. इतकी वर्ष झाली आणि ती संस्क्रृती तिथे रुजली आहे. आज आपण तिथल्या संस्क्रृतीला, तिथल्या मुल्यांना नाव ठेवतो, पण जरा डोळे उघडुन बघीतले तर आपल्या इथेही थोड्याफार प्रमाणात तोच प्रकार सुरु झाला आहे असे नाही का वाटत?

लिव्ह-इन ला खतपाणी घालु नये, पण निदान त्यावर शिंतोडे तरी उडवु नयेत असे मला वाटते. पिढी बदलत आहे त्यांच्या मतांचा आदर व्हायलाच हवा नाहीतर केवळ मोठ्यांच्या आग्रहाला बळी पडुन लग्न करुन त्यांच्या आयुष्याची हेळसांडच होत रहाणार आहे.

माकडाच्या नानाची टांग

हेच ते माकड सुट्टीनिमीत्त माथेरानला गेलो होतो तेंव्हाची गोष्ट. दस्तुर-नाक्यावर गाडी ठेवुन हॉटेलवर पोहोचलो. सगळीकडे माकडांचा सुळसुळाट होता. लाल तोंडाची, काळ्या तोंडाची, किडुक-मिडुक पिल्लांपासुन भल्यामोठ्या हुप्या पर्यंत सर्व थरातील माकड बघुन मज्जा वाटत होती. दिवसभर खुप फिरलो, भरपुर फोटो काढले शॉपींग झाले दिवस मज्जेत गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुल-साईड टेबलवर मस्त ब्रेकफास्ट करत होतो एवढ्यात तिथला एक नोकर धावत आला आणि म्हणाला, “अहो तुमच्या रुम मध्ये माकड शिरली आहेत! बाल्कनीचे तुमचे दार उघडे होते बहुदा, तेथुन ती माकडं आत घुसली!”. त्यातील गांभीर्य लक्षात यायला वेळ लागला आणि मग मात्र आम्ही लगेच पळत वर गेलो. दार उघडले आणि बघतो तर काय २-३ माकडांनी खोलीमध्ये धुडगुस घातला होता. सगळ्या सामानाची उसका-पासक केली होती. वस्तु इकडे तिकडे फेकल्या होत्या, फ्लॉवर पॉट तोडला होता, अथरुण फेकुन दिलि होती. आमच्या मागो-माग दोन-तिन वेटर-नोकर हातात काठ्या घेउन आले आणि त्या माकडांना हुसकावुन लावु लागले. तेवढ्यात मी जोरात ओरडलो- “थांबा..!!”

माझं लक्ष दोन माकडांकडे गेले. एका माकडाने माझा महागडा डिजीटल कॅमेरा धरला होता तर दुसऱ्याच्या हातात कारची किल्ली होती. जर का ही माकडं खोलीतुन बाहेर गेली तर ह्या वस्तु गेल्याच म्हणुन समजा. कॅमेरा तरी ठिक आहे, पण कारची किल्ली गेली तर काय करणार? घरी कसं जाणार? इथे दुर डोंगरावर कारचे दार उघडुन देणारा, डुप्लीकेट किल्ली करुन देणारा कुठुन भेटणार? म्हणजे इथुन परत पुण्याला जा, घरुन दुसरी किल्ली घ्या परत इकडे या आणि मग गाडी घेउन जा.. छे छे!! काहीतरी केलेच पाहीजे पण काय?

जुनी टोपीवाल्याची गोष्ट आठवली, आपण वस्तु फेकली की ते पण फेकतं, तसं करुन बघुयात म्हणुन मी जवळ ठेवलेली चप्पल हळुच माकडाच्या दिशेने फेकली, म्हणलं कदाचीत माकड पण किल्ली फेकेलं. पण झालं उलटच, चप्पल बघुन ते माकडं बिथरले, माझ्यावर दात विचकले आणि बाहेर बाल्कनीत जाउन बसले. तेथुन झाड एक फुटावर होते. माझी धडधड वाढली होती.

माकडाच्या पायाचे ठसे
तेवढ्यात मला पोराच बॅटरीवर चालणारे टेडी-बेअर पडलेले दिसले. हळुच ते चालु केले आणि कॉट वर ठेवले. ते चुक-चुक आवाज करणारे टेडी बघुन एक माकड खुश झालं हळुच ते टेडीच्या जवळ आलं त्याने हातातला कॅमेरा कडेला ठेवला, हळुच ते टेडी उचलले आणि झाडावर धुम ठोकली. मी लगेच पटकन पुढे जाउन तो कॅमेरा पकडला.

आता उरले दुसरे माकड. मगाशी मी चप्पल फेकल्या मुळे ते माझ्यावर चिडुन होते, फुल्ल खुन्नस! मग तो वेटर म्हणाला, “या माकडांना कपडे आवडतात, असेल काही तर फेका. मग माझी कॅप होती ती हळुच पुढे टाकली. रंगीत टोपी बघुन हे माकड पण हळु हळु बिचकत पुढे आले, किल्ली कडे एकदा बघुन ती कडेला फेकुन दिली, टोपी उचलली आणि पळुन गेलं. मी पटकन झडप घालुन किल्लीही पकडली. मग बाकीचे सामान, पैश्याचे पाकीट, पर्स वगैरे सगळे तपासले, नशीबाने सगळे जागेवर होते. अश्या रीतीने त्या काही थरारक क्षणांचा शेवट झाला, पण शेवटी तोंडातुन वाक्य निघालेच, ‘त्या माकडाच्या नानाची टांग’

सोबत खोलीत शिरलेल्या माकडांपैकी एकाचा फोटो (कसलं चिडलयं बघा, स्माईल प्लिज म्हणलं तरी कॅमेराकडे बघत्तच नाहीये), आणि अंथरूणावर उमटलेल्या त्याच्या पंजाचे फोटो जोडत आहे :-)

ऍन्टी चेस

कधी ऐकला किंवा खेळला आहात हा खेळ? सध्या कंपनीमध्ये हा गेम शो मी आयोजीत करण्याच्या तयारीत आहे. साखळी सामने, उपांत्य फेऱ्या आणि अंतीम फेरी मध्ये हा गेम खेळला जाणार आहे. तुफान खेळ आहे हा. प्रचंड मज्जा येते खेळताना. या टाईम-पास खेळाबद्दल थोडेस;

  • नावाप्रमाणेच हा खेळ चेस अर्थात बुध्दीबळ खेळाच्या बरोब्बर उलटा आहे.
  • या खेळामध्ये ज्याचे प्यादे / सोंगट्या लवकर संपतील अर्थात लवकर मरतील तो जिंकला
  • या खेळामध्ये तुम्ही खेळताना प्रयत्न करायचा की तुमची सोंगटी मेली पाहीजे ना की दुसऱ्याची सोंगटी मारता आली पाहीजे.
  • तुमच्या कक्षेमध्ये दुसऱ्याची सोंगटी असेल जी मरु शकते, तर तुम्हाला ती मारावीच लागते. तुम्ही दुसरा कुठलाही डाव खेळु शकत नाही. उदा. तुमच्या हत्ती समोर एखाद्याने प्यादे आणुन ठेवले तर ते तुम्हाला मारावेच लागते.
  • राजा हा महत्वाचा ‘नसतो’. राजा मेला तरीही खेळ चालु रहातो
  • चेकमेट नावाचा प्रकार अस्तीवात नाही.
  • सर्व सोंगट्यांचे पुढे जाण्याचे नियम बुध्दिबळासारखेच
  • खुप वेळ होऊनही कुणाच्याच सोंगट्या संपत नसतील तर ज्याच्या सोंगट्या कमी तो जिंकला

ऍंन्टी चेस ला, ‘स्युसाईड चेस’, ‘लुझर्स चेस’, ‘झिरो चेस’, ‘टेक मी’ किंवा ‘किल मी’ अशी ही नावं आहेत. या खेळाला आंतररास्ट्रीय मान्यता आहे. महाजालावर सुध्दा अनेक साईटवर हा खेळ ऑनलाईन खेळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

नेहमीच्या खेळांना कंटाळला असाल आणि घरात कुठेतरी कोपऱ्यात पडलेला बुध्दीबळाचा पट वापरात काढायचा असेल, तर हा खेळ खेळुन बघायला काहीच हरकत नाही. खुप ऍडीक्टिव्ह आहे हा खेळ!!

डावरी

मला डाव्या लोकांबद्दल कमालीचं प्रेम आहे. आपले राजकारणी डावे पक्ष नाहीत हो.. डावे म्हणजे डावरे, डाव्या हाताने लिहीणारे, लेफ्टी!! का कुणास ठाउक पण मला लेफ्टी लोक खुप आवडतात. मग तो डाव्या हाताने सही करणारा ‘सचिन तेंडुलकर’ असो, डाव्या हाताने लिलया आणि ग्रेसफुल फटकेबाजी करणारे ‘सौरभ’, ‘जयसुर्या’ किंवा अगदी अत्ताचा ‘गौतम गंभीर’ असो. इश्टाईल ने समोरच्या खेळाडूची दांडी गुल करणारा ‘वासीम अक्रम’ असो की ‘बिग बी-अमिताभ’. एवढेच कशाला इतीहास घडवणारे अमेरीकेचे सध्याचे अध्यक्ष ‘बराक ओबामा’ सुध्दा डावरेच की.

योगा-योग असा की माझी बायको सुध्दा लेफ्टीच आहे म्हणल्यावर मला कोण आनंद झाला होता. पण संसारात पडल्यावर ह्या डावरेपणाचा इतका त्रास व्हायला लागलाय म्हणुन सांगतो. अगदी साधी गोष्ट घ्या. सकाळी दात घासुन झाल्यावर टुथ पेस्ट तुम्ही कशी ठेवता? बुच पुढे करुन बरोबर? म्हणजे दुसऱ्या दिवशी फक्त पेस्ट बाहेर काढायची, झाकण उघडुन ब्रश ला लावली की झाले नाही का? पण नाही!! आमच्याकडे उलटे आहे ना. बायको लवकर उठते त्यामुळे पेस्ट वापरणारी नेहमी पहीली तीच. आता ती डावरी म्हणल्यावर ती पेस्ट बरोब्बर उलटी ठेवते. म्हणजे मी आधीच झोपेत असतो, कपाट उघडावे तर पेस्ट उलटी. मग ती सुलटी करा, मग झाकण उघडा असा द्रवीडी प्राणायाम.

कंप्युटर वर बसावे तर माउसची जागा बदललेली, कॉफी घ्यायला हात पुढे करावा तर ती डाव्या हाताने कॉफीचा कप पुढे करते म्हणजे परत उलट सुलट. रस्त्याने जाताना कुणी पत्ता विचारला की ही रस्ता दाखवायला एकदम डावा हात पुढे करते. समोरचा दचकतो ना! तो एक्स्पेक्ट करत असतो उजवा हात, असं एकदम घाबरायला होतं. रस्त्याने, उद्यानातुन हातात हात घालुन चालावं तर परत उलटं, रस्त्याने उलट्याबाजुने चालणार.. काय करावं ह्या डाव्यापणाचं. स्वयंपाक घरात काही घ्यायला जाव तर सगळ्याच्या जागा बदललेल्या. म्हणजे इतक्या वर्षाची सवय मला, एखादी गोष्ट कपाटात उजव्या बाजुला असणार म्हणुन शोधाव तर ती बरोब्बर दुसऱ्या बाजुला सापडते.

पहिल्यांदा खुप त्रास व्हायचा पण नंतर विचार केला, जगातल्या जवळ जवळ सगळ्याच गोष्टी उजवा हात वापरणाऱ्यांच्या सोयीने बनवल्या आहेत म्हणल्यावर लेफ्टी लोकांना दैनंदिन जिवनात नकळत कित्ती अडथळे पार पाडावे लागत असतील. साध्यात साधी गोष्ट घ्या टेलीफोन बुथ. विचार करा आपल्याला उलटा फोन ठेवुन वापरायला दिला तर कित्ती त्रास होईल? मग महाजालावर बसुन शोधा-शोध केली डाव्यांना दैनंदिन जिवनात येणारे अडथळे आणि कित्तीतरी उदाहरण समोर आली.

अर्थात मी तिला किंवा कुठल्याही लेफ्टी ला दोष देत नाहीये, माझे डाव्यांबद्दलचे प्रेम अजुनही तितकेच आहे. माझी ही आपली अश्शीच एक लाडीक, प्रेमळ तक्रार :-)

आज ३/६/९

काय करु? कसं करु? सकाळ पासुन जिव नुसता कासाविस होत आहे. काल रात्रीपासुन डोळ्याला डोळा नाही. काय होणार? कार्यालयात तर आलो आहे, पण कामात लक्षच लागत नाहीये. सारखं आपलं महाजालावर शोधाशोध करतो आहे, कुठे काही ‘ब्रेकींग न्युज’ दिसते का ते? पण काहीच सापडत नाहीये. गुगल चा परफॉर्मंन्स कमी झालाय, का त्याच्यावर ही काही कुणी चेटुक, काळी जादु केली आहे कळेनासे झाले आहे.

कशाबद्दल बोलत आहे? बास्स का राव, ‘क्वेस्ट ऑफ मिलेनीयम’ आहे आज, आजची तारीख विसरलात? ३/६/९, आज ९ वाजता काहीतरी घडणार आहे? शास्त्रींच्या घरी. क्षीप्राचे बाबा पण त्यांना कसलीतरी चाहुल लागली म्हणुन वाड्यावर पोहोचले आहेत. बरोब्बर ९ वाजता आज तुळशी वृंदावनाची सावली जिथे पडते तिथे काहीतरी सापडणार, अगदी ‘मॅकेनाझ गोल्ड’ सिनेमासारखे. मी पण आज सकाळी ९ वाजता घरापाशीच्या तुळशी वृंदावनापाशी खोदकाम करुन पाहीले, काहीच सापडले नाही हो. अशी उडती खबर ऐकली की मुळशी-ताम्हीणी परीसरातही बऱ्याच लोकांनी घराच्या मागे खणुन बघीतले, पण नशीब कुणाच्याच पथ्यावर नाही असे दिसत आहे.

असो, एअरटेल-भारती, आयडीया, व्होडाफोन या मोबाईल सर्व्हीस प्रोव्हायडर्स ने त्यांच्या स.म.स. (SMS) देवाणघेवणात ४०% ने वाढ झाल्याचे सांगीतले तर बि.एस.एन.एल चे नेटवर्क जॅम झाल्याचे ऐकले. सर्वांच्या तोंडी एकच चर्चा काय होणार आज ९ वाजता?

विशेष खबरदारी म्हणुन महाराष्ट्र राज्याने केंद्राकडुन राखीव दलाची एक कुमक मागवली आहे. महावितरणाने संध्याकाळी ८.३० ते ९.०० वेळात 0% लोडशेडींग डिक्लेअर केले आहे. रात्रीच्या सर्व शिफ्ट्स आज एक तास उशीराने सुरु होतील असे एम.आय.डी.सी ने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले. रिक्षा, बसेस चे कामकाज काहीकाळासाठी बंद राहील. टि.व्ही. च्या शोरुम्स ने आज सर्व टिव्ही चालु ठेवुन त्यावर ‘असंभव’ मालीका चालु ठेवावी अशी मागणी कागद, काच, कचरा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे, जेणेकरुन या लोकांना रस्त्यावरुनच या दशकातील थरारक घटनेचा साक्षीदार होता येईल.

चला तर मंडळी, पहायला विसरु नका आज ८.३० वाजता झी.टी.व्ही. मराठीवर असंभवचा सनसनाटी भाग. ३/६/९- बरोब्बर ९ वाजता काहीतरी घडणारssssss