तुम्ही जर ५०+ वयोगटातले असाल तर कदाचीत तुमच्या भुवया उंचावल्या असतील! मराठीला वाहीलेल्या ह्या साईटवर असले अचरट, आंबट शब्द वाचुन ‘हा काय चावटपणा?’ असं नक्कीच मनोमन पुटपुटला असाल.
तुम्ही ४० ते ५० वयोगटातले असाल तर ह्या पोस्ट मध्ये ‘तसलं’ काहीतरी असण्याची शक्यता समजुन एक तर ही पोस्ट टाळण्याचा प्रयत्न केला असाल किंवा चिडुन ह्या पोस्टवर काहीतरी खवचट प्रतिसाद द्यायच्या उद्देशाने ही पोस्ट उघडली असेल.
पण तुम्ही तिशीतले किंबहुना विशीतले असाल तर ‘सेक्सी’ ह्या शब्दाचे प्रचलीत असलेले ‘अनेक’ अर्थ तुम्ही जाणुन असाल आणि अगदी साफ मनाने तुम्ही हे पान उघडले असेल, नाही का?
आजच्या युगात ‘सेक्सी’ ह्या शब्दाने अनेक अर्थ अंगीकारले आहेत. पुर्वीच्या काळी ‘सेक्सी’ हा शब्द केवळ ‘कामुक’ गोष्टींशी निगडीत बोलतानाच वापरला जायचा. नगनत्व, कामक्रिडा, यौन किंवा लैगीक विषय हे ‘सेक्सी’ असायचे. पण आजच्या बोलीभाषेत ‘सेक्सी’ शब्दाचे परीमाणच बदलले आहे. आजच्या युगात कोणतीही आकर्षक गोष्ट ही ‘सेक्सी’ असते. रस्त्यावरुन धावणाऱ्या गाड्या सेक्सी असतात, घड्याळं, कपडे, चपला/बुट सेक्सी असतात, निसर्ग सौदर्य सेक्सी असते, ‘कुछ कुछ होता है’ मधली दादी सेक्सी असते, मोबाईल,लॅपटॉप्स, आयपॉड्स आणि इतर गॅडेज्ट्स सेक्सी असतात, अहो इतकच काय पदार्थांची चव सुध्दा सेक्सी असते… आता बोला!!
हा शब्द इतका प्रचलीत झाला आहे की कोणताही युवक किंवा युवती कसलाही विचार न करता अगदी मोकळेपणाने ‘सेक्सी’ म्हणुन मोकळे होतात.
भाषेत नवे शब्द निर्माण होणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक नविन पिढी नविन शब्द प्रचलित करत असते. भाषा नेहमीच बदलत होती आणि बदलत आहे. ‘सही’ हा असाच कधी तरी उगवलेला शब्द. कुठलीही सुंदर असलेली गोष्ट ‘सही’ ह्या शब्दाने गौरवली जायची. पण आजच्या काळात ‘सेक्सी’ ह्या शब्दाने ‘सही’ ह्या शब्दाची जागा घेतल्याचेच दिसुन येते.
असे आहेत अजुन काही नविन शब्द जे तुम्ही इथे प्रतिसादात देऊन लेखकाच्या आणि वाचकांच्या ज्ञानात भर घालु शकाल?
हो, पण तुम्ही सुचवत असलेला शब्द तस्साच ‘सेक्सी’ असला पाहीजे बरं का!!
सेक्सी पोस्ट आहे. मजा आली वाचताना.
एकतर हा शब्द एवढा कॉमन आहे की मला वाटलेच की ’तसले’ काहीतरी नसणार.
post as usual sec c zali ahe
kharach common zalay ha shabda….
cool! फाना, कूल म्हत्ले कि एक्दम हॊट अस्ते कि नाही ?
mast post aahe. maja aali mala vatlach hote asch kahitari aasnar.
एक नम्बर लिहीलं आहेस बघ…
btw, आज काल सगळे F words पण Sexy सारखेच वापरले जातात..
अनिकेत,
खरंच आहे. हा शब्द भलताच कॉमन झालाय. माझी दहा वर्षांची मुलगी सुद्धा हा शब्द बिनधास्त वापरते. शाळेतले वर्गामैत्रीणींचे शिक्षण!
बाकी, “तुम्ही ४० ते ५० वयोगटातले असाल तर ह्या पोस्ट मध्ये ‘तसलं’ काहीतरी असण्याची शक्यता समजुन एक तर ही पोस्ट टाळण्याचा प्रयत्न केला असाल किंवा चिडुन ह्या पोस्टवर काहीतरी खवचट प्रतिसाद द्यायच्या उद्देशाने ही पोस्ट उघडली असेल.” हे काही पटले नाही बुवा! आज कालचे चाळीशीचे “तरुण” एव्हढे मागासलेले नाहीत बरं का.
-निरंजन
Sunder Post aahe…Baaki Shri Niranjan yanisuddha barobar mudda sangitala aahe
सेक्सी=कड्डक=जबरा=F***
असं आहे सगळं. शब्दार्थ आणि अभिप्रेत अर्थ काही संबंध नाही!
रापचिक हा कधीकाळी माझा आवडता शब्द होता. बाकी हा लेख अगदी “रापचिक” झालाय !
अनिकेत,
हा एकच शब्द नव्हे असे असंख्य शब्द आहेत! माझ्या मनात बरयाच दिवसांपासुन हा विषय घर करुन बसला आहे. हल्ली समजात शब्दांची परिभाषाच बदलुन गेली आहे. इन्फ़ेक्ट मी एक पोस्ट टाक्ली सुध्दा होती यावर
tumhala shabd pan bharich bhetala aahe raav !
एक छान किस्सा आठवला …
ह. निजामुद्दिन स्टेशन ला, एक मुलगी (२४-२५) फोन वर बोलत बोलत काही तरी झालं असेल, ति नकळत (किंवा सवईमुळे) जोरात फ* (****) बोलली… आसपासची सर्वच लोक तिच्या कडे पाहत होते.
तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
शब्द … सांभाळून वापरारे …!!!
‘सेक्सी’ शब्दा बद्दल चे लिखाण पन ‘सेक्सी’ आहे. काय उत्तम चावलायस. एकदम मस्त. ‘ चावलिस ‘ शब्द कसा वाटतो ?
लय़ सेक्सी लिहलय.
अजून काही नविन शब्द -
रापचिक, मालदार, छळ, कळ,
यात ’तसला’ काही अर्थ नसून एखाद्या गोष्टीबद्दल अफाट तारीफ करण्यासाठी हे वापरले जातात.
hey nadh barhi
Word “Sexy” was not at all new or unfashionable even 25 years ago. I have used this word in 1985 while in Jr. college.
For some time we had replaced this word by similar Marathi word “Madak”
CHABUK pan shabda sahi ahe…aniket lihinyachi style tuzi ‘SEXY’ ahe re..
lihit raha …amhi wachat rahu..pratisad det rahu..
tumachyasathi kahi navin shabd…
Dhasu…
Ghanta…
1 Number…
Jabaradast…
Superb…
Sexy kay nasate sexy sarv kahi asate pan te apalya vichar viniyamayatun te sadhya hot asate kashala sexy uddeshayache.
मला आपला शब्दांकडे बारकाइने बघण्याचा द्रुष्टीकोन फारच आवडला
ekdum cool…….
Aniket Sir,
Gramin Bhagat “Naad Khula” Ha shbda khup vaparla jato.
Baki Post Khup Chan Aahe!
English Medium madhil mule-muli “F..” cha saras vapar kartat!
मला आज कळलं की जग किती पुढं गेलंय ते. I agree with you.
माझ्या भागात ” बेंडास “,”डंग्र्या” ही शब्दे खुप वापरली जातात. याचा नेमका अर्थ कळत नाही.
khupach chhan lihile aahe aniket
karach aaj kal sexy ha shabd commen jhala aahe
lahana pasun mothyaparyant sarvajan ha shabd bedhadak vapartat
Post ekdum Sexxxxxy
फारच सेक्सी आहे॰मी पण
very nice thought. yalach mantat kalyug
Lay bhari
khupach sexy
lolzzz…aniket 100 % patal…faar dur kashala malaa suddha kuni “how are you ?” wicharalyawar mi “I m damn sexy” kinvha “how was the day?” wicharalya war “it was damn sexy” as uttar dete
hallich kay bore karatoyes la kiti chavatoyes ani sexy sarkhach fadu ha shabd aikivat aalaa mazya
अजून एक…
माहित नाही हि comment विषयाला धरून आहे कि नाही पण वाटली म्हणून post करतेय
मी एक वर्ष केरळला होते..
पुण्यावरून तिकडे गेल्यावर सहज म्हणून एक मित्राला विचारलं काय रे तुझी item कशी आहे
आणि तो विचित्र नजरेने मला उत्तर न देता निघून गेला
काही दिवसांनी कळलं south मध्ये item म्हणजे call girl
ok that is not new now a days