दोनशे हजार


संक्रांतीच्या दिवशी, अर्थात १४ जानेवारी २०१० रोजी, “डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा”च्या वाचकांची संख्या लाखाच्यावर पोहोचली होती. त्या घटनेला ६ महीने होतात नं होतात तो पर्यंत ह्या भुंग्याने दोन लाखाचा टप्पा सुध्दा ओलांडला आणि हा टप्पा ओलांडायला त्याला लागले फक्त २२१ पोस्ट. २० मार्च २००९ रोजी ह्या ब्लॉगवर पहिली पोस्ट झाली आणि काही दिवस नियमीत लिखाण झाल्यावर खरं तर त्याची संख्या रोडावतच गेली. ह्या ४०० दिवसांत पोस्ट मात्र फक्त २२१ इतक्या कमी राहील्या.

परंतु असे असले तरी ब्लॉगच्या वाचकांची संख्या मात्र वाढतच राहीली. इतक्या कमी कालावधीत आणि इतक्या कमी पोस्ट असताना सुध्दा दोन लाखांचा टप्पा मात्र इतक्या सहजतेने ओलांडला गेला हे त्याचेच द्योतक आहे.

तुम्हा सर्व रसिक वाचकांच्या प्रेमाचेच हे प्रतिक आहे असे मी समजतो. नेहमी भुणभुणणार्‍या ह्या भुंग्याला आज मात्र तुमचे आभार मानायला शब्दच नाहीत. आणि खरं तर मला आभार मानण्यापेक्षा तुमच्या ऋणातच रहाणे अधीक आवडेल.

वेळोवेळी बहुतेक सर्व पोस्टला तुम्ही दिलेल्या भरभरुन प्रतिक्रिया, “पुढच्या पोस्टची आतुरतेने वाट बघतोय रे, लवकर पोस्ट कर” म्हणत दरडावुन केलेली प्रेमळ सुचना किंवा “कित्ती वाट बघायला लावणार अजुन?” म्हणत पुढच्या पोस्टसाठी केलेले आर्जव मला अधीकाधीक लिहायला प्रेरीत करत आहेत.

तुमचा ह्या ब्लॉगवर असणारा लोभ आणि प्रेम केवळ असेच न रहाता दिवसेंदिवस ते द्विगुणीतच होत जाईल असा विश्वास मला वाटतो.

चला तर मग.. भेटत राहुच अधुन मधुन नवनविन पोस्ट / कथानकांसह..

तो पर्यंत.. भुणभुण भुणभुण.. रे भ्रमरा!!!

- अनिकेत

23 thoughts on “दोनशे हजार

  1. Aniket dada ……….”ABHINANDAN”…….
    “Dokyat Bhunbhunara Marathi Bhuga” 4/5 diwasat 2,00,000 tappa par karel yacha vishvas hota,
    mi mazya comment madhe lihalhi hot………
    aata college madhun aale ki aadhi PC start kela 2,00,350 ha aakda pahun khup aanad zala…..
    DADA blog tuza ahe pan mi ratri pasun khup aaturtene wat pahat hote 2,00,000 cha tappa kadhi
    par hoto yachi……zala ekdacha……
    DADA aasch likhan suru thev…..aadhun madhun nahi nehmi likhan
    kar mi roj tuzya post chi wat pahate………
    ………………ABHINANDAN………………ABHINANDAN……………ABHINANDAN…………………….

  2. Hi…Aniket..

    Mi Anil Rao, Baroda – Gujarat. Tuja Blog Vachala, (are -ture karto rag manu nay.) tuje artical classic tache, Photo dekhil classsic… maja Graphix Design cha business aahe. tasche Samantar Bhagya navche Qtry. Magazine Publish karto.
    bhutu…
    Ph. 9898924270

  3. Aniket,

    Tumchya Sarv Post me mahapasun Vachte tumchi lekhan Shaily far avadte mala,
    jase kahi sarv dolyansamorch hote aahe , ekdam chitravat pude kay honar aahe yacha thang lagatach nahi blackmail chya pudil bhagachi aaturtene wat pahat aahe . haya veles he tumhi kahi tari ekdam shoking prasang takal ashi apeksha aahe.

    kharech your posts are really mindblowing.

    Best Regards,

    Shilpa.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s