आत्ता पर्यंतची कथा बहुतांशी एकाच दिशेने जाणारी होती. बहुतांश घटना निल आणि आजुबाजुच्या लोकांच्या जिवनात घडणार्या होत्या आणि म्हणुनच आपण त्या निलच्या नजरेतुन पाहील्या. परंतु इथुन पुढे कथेला काही नविन पैलु पडत आहेत आणि हे सर्व निलपेक्षा लेखकाच्या नजरेने पहाणे जास्त रंजक ठरेल…
“निल, अरे रिटाला पैसे द्यायचा आज शेवटचा दिवस.. काय ठरवले आ्हेस तु?”, जतिन जवळ जवळ निलवर ओरडतच बोलला. परंतु नुकताच कार्यालयात आलेला निल अगदीच कुल होता. स्वतःशीच शिट्टी वाजवत तो आपल्या केबिनमध्ये गेला. जतिनला निलच्या ह्या शांत रहाण्याचे आश्चर्य वाटल्यापासुन राहीले नाही आणि तोही निलच्या पाठोपाठ त्याच्या केबिनमध्ये शिरला.
“निल…….”.. परंतु निलने जतीनचे वाक्य मध्येच तोडले आणि म्हणाला…”कुल डाऊन जतिन.. बस..” असं म्हणुन निलने समोरच्या खुर्चीकडे हात दाखवला.
जतीनला निलच्या ह्या वागण्याचा काहीच अंदाज येत नव्हता. तो अस्वस्थपणे खुर्चीत बसला.
“हम्म.. बोल आता…”, निल म्हणाला
“अरे बोल काय.. आज शेवटचा दिवस. पैश्याचा काही बंदोबस्त केला आहेस का?”, जतीन
“पैसे… फरगेट इट यार.. आता त्याची आवश्यकता भासणार नाही…”, निल
“म्हणजे? तु काय खुन वगैरे नाही ना केलास रिटाचा?”, जतीन चाचरतच म्हणाला. निलने जतीनच्या नकळत असे काही केले असले तर त्याच्या मास्टर-प्लॅनचा बट्याबोळ होणार होता.
“नाही रे..खुन वगैरे नाही केला. जिवंत आहे रिटा.. तिनेच पुढचे पैसे नाकारले. इतकेच नाही तर मी तिला पुर्वी दिलेले पैसेही ती परत करणार आहे..”, टेबलावर पाय टाकत निल आरामशीरपणे खुर्चीत रेलला.
“हे बघ निल, तु काय बोलतो आहेस मला खरंच काही कळत नाहीये. जरा समजेल असं सांगशील का?”, चुळबुळ करत जतीन म्हणाला.
“सांगतो.. सगळं सांगतो…”, असं म्हणुन निलने आदल्या दिवशीच्या संध्याकाळी रिटाबरोबर झालेल्या संभाषणाचा वृत्तांत कथन करायला सुरुवात केली.
साधारणपणे तासाभरानंतर निल पुर्वीसारख्याच जोमाने कामाला लागला होता. पैश्याचा प्रश्न सुटला होता. रिटाने पैसे परत केले की पैश्याअभावी अडकलेली कामेही मार्गी लागणार होती.
निलने सेक्रेटरीला केबिनमध्ये बोलावुन एकामागोमाग एक मिटींग्स स्केड्युल केल्या. ताबडतोब आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या पर्चेस ऑर्डर्स काढुन लगेचच सप्लायर्सला फॅक्स करुन टाकले.
संध्याकाळपर्यंत बरीचशी कामं मार्गी लागल्यावर निलला थोडी सवड मिळाली आणि निलचे मन आपोआप रिटाकडे वळले. रिटाची रहायची व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु कुठे, कशी हे त्याचे ठरत नव्हते. निलचा चेहरा एव्हाना बर्यापैकी सर्वपरीचीत झाला होता. त्याने स्वतःहुन जाऊन एखादे घर भाड्याने घेणे आणि ते सुध्दा एका मुलीसाठी योग्य नव्हते. अश्या बातम्या पसरायला वेळ लागत नाही हे निल जाणुन होता आणि त्यामुळेच त्याचे घोड अडले होते.
शेवटी त्याने संगणक पुढे ओढला आणि इंटरनेटवर शोध घ्यायला सुरुवात केली. शोधता शोधता त्याला मनाजोगती अशी एक जाहीरात नजरेस पडली.
मुंबई पासुन जवळच असलेल्या मढ-आयलंड नामक लोकॅलिटीमध्ये प्रायव्हेट व्हिलाज रेन्टवर होते. निलने ह्याबद्दल मागे एकदा ऐकले होते. अनेक धनाड्य लोक, राजकीय नेते, सेलेब्रेटी आपल्या रात्री सजवण्यासाठी असे व्हिला रेंट वर घेत असत. त्याची मुख्य खासियत अशी होती कि व्हिला रेंट वर देताना फारशी चौकशी केली जात नसे आणि रेंट वर घेणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जात असे. निलच्या दृष्टीने रीटासाठी हि अगदी योग्य जागा होती.
निलने लगेच फोन लावला. त्याच्या अपेक्षेपेक्षा पैसा थोडा जास्ती जाणार होता, पण निदान त्याला काळजी तरी नव्हती. वेब-साईटवर त्याने तो व्हिला पाहिला होता. एका उंच कड्यावर काहीसा एकांतात असलेला व्हिला त्याला आवडला होता. निल ने स्वतः चे नाव ‘राजीव गुप्ता’ असे सांगून महिन्याभरासाठी व्हिला भाड्याने घेतला.
“जतीन आता रे काय करायचं आपण?”, शरयु जतीनला विचारत होती.
“मला तर काहीच सुचत नाहीये. इतकी चांगली संधी चालुन आलेली होती. माझा अजुनही विश्वास बसत नाहीये हे सगळं असं हातातुन निसटुन जात आहे…”, जतीन म्हणाला
“मग आता? परत आपण वाट बघत बसायचं?”, शरयु
जतीनने व्हिस्कीचा एक पेग बनवला आणि बर्फाचे क्युब्स त्यात टाकुन तो समोरच्या सेटीवर रेलुन बसला.
“माझं ऐकना जतीन, आपण पळुन जाऊना. जाऊ देत ते पैसे. तु माझ्याबरोबर असशील तर मला दुसरे काही नको. आपण शुन्यातुन पुन्हा सुरुवात करु. हे आयुष्य असंच वाया चालले आहे…”
जतीनने हाताच्या खुणेनेच शरयुला गप्प रहायला सांगीतले. व्हिस्कीचा एक एक घोट घश्याखाली उतरवत तो विचार करण्यात गुंगुन गेला होता. बराच वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, “आपल्याला अजुनही संधी आहे. रिटा निलला ब्लॅकमेल करत नाहीये हे आपल्याला माहीती आहे पण पोलिसांना नाही. कदाचीत रॉनीला शोधण्यात वेळ घालवणे शक्य होणार नाही, पण जर आपणच रिटाचा खुन केला तर?”
खुन करण्याच्या नुसत्या विचारांनी शरयुचे डोळे भितीने मोठ्ठे झाले.
“शिवाय रिटाच्या रहाण्याची व्यवस्था निलच करणार आहे.. म्हणजे रिटाचा खुन झाल्यावर निल ही पहीली व्यक्ती असणार ज्याला रिटाचा ठाव-ठिकाणा माहीती होता. तपासात पुढे मागे हे उघड होईल आणि निल पोलिसी जाळ्यात सापडेल.”, जतीन
“पण जतीन.. खुन म्हणजे.. तुला कळतं आहे का? आपण पकडलो गेलो तर सरळ फासावर चढु…”, शरयु
“दुसरा काही पर्याय नाहीये शरयु.. अधीक वेळ घालवला तर आलेली संधीही हातची जाईल…”, जतीन बॉटम्स-अप करत म्हणाला
“थॅन्क्यु सो मच निल..”, व्हिलामधील बेडरुममध्ये आपली बॅग ठेवत रिटा म्हणत होती, “तुझ्या जागी मी असते तर कदाचीत मला मरायला सोडुन दिले असते, एस्पेशीयली जेंव्हा माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला होता. मी जेंव्हा जेंव्हा तुझ्या आयुष्यात आले, तेंव्हा तेंव्हा तुझ्यावर संकटच ओढवली..तु मला यातुन बाहेर काढ, मी पुन्हा तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही….”
मरुन रंगाचा चुडीदार रिटाने परीधान केला होता. ओठांवर साजेसे हलक्या रंगाचे लिप्स्टीक, लाल रंगाच्या रिबिनने बांधलेले केस आणि हातांमध्ये मोजक्याच चंदेरी रंगाच्या बांगड्या रिटाचे रुप खुलवत होत्या. निलची नजर रिटाच्या सर्वांगावरुन फिरत होती.
रिटा कधीकाळी एक उत्कृष्ठ मॉडेल बनु शकली असती हे निल विसरला नव्हता. तिला ड्र्ग्स ची घाणेरडी सवय नसती तर रिटा आज कुठल्या कुठे पोहोचली असती
“कदाचीत.. रिटाने थिक-कप शेप्ड ब्रेसियर परीधान केला असावा..”, निलने मनोमन विचार केला कारण रिटाचे उरोज नेहमीपेक्षा अधीकच उठावदार दिसत होते. रिटाचा चुडीदार घट्टपणे तिच्या शरीराला बिलगला होता. तिच्या ड्रेसचा फ्रिल खिडकीतुन येणार्या वार्याच्या झोक्याबरोबर हेलकावे खात होता.
“काही आठवड्यांपुर्वीच रिगालिया बारमध्ये आपल्याला ब्लॅकमेल करायला भेटलेली उसाच्या चिपाडासारखी दिसणारी थर्ड-क्लास रिटा ती हीच का?”, असा एक विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला.
निल नकळत रिटाकडे आकृष्ट झाला.
“इट्स ओके रिटा. इव्हन आय बिहेव्ह्ड बॅडली व्हेन यु निडेड मनी…” निल म्हणाला.
रिटा आणि निल काही क्षण एकमेकांकडे पहात राहीले. नक्की कुठल्या क्षणी दोघांचे ओठ एकमेकांवर टेकले हे दोघांनाही कळाले नाही.
“डोन्ट वरी रिटा, तु इथे सेफ आहेस.. रॉनीचे काय करायचे ते मी बघतो..”, पोर्चमधुन आपली गाडी काढत निल म्हणाला
रिटाच्या चेहर्यावर रॉनीचे नाव निघताच एक कसनुसे हास्य येउन गेले…
“मी तुझी वाट पाहीन निल, परत येऊन जा इकडे”, रिटा म्हणाली.
निलने गेटमधुन गाडी बाहेर काढली तेंव्हा त्याच्या रेअर-व्ह्यु मिररमध्ये रिटा त्याला बाय करताना दिसत होती.
निल दुसर्या दिवशी ऑफीसमध्ये पोहोचला तेंव्हा जतीन ऑफीसमध्ये नव्हता.
जतीनच्या आजकाल कार्यालयात फारच सुट्या होत होत्या हे निलला जाणवल्यावाचुन राहीले नाही. परंतु महत्वाची बहुतेक सर्व कामं आता मार्गी लागली होती आणि जतीनवाचुन तसेही सध्या काही अडत नव्हते त्यामुळे तो त्याच्या अनुपस्थीतीकडे डोळेझाक करत होता.
कदाचीत इतके दिवसांच्या लगबगीनंतर त्याला विश्रांतीची गरज वाटणे सहाजीक होते. शिवाय निलच्या अनुपस्थीतीत जतीनने शक्य तो त्याच्या कामाचा बोजा उचलला होताच.
निलचे मन इतर विचारांत मग्न होते त्यामुळे त्याने जतीनचा विचार बाजुला सारला. त्याचे मन पुन्हा रिटाचा विचार करु लागले. रॉनीला शोधणे सोपे नव्हते. त्याने स्वतः दोन दिवस प्रयत्न करुन पाहीले होते, पण रॉनी सोडा, रॉनीचे नख सुध्दा त्याच्या नजरेस पडले नव्हते. कसेही करुन रॉनीचा शोध लागणे गरजेचे होते.
निलने टेबलावर पडलेली येलो-पेजेसची जाडजुड डिरेक्टरी समोर ओढली आणि तो त्यतील काही जाहीराती चाळु लागला. बरीच शोधाशोध केल्यानंतर एका बर्या वाटणार्या जाहीरातीपाशी त्याची नजर खिळली. मनोमन काही निश्चय करुन त्याने डिरेक्टरीमध्ये दिलेला नंबर फिरवला.
“हॅलो.. शर्ले डिटेक्टीव्ह्ज…”, पलीकडुन एक रुक्ष आवाज आला.
“गुड मॉर्नींग.. माझं नाव…”
“एक मिनीटं.. जोपर्यंत आम्ही क्लायंट साईन-अप करत नाही तो पर्यंत आम्हाला त्याच्या नावात काहीही रस नसतो.. काम बोला…”
समोरच्या ह्या अनपेक्षीत वाक्याने निल क्षणभर अडखळला आणि मग म्हणाला, “मला दोन व्यक्तींवर पाळत ठेवायची आहे. त्या व्यक्ती कुठे जातात? काय करतात? वगैरे वगैरे सगळी माहीती हवी आहे. त्यातील एका व्यक्तीचा पत्ता माझ्याकडे आहे, दुसर्या व्यक्तीचा शोध लावायचा आहे. मला तुमच्या एजन्सीचा बेस्ट डिटेक्टीव्ह पाहीजे. पैसे तुम्ही जे मागाल ते. रिझल्ट जसे मला हवेत तसे..”
“व्हेरी वेल.. तुमचा नंबर सांगा, आमचा एजंट तुम्हाला संपर्क करेल. तुमचे नाव, तुमचे काम हे फक्त त्यालाच सांगा. त्याच्याव्यतीरीक्त ह्याची माहीती कुणालाही नसेल…”
निल एकुणच ह्या गुप्ततेबद्दल खुश झाला होता. त्याला हे काम स्वतःची आयडेंटीटी गुप्त ठेवुन करुन घ्यायचे होते. त्याची ह्या बाबतीत असलेली कुठलीही इन्व्हॉलमेंट भविष्यात कधीही उघड न होणे हेच त्याला अपेक्षीत होते.
निलने आपला मोबाईल नंबर पलीकडील व्यक्तीला सांगीतला.
“धन्यवाद.. लवकरच तुम्हाला संपर्क केला जाईल..”, असं म्हणुन पलीकडुन फोन बंद झाला.
साधारणपणे दोन तासांनंतर निलने आपल्या सेक्रेटरीला इंटरकॉमवरुन डिस्टर्ब न करण्याबद्दल सुचना दिल्या आणि तो ‘कुशल दुबे’ नामक व्यक्तीची वाट पहात बसला.
‘शर्ले डिटेक्टीव्ह्ज’ला फोन झाल्यानंतर ४५ मिनीटांमध्येच ‘कुशल दुबे’नामक एका व्यक्तीने फोन करुन भेटायची अपॉईंटमेंट घेतली होती आणि निलने त्याला ऑफीसमध्येच भेटायला बोलावले होते. जतीन ऑफीसमध्ये नसल्याने त्याचे बोलणे कुणी ऐकण्याची भिती त्याला नव्हती.
बरोब्बर ठरल्या वेळी सेक्रेटरीने बाहेर ‘कुशल दुबे’ नावाची व्यक्ती त्याला भेटायला आल्याचे सांगीतले आणि निलने तिला आत पाठवायला सांगीतले.
निलच्या अपेक्षे्पेक्षा ‘कुशल दुबे’ खुपच वेगळा निघाला. निलच्या दृष्टीने कुशल एखादा तिशीतला स्मार्ट, डॅशींग तरुण होता परंतु प्रत्यक्षात त्याच्या केबिनमध्ये आलेली व्यक्ती साधारणपणे चाळीशीतली होती. डोळ्यावर जाड फ्रेमचा आणि मोठ्या गोलाकार काचांचा चष्मा होता, डोक्यावर अत्यंत विरळ केस होते. चप्पट पाडलेल्या भांगातुन एकाआड एक केस-टक्कल असे विचीत्र पॅटर्न तयार झाले होते. सरकारी बाबु सारखे पोट पुढे आलेले होते. पॅन्ट पोटावरुन घसरु नये म्हणुन सस्पेंन्डर्स लावलेले होते. अंगात निळ्या-पांढर्या चौकटी-चौकटींचा शर्ट, मळकट करड्या रंगाची पॅन्ट आणि खांद्याला लावलेली एक पिशवी ज्यामध्ये किमान ला्खो रुपायांचा माल असावा अश्याप्रकारे त्याने दोन्ही हातांनी ती पिशवी घट्ट धरली होती.
“हॅव-अ-सिट..”, समोरच्या खुर्चीकडे हात दाखवत निल म्हणाला.
कु्शल तत्पर्तेने येउन खुर्चीत बसला. आपल्या पिशवीतुन त्याने एक मळकट वही-पेन्सील काढली आणि जणु काही समोरील व्यक्ती ही शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि काहीतरी गृहपाठच सांगणार आहेत अश्या आवेश्यात सरसावुन बसला.
निलचे मन अजुनही ‘कुशल दुबेला’ बेस्ट डिटेक्टीव्ह मानायला तयार नव्हते. पण आता तो समोर येऊन बसलाच होता तर निदान त्याला काम सांगणे गरजेचे होते. निदान काही आठवडे त्याची प्रोग्रेस बघुन नंतर बदली डिटेक्टीव्ह मागुन घेता आला असता.
निलने टेबलावरच्या ग्लासमधुन पाणी प्यायले आणि तो म्हणाला, “कुशल, मला दोन माणसांची…”
“सर…” काहीश्या हताश स्वरात कुशल म्हणाला, “तुम्ही सांगीतलेली रिक्वायर्मेंट मला मिळालेली आहे. त्या दोन व्यक्तींची पुर्ण माहीती तुम्हाला एका आठवड्यात मिळेल. मला फक्त त्यांचे नाव, फोटो असेल तर फोटो नाही तर त्यांचे वर्णन, आणि त्यांची थोडीफार पार्श्वभुमी मला सांगा. त्यापुढे काय करायचे ते मी बघीन.”
निलने एकवार मान डोलावली व म्हणाला, “पहीली व्यक्ती, ज्याचे नाव रॉनी आहे, नुकताच मुंबईमधील तुरुंगातुन सुटला आहे आणि सध्या भायकळा इथे कुठेतरी असण्याची शक्यता आहे..”, असे म्हणुन निलने त्याला रॉ्नीचे वर्णन सांगीतले
कुशल आज्ञाधारकपणे सर्व बोलणे नोंदवुन घेत होता.
“दुसरी व्यक्ती स्त्री आहे जिचे नाव रिटा.. ती सध्या मढायलंड मधील एका व्हिलामध्ये रहात आहे.”, मग निलने त्याला रिटाचे वर्णन सांगीतले आणि म्हणाला, “रिटाला रॉनीकडुन धोका आहे…”
“व्हेरी वेल सर.. तुमची माहीती मी नोंदवुन घेतली आहे. मी एका आठवड्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट देईन..”
“ऑलराईट देन..”, असं म्हणुन शेक-हन्ड्स करण्यासाठी निल खुर्चीतुन उठुन उभा राहीला परंतु कुशल अजुनही खुर्चीतच बसुन होता जसा हॉटेलच्या रुममध्ये सामान पोहोचवल्यानंतर रुम-बॉय टीप साठी तात्कळत उभा असतो..
“ओह.. तुमची फी….”, असं म्हणुन निलने ड्रॉव्हरमध्युन पैश्याचे एक पुडके काढले आणि कुशलकडे ढकलले.
पैसे बघताच कुशलच्या चेहर्यावर एक आनंदाची चमक आली.
“धन्यवाद सर..”, असं म्हणत त्याने पटकन ते पैसे उचलुन आपल्या पिशवीत कोंबले आणि क्षणाचाही विलंब न करता तो केबीनमधुन बाहेर पडला.
पुढचे दोन दिवस शांततेतच गेले. निलने स्वतःला कामात झोकुन दिले होते. कामाची प्रोग्रेस प्लॅननुसार व्यवस्थीत चालली होती. जतीन अजुनही ऑफीसमध्ये आला नव्हता.
“जतीनला फोन करावा काय?”, असा एक विचार निलच्या मनात येउन गेला. निल विचारमग्न होता तोच त्याचा फोन किणकिणला..
“हॅलो..!”, पलीकडुन रिटाचा आवाज आला
“हॅलो.. रिटा… बोल काय म्हणतेस?”, निल म्हणाला..
“संध्याकाळी फ्रि आहेस?”, रिटा
“आज संध्याकाळी?.. अंम्म.. तशी आहेत काही कामं, पण विशेष काही नाही, नंतरही करता येतील.. का?”,निल
“मग ये ना संध्याकाळी इकडे. फार कंटाळा येतो रे इथे.. कुठे बाहेरही जाता येत नाही.. शिवाय मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.. येतोस?”, रिटा
“ठिक आहे, येतो ८-८.३० पर्यंत..”, निल
“बरं, ऐक ना, येताना माझं फेव्हरेट चायनिज घेउन येशील? डोन्ट वरी, आय विल पे.. तुला नाही पैसे भरावे लागणार..”, रिटा हसत हसत म्हणाली
“श्युअर..”, असं म्हणुन निलने फोन बंद केला
रिटाबरोबरच्या त्या पॅशनेट किसच्या आठवणी निलच्या मनात अजुनही ताज्या होत्या. त्याने खिडकीतुन बाहेर नजर टाकली. पावसाळी ढग आकाशात जमा होऊ लागले होते. वातावरणातही गारवा पसरला होता. कड्यावर उभ्या असलेल्या त्या व्हिलामध्ये थंडगार वार चारही दिशांतुन येउन खचीतच गारवा पसरवत असणार. त्या बेधुंद वातावरणात रिटाच्या गरम शरीराचा सुखावणारा स्पर्श निलला रोमांचीत करत होता. मग अचानक त्याला कुशलची आठवण झाली.
चुकुन माकुन कुशल टेहळणी करण्यासाठी नेमका आज तिथे असला तर? त्याने आपल्याला रिटाबरोबर पाहीले तर…???
त्याने लगेच कुशलचा फोन नंबर फिरवला. दोन रिंग मध्येच पलीकडुन दमलेला कुशलचा आवाज आला.
“सर…”
“कुशल…एनी प्रोग्रेस?”, निलने विचारले
“येस्स सर.. पण सर काही गोष्टी अजुन क्लिअर नाही आहेत.. सो अर्धवट माहीती सांगण्यापेक्षा मी तुम्हाला ह्या आठवड्याच्या शेवटीच सगळा रिपोर्ट देईन!”
“नो प्रॉब्लेम कुशल.. टेक युअर ओन टाईम.. तुला पाहीजे असेल तर तु आज सुट्टी घेऊ शकतोस.. डोन्ट स्ट्रेस युअरसेल्फ..”, निल
“ओह थॅन्क्यु सो मच सर.. माझी बायको प्रेग्नंट आहे..तिला माझी फार गरज आहे.. सो काईंड ऑफ यु सर… थन्क्यु सो मच..”, असं म्हणुन कुशलने फोन बंद केला.
रोड वॉज क्लिअर नाऊ.. निल वॉज ऑल सेट टु हॅव अ रोमॅन्टीक एव्हनींग विथ रिटा…..
पण………………………..
[क्रमशः]
मंडळी, मागच्या भागात मी म्हणलो होतो की पुढचा भाग हा शेवटचा भाग असेल, परंतु कथेमध्ये काही नविन ट्विस्ट सुचले आहेत आणि निदान दोन भाग तरी अजुन वाढतील. मला खात्री आहे तुम्ही हे ट्विस्ट वाचुन निराश नाही होणार.
वाचत रहा ब्लॅकमेल कथेत होणार्या नविन घडामोडी……
उत्तम चाललीय कथा..
एक गोष्ट मात्र थोडी खटकली, ८-10 दिवसांपूर्वीच चिपाड दिसणारी रिटा एकदम आकर्षक कशी काय वाटू शकते? कथे चा पुढच्या प्लॉट मध्ये त्या दोघांचा तसा संबंध येणे गरजेचे असेल कदाचित
It lot depends on how you present yourself. Rita inherited lot of cash from Nil. She had better dresses, better perfumes to present herself. Well thats a usual explanation. But you will hear more about this in coming episodes of the story.. stay tuned buddy
katha khup chan aahe pan pudhacha bhag lavakar dya. Very nice@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
ya bhagamadhye jasta pragati nahi zali pan pudhachya bhagache kutuhal vadhale..
Nil ritakade gelyavar aata ” ooh la la ” gaane background la vajel ka kaay asa vatatay.. hehe
Nehamipramanech sundar aahe ha suddha bhag.. keep it up..
khup chan mala vatat hote lagech ya kathecha shevat nako tasech tumhi lihile thanks.Good day.
mast ahe re………. kase kay achanak tumhi valan badale pan its good…….. mala tar vatate he sampuch naye , asech kahise anapekshit pan romanchak badal vhavhet……. really nice……… thanks………
mast chalaliye katha. pan ata jast wel naka lau pudhachya bhagasathi. utsukata khupach panala lagaliye
Bare zale katha vadhvali.. itki changali katha sampnar yache dukha hot hote…
aata tya Sharayu chi pahile vilhevaat laav.. faithless woman sali…
छान . उत्कृष्ट !
हवा तितका वेळ घ्या. अजून कथा मोठी झाली तरी चालेल. चं धक्के देता तुम्ही. अजून नवीन ट्विस्ट मंजे अजून नवीन धक्के . छान .
खूपच आतुरतेने वाट बघतो आहे पुढच्या भागाची .
GREAT WORK…………………..
LAVKAR NEXT PART POST KAR…………………..
khup mast chalali aahe katha. ajun kahi bhag vadhale tari chalel pan pudhacha bhag lavakarat lavakar pathava.
धन्यवाद् अनिकेत सर
माला वाटलेच की पुढची पोस्ट सोमवार पर्यंत येईल
कृपया पुढची पोस्ट रविवार च्या आत ताका (नम्र विनंती )
कथा खुपच चान होत चालली आहे.
खुप खुप धन्यवाद्
navin twist baddal Aikun Utsukata vadli aahe. plZ lavkar blog taka….
अनिकेत दादा,
आज सगळे अकरा भाग वाचून झाले. काही भाग फार छान जमलेत.
कथानक संपवता संपता नवीन ट्वीस्ट सुचतात म्हणजे सिरीयल ही जमू शकतात तुम्हाला :
अकराव्या भागात काही expected ट्वीस्ट होतील असे वाटले त्याहून वेगळे घडले पण पाहूया पुढील भागात काय घडते ते ?
अनिकेतराव तुमच्या कथा जसे धक्के देत असतात आज तसेच तुम्ही पण शेवट लांबणार म्हणून धक्का दिला.एकदम झकास चाललीय कथा तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. परंतु ८ व्या भागानंतर जितका वेळ घेतला तो जरा जास्त वाटला……….!!
ITS SO NICE TO READ THE STORY BESTCH
khupch chhan aniket
please please dont kill rita n jatin. i m really getting excited to see what happens next.
very nice
Aniket,
When are you coming up with the next episodes?
Can’t wait further ?
Daily morning I open this bookmark for part 12.
Thanks.
I’m so sorry dear friend.. i am hoping to post it on saturday / sunday
thanks
saturday aahe ki aaj kenva pathavanar katha amhi khup aturtene vat pahat aahot. Gd
a aniket kiti ant baghtos yaar? kiti vat baghaychi ata? lavkar pudhacha bhag load kar plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz