भाग १ पासुन पुढे>>
बाहेरील अवस्था बघुनच परेराला आल्या पावली परत फिरण्याची एक तिव्र इच्छा येऊन गेली. परंतु आता पर्याय नव्हता. जड पावलांनी तो त्या इमारतीच्या आतमध्ये शिरला
पाठोपाठ गाडी एका मोडक्या गॅरेज सदृष्य शेडमध्ये लावुन बर्मन सुध्दा आतमध्ये आला.
“बसा सर..”, समोरच्या सोफ्याकडे हात दाखवत बर्मन म्हणाला.
बाहेरुन जितकं वाटलं होते, तितके खराब आतमध्ये मात्र नव्हते. उलट अंतर्गत व्यवस्था बघुन परेराला जरा आश्चर्यच वाटले. अगदी उंची नसले तरी कंम्फर्टेबल फर्नीचर हॉलमध्ये होते. मऊ कुशन असलेल्या खुर्च्या आणि सोफा, टि.व्ही सेट, कॉर्नर पिस, जुना असला तरी स्वच्छ असलेला गालीचा, निटके पडदे ह्यामुळे तो हॉल बरा दिसत होता.
“जिनाss”, बर्मनने आपल्या पत्नीला हाक मारली.
किचनमधुन भांड्यांचा आवाज येत होता. परेराने घड्याळात पाहीले. साडे-सात वाजायला ५ मिनीटं कमी होती. जेवण तयार होई पर्यंत इथं न थांबता गावात जाऊन दोन-तिन हॉटेल्स पाहुन एखादं पक्क करुन यावं असा एक विचार परेराच्या मनात तरळुन गेला. आपला विचार बर्मनला बोलुन दाखवण्यासाठी परेरा जागचा उठत होताच तोच किचनमधुन ऍप्रनला हात पुसत एक साधारण तिशीच्या आसपासची स्त्री बाहेर आली.
पाठीपर्यंत तरळणारे काळेभोर केस, चेहर्यावर कुरळ्या केसांचा महीरप, लाल रंगाचा शर्ट आणि क्रिम कलरचा पायघोळ क्रेप स्कर्ट घातलेली स्त्री त्याच्यासमोर उभी होती. तिला पहाताच परेरा जागच्याजागी थांबला. ही स्त्री बहुदा इथे काम करणारी असावी, किंवा ह्या घामट्ट बर्मनची कोणीतरी लांबची नातेवाईक असा विचार करणार्या परेराला आश्चर्याचा धक्का बसला जेंव्हा बर्मनने त्या स्त्रीची ओळख.. ’जिना.. माझी पत्नि’, असा करुन दिला.
“ह्या गिनीपिग सारख्या डोळ्याच्या घाणेरड्या माणसाची पत्नी इतकी सुंदर???“, परेराचा विश्वासच बसत नव्हता.
शेवटी स्वतःला सावरुन त्याने आपला हात पुढे केला आणि म्हणाला, “हॅलो मिसेस बर्मन!”
जिनाच्या चेहर्याची किंचीतशी हालचाल झाली, त्याला हास्यच म्हणायचे का आणखी काही ह्या विचारात असतानाच बर्मन म्हणाला, “जिना, हे मि.परेरा, श्रॉफ सरांच्या जागेवर काही महीने हे काम करणार आहेत. आजच ह्या गावात आले. आज रात्री जेवायला इथे थांबतील.”
“ठिक आहे”, असं मोघम बोलुन जिना माघारी वळली.
“सर तुम्हाला खरंच दुसरी कडे रहायच आहे? मला वाटतं तुम्ही एकदा इथल्या खोल्या बघुन तर घ्या, नाही आवडल्या तर राहीलं. पण ह्या पैश्यात तुम्हाला दुसरीकडे नाही मिळणार..”, बर्मन बोलत होता.
परेराची नजर मात्र जिनाच्या पाठमोर्या आकृतीकडे लागलेली होती. चालताना तिच्या नितंबांची होणारी हालचाल आणि श्वास घेताना मागुनही जाणवणारी तिच्या छातीचे खाली-वर होणे परेराला संमोहीत करत होती.
“ठिक आहे बर्मन, तु एवढा इन्सीस्टच करतो आहेस तर, एकदा बघुन घेतो खोल्या”, जिना स्वयंपाक घरात गेल्यावर परेरा म्हणाला.
“ओके सर, तुम्ही फ्रेश व्हा मग मी तुम्हाला दाखवतो”, असं म्हणुन बर्मन कपडे बदलायला आपल्या खोलीत गेला.
**********************************************
बर्मन म्हणत होता ते बरोबरच होते. खरोखरच खोल्या निटनेटक्या आणि स्वच्छ होत्या. आणि दर सुध्दा कमी होते. इथे राहील्यावर बॅकेत यायाला जायला सोबत होणार होती, शिवाय जिनासारखी सुंदर स्त्री इथे असताना दुसर्या लॉज मध्ये जाणं परेराला नको वाटायला लागले आणि त्याने बर्मनला इथेच रहाण्यास होकार दिला.
***********************************************
जिना बहुतेक वेळा कामातच मग्न असायची. कधी किचेन मध्ये, कधी बागेत झाडांना पाणी घालताना, कधी लॉंन्ड्री, तर कधी अजुन काही. परंतु प्रत्येकवेळी तिची आणि परेराची नजरानजर हमखास ठरलेली असायची. तिने स्वतःहुन कधी परेराशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही, आणि परेरासुध्दा कधी आपणहुन तिच्याशी बोलला नाही.
नक्षलवाद्यांशी लढताना परेराने कित्तेक दिवस रात्र अदिवासी भागात तर कधी लष्करी ठाण्यांमध्ये घालवले होते. किराणा-माल, औषधे, स्वयंपाक अश्या सटर-फटर कामांसाठी त्या भागात स्त्रियांचा वावर असायचाच. कित्तेक दिवस शहरी जिवनापासुन दुरावलेल्या सैनीकांसाठी ’खास’ स्त्रियासुध्दा पैसा कमवायला यायच्या. बहुतेकींची पसंद परेराच असायचा. वाढलेली खुरटी दाढी, मळलेला सैनीकी पोशाख, लिमीटपर्यंत शरीर ताणल्याने तटतटुन फुगलेले दंडातील स्नायु आणि भरदार छाती ह्या मर्दानी रुपालाच किनार होती ती निळसर डोळे आणि चिअरफुल हास्याची. परेराने त्या काळात अनेक स्त्रियांशी शरीरसंबंध ठेवले होते आणि त्याच काळात आपल्यामधील स्त्रियांना आकर्षीत करणार्या कलागुणांची ओळख त्याला झाली होती.
जिनाकडे परेरा पहिल्या दिवसापासुनच आकर्षीत झाला होता. मनामध्ये कुठेतरी जिना आपल्याला बिछान्यात मिळेल ह्याची त्याला खात्रीच झाली होती. पण कधी? तिला आपल्या पाश्यात ओढणे कितपत सोप्पे असेल ह्याचा तो काहीच अंदाज बांधु शकत नव्हता. शिवाय बॅंकेच्या कामात तो इतका मग्न होऊन गेला होता की त्याला विचार करायला मोकळा असा वेळच मिळत नव्हता.
त्या दिवशीसुध्दा, सोमवारी, परेरा असाच आपल्या कामात बुडुन गेला होता. जिनाच्या विचारांनी तो काही क्षण थांबला, हातातल्या पेनाचा स्टॉपर त्याने दोन-तिनदा टक-टक वाजवला आणि परत एकदा दीर्घ श्वास घेउन तो कामात मग्न होऊन गेला.
“मे आय कम इन सर?”, केबीनचे दार अर्धवट उघडत बर्मन म्हणाला..
“येस..प्लिज..”, मान हलवत परेरा म्हणाला
“सर.. उद्याबद्दल थोडे बोलायचे होते..”, नेहमीप्रमाणे कळकट रुमालाने घाम पुसत बर्मन म्हणाला..
“उद्याचे? काय उद्याचे? सुट्टी वगैरे आहे की काय?”, परेरा
“नाही सर.. उद्या बुधवार..अं.. महीन्यातला शेवटचा बुधवार..” बर्मन बोलत होता..”.. सर ह्या दिवशी मित्तल ग्रुप्स कंपनीतील कामगारांना पगारवाटप होते कारण त्या पुढचा दिवस.. गुरुवार हा साप्ताहीक सुट्टीचा दिवस. ह्या गावात जितके आनंदाचे वातावरण असते तितकेच ताणाचे आपल्याला..
कामगारांचा पगार वितरणासाठी लागणारा पैसा मंगळवारी रात्री आपल्या व्हॉल्ट्समध्ये ठेवला जातो आणि बुधवारी सकाळी लगेच तो पैसा चारही कंपन्यांमध्ये न्हेला जातो.. सर्वांच्या पगाराचे वितरण करण्यासाठी..
“आपल्या बॅंकेत?? का?”, परेरा वैतागुन म्हणाला
“सर.. इथला बहुसंख्य नोकरदार हा कामगार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनीक्स क्लिअरींगमध्ये पगार वितरण अजुन ह्या गावात म्हणावे तितके फोफावले नाही. ही सर्व कॅश कारखान्यात ठेवणे शक्य नसते त्यामुळे एका रात्री पुरतीच ती आपल्या बॅंकेच्या व्हॉल्ट्समध्ये ठेवली जाते..”, बर्मन
“किती रक्कम असते ती?”, परेरा
“सर.. साधारण पणे १५ करोड रुपये!”, बर्मन घाम पुसत म्हणाला.. मंगळवारच्या विचारानेच त्याला अधीक घाम फुटला होता. त्याचा तो पिचपीचीत चेहरा पिवळट-पांढरत पडला होता.
“अरे!!.. पण आपली बॅंक कुठे इतकी सुरक्षीत आहे?”, परेरा आश्चर्याने म्हणाला.
“हो सर, ते खरं आहे. पण एका रात्रीचाच तर प्रश्न असतो आणि थोडीफार सुरक्षा आपण पुरवतो तितकी पुरेशी असावी असे वाटते. म्हणजे गेल्या चार वर्षात एकदाही ही रक्कम लुटण्याचा साधा प्रयत्नही झालेला नाही. महीनोंमहीने हीच प्रक्रीया चालु आहे..”, बर्मन
परेराने हातातले पेन खाली ठेवले. त्याच्या मनात कुतुहल मिश्रीत आश्चर्य निर्माण झाले होते. १५ करोड एवढी रक्कम सुरक्षीत ठेवायला अशी काय यंत्रणा ह्या फडतुस गावातल्या ह्या भिक्कार बॅंकेत केली आहे हे त्याला जाणुन घ्यायचे होते..
“बर्मन.. कॅन यु प्लिज शो मी दीज सेक्युरीटी ऍरेंजमेंट्स.. मला थोडी काळजी वाटते आहे, म्हणुन विचारले..”, परेरा खुर्चीवरुन उठत म्हणाला..
“हो नक्की सर..” बर्मन केबीनमधुन बाहेर पडला आणि तळघरात व्हॉल्ट्सपाशी जाणार्या दारापाशी आला..
“सर.. तुमची किल्ली..” आपला हात पुढे करत बर्मन म्हणाला..
परेराने खिश्यातील किल्यांचा जुडगा काढुन त्याच्या हातात दिला.
मग बर्मनने परेराकडची एक किल्ली आणि स्वतःकडची एक किल्ली त्या दाराला लावली आणि दार उघडले.. “सर, हे दार उघडण्यासाठी आपल्या दोघांच्याही किल्ल्या आवश्यक आहेत. त्याशिवाय हे दार उघडणार नाही.” शर्टची कॉलर सरळ करत बर्मन म्हणाला..
मग तळघरातील जिन्याचा दिवा लावला आणि पायर्या उतरत तो लॉकर्सपाशी येऊन पोहोचला. परेरा त्याच्या मागोमाग आतमध्ये आला.
डावीकडे एका बाजुला एकावर एक रचलेले सर्व लॉकर्स होते, तर उजव्या बाजुला एक दणकट पोलादाचे दार होते. त्या दाराकडे हात दाखवत बर्मन म्हणाला, “मित्तलची कॅश ह्या तिजोरीत ठेवली जाते..”
“अच्छा?.. बघु उघड ती तिजोरी, बघु कितपत सुरक्षीत आहे ती आतुन?”, परेरा म्हणाला
“सॉरी सर, ही तिजोरी फक्त आपल्या दोघांच्या किल्लीने नाही उघडु शकणार.. त्याला अजुन एक चावी लागते..”, बर्मन
“अजुन एक? ती कोणाकडे असते?”, परेरा
“ती चावी, कॅश व्हॅन घेउन येणार्या सेक्युरीटी इन-चार्ज कडे असते. आपण ही तिजोरी भाडे तत्वावर मित्तल ग्रुपला दिलेली आहे त्यामुळे एक चावी त्यांच्याकडेच असते. तिघांच्या किल्या लावल्याशिवाय ही तिजोरी उघडता नाही येणार..”, बर्मन
“ग्रेट!, बर अजुन काही सेक्युरीटी मेझर्स?”, परेरा म्हणाला.
“बाकी नेहमीचेच, अलार्म आहे. चोरट्यांनी सेफ तोडण्याचा प्रयत्न केला अलार्म वाजेल, तसेच एक सिग्नल पोलिस स्टेशनमध्ये जोडलेला आहे त्यामुळे पोलीस अर्ध्या तासात इथे हजर होतील.”, बर्मन
“आय सी! मग हा अलार्म आपण बंद करु शकतो का?”, परेराने सहजच विचारले
बर्मनने शरीराची एक अन-इझी हालचाल केली
“आय मीन.. पुढील सहा महीने तरी मी ह्या बॅंकेचा मॅनेजर आहे.. आय शुड नो राईट? उद्या फॉल्स अलार्म झाला तर मला माहीती पाहीजे बंद कसा करायचा. लोकं मला वेड्यात काढतील नाही तर..”, हात हवेत हलवत परेरा म्हणाला..
“येस्स सर..बरोबर आहे तुमचं”, असं म्हणुन बर्मन व्हॉल्टच्या बाहेर आला आणि त्याने परेराच्या टेबलाखालील खणात असलेला स्विच दाखवला
“हम्म.. आय थिंक वुई आर सेफ.. सेफ टु किप धिस मनी फॉर अ नाईट. अगदी स्टेट-ऑफ-द-आर्ट सेक्युरीटी नसेल आपल्याकडे, पण मला वाटते आहे तितकी योग्य आहे..” हनवुटी चोळत परेरा म्हणाला..”ऑलराईट देन, चला निघुयात घरी, मला प्रचंड भुक लागली आहे..”
बर्मनने मान हालवली आणि तो सेफ बंद करायला माघारी वळला.
पंधरा करोड रुपये!!!, परेरा आऊट-ऑफ-नो व्हेअर इतक्या पैश्याच्या जवळ येऊन पोहोचला होता. केवळ काही पावलांवर इतक्या पैश्याच्या राशी पडणार होत्या.
काय चालु असेल परेराच्या मनामध्ये?
स्टे ट्युन्ड फॉर मनी मनी -३
[क्रमशः]

Like this:
Be the first to like this post.