“कर्णीक, धिरेन कुमार उद्या लॅन्ड करतील. आपल्या हातात ३६ तास आहेत. ते इथे पोहोचायच्या आत आपल्या तपासात काहीतरी प्रगती हवी. त्यांना फेस करताना, आमचा तपास चालु आहे असे मोघम उत्तर चालणार नाही..”, कमीशनर कर्णीकांना सांगत होते.
“डोन्ट वरी सर.. आम्हाला काही पॉईंन्टर्स मिळाले आहेत, कुमार इथे येतील तेंव्हा त्यांना सांगण्यासाठी आपल्याकडे नक्कीच काहीतरी असेल”, कॉनफीडंन्टली कर्णीक म्हणाले.
“ऑलराईट देन, लेट्स नॉट वेस्ट टाईम.. गेट मुव्हिंग..”
कर्णीकांनी एक खणखणीत सलाम ठोकला आणि ते माघारी वळले
निल आपल्या केबिनमध्ये येरझार्या घालत होता. आत्ता नाही तर उद्या.. नाही तर अजुन एक-दोन दिवसांत पोलिस तपासाला त्याच्या दारावर थडकणार होतेच. ते संकट काय कमी होते म्हणुन हा ‘कुशल दुबे’ आणि त्याचा कोण मित्र अचानक उगवले. निलला एक गोष्ट मात्र राहुन राहुन खटकत होती आणि ती म्हणजे कुशलने जी फाईल दिली होती त्यामध्ये रिटाची पुर्ण माहीती होती, ती ज्यांना ज्यांना ब्लॅकमेल करत होती त्यांची लिस्ट होती, निलचा इतिहास जो त्याने इतक्या वर्ष जपला होता तो लिहीला होता. पण आश्चर्याची गोष्ट होती ती म्हणजे गेली ११ वर्ष ती कुठं होती, काय करत होती ह्याबद्दल विशेष उल्लेख नव्हता. रॉ्नी जो कधीकाळी रिटाचा बॉयफ्रेंड होता, ज्याला रिटाने तुरुंगात अडकवले होते आणि आता तुरुंगातुन सुटल्यावर जो रिटावर टपलेला होता त्याची काहीच माहीती नव्हती.
असं का? ती फाईल बायस्ड वाटत होती.. काहीतरी लिंक मिसींग होती जी निलला अस्वस्थ करत होती. हा जो कोणी कुशलचा मित्र ‘विनीत’ आहे.. निलला त्याबद्दल फारशी खात्री वाटत नव्हती. विनीत नावाच्या एखाद्या काल्पनीक नावाखाली कुशल निलला ब्लॅकमेल करु पहात असावा असा काहीसा विचार त्याच्या मनात डोकावत होता. पण हा संशय खरा का खोटा पडताळावा कसा?
निलच्या डोक्यात अचानक एका माणसाचे नाव आले… ‘रमाकांत फडणीस’. अनेक गुन्हे करुनही पोलिस रेकॉर्डवर एकही नोंद नसलेला पांढरपेशी गुंड. बांधकाम व्यवसायात आल्यापासुन निलला ह्या ना त्या कारणाने अश्या माणसांची गरज लागायचीच. म्हणजे तसे निलने काही बेकायदेशीर केले नाही, पण रमाकांतसारखा माणुस हाताशी असणे त्याच्याच काय, अनेक बांधकाम व्यवसायीकांच्या दृष्टीने फायद्याचे ठरत होते.
रमाकांतच्या लेखी निल म्हणजे ‘लय ग्वाड माणुस’ होता. अनेक लोकांनी रमाकांतकरवी अनेक उद्योग धंदे करवले होते. पण निल असा एकच माणुस होता ज्याला रमाकांतची क्वचीतच गरज पडली होती.
“सायबा.. तु कदी पण बोलीव मला.. तु म्हनशील ते काम करीन म्या..”, रमाकांत एकदा त्याला म्हणाला होता.
कदाचीत ती वेळ आता आली होती.
निलने फोन उचलला आणि रमाकांतचा नंबर फिरवला.
“बोल सायबा.. काय काम काडलंस?..”, पलीकडुन रमाकांतचा मर्दानी आवाज आला.
“रमाकांत, कधी ‘विनीत दरडा’ नावाचा माणुस ऐकला आहेस? प्रायव्हेट डिटेक्टीव्ह आहे..”, निल म्हणाला
“विनीत दरडा?? नाय ह्यो नाव पहील्यांदा ऐकतो हाय”
“म्हणजे तसा वेल नोन नाही.. पण आपल्याच शहरातला आहे..”
“शक्यच नाय. ह्या गावातल्या प्रत्येकाला ओल्खुन हाय..”
“यु शुअर..”
“शुअर.. स्युअर सायबा…”
दोन क्षण शांततेत गेले…
“कुशल दुबे.. ह्याला ओळखतोस??”
“कुशल दुबे? ते बसंकं.. ढापणं, ढोलं.. घामट्ट त्येच ना?”
“हो हो.. तोच… एक काम करशील???”
“करनार ना.. त्याला टपकवाय्चाय काय? साल्याने एकदा मला लटकवायचा प्रयत्न केलान व्हता.. तवा वाच्ला.. बोल पायज्या तर उडवतो लेकाला…”
“नाही नाही.. उडवायचा नाहीये.. मला त्याच्या कार्यालयातील एक महत्वाची फाईल हवी आहे..बहुतांशी त्या फाईलवर माझंच नाव असेल.. देशील आणुन?”
“काय सायबा.. इव्ह्ढ्युस कामं? झालंन समज.. उद्या सकाली तुला ह्यो फाईल मिळनार.. चल लागतो कामाला मी…”
‘धिरेन कुमार’ची फ्लाईट रात्री १२:३०ला उतरली तेंव्हा प्रसिध्दी माध्यमाचे अनेक प्रतिनिधी बाईट्स घेण्यासाठी थांबलेले होते, पण कुमारना असल्या फालतु गोष्टींमध्ये रस नव्हता आणि वेळही नव्हता. त्यांच्या सांगण्यानुसार विमानतळाच्या मागच्या प्रवेशद्वारापाशी काळ्या रंगाची टुरिस्ट लिमो त्यांची वाट बघत उभी होती.
काळ्या रंगाचा ब्लेझर, तोंडामध्ये एक किमती सिगार आणि खांद्याला एक लॅपटॉपची बॅग घेउन संथपणे पावलं टाकतकुमार मागच्या दाराने बाहेर पडले आणि लिमोमध्ये जावुन बसले. त्यांच्या चेहर्यावर कसलेही भाव नव्हते परंतु त्यांच्या डोक्यामध्ये असंख्य गोष्टींचा विचार चालु असावा हे त्यांच्या चेहर्याकडे बघुन कोणीही सांगु शकले असते.
“सर, स्ट्रेट टु हॉटेल?”, ड्रायव्हरने विचारले..
“नो.. स्ट्रेट टु कमीशनर ऑफीस..”, कुमार थंड स्वरात म्हणाले.
कमीशनर आणि कर्णीक धिरेन कुमारची वाट पहात ऑफीसमध्ये थांबले होते.
“आर यु १००% श्युअर कर्णीक? मला वाटत नाही तुझा रिपोर्ट ऐकुन कुमार सर खुश होतील..”, काहीश्या चिंतीत स्वरात कमीशनर म्हणाले.
“सर.. आपण इथे कुमार सरांना खुश करायला बसलो नाही आहोत. जे सत्य आहे ते त्यांना सांगणे महत्वाचे आहे. मी माझ्या रिपोर्टवर १००% श्युअर असतो सर..” कर्णीक म्हणाले
दोघांचे संभाषण चालु होते तेवढ्यात कुमार दरवाजा उघडुन आत आले.
कुमार खुर्चीत बसत असतानाच कमीशनर हवालदाराला म्हणाले, “अरे सरांना कॉफी पाठव..”
“डोन्ट बॉदर.. लेट्स टॉक अबाऊट वर्क..”, चष्म्याची काच सावकाश आणि सावधानतेने पुसत कुमार म्हणाले. आपला वेळ घेत त्यांनी काच स्वच्छ पुसली आणि मग तो चष्मा नाकावर चढवुन आपले घारीसारखे तिक्ष्ण डोळे कमीशनरांकडे रोखुन पहात बसले.
“कर्णीक.. तुमचा रिपोर्ट…”, कमीशनर म्हणाले
कर्णीकांनी टेबलावरची फाईल उचलुन कुमार सरांच्या हातात दिली.
कुमारांनी एकवार कर्णीकांकडे पाहीले आणि पुढचा अर्धा तास ते काहीही न बोलता शांतपणे एक एक पान उलगडत रिपोर्ट वाचण्यात मग्न होऊन गेले.
सर्व रिपोर्ट वाचुन झाल्यावर त्यांनी ती फाईल टेबलावर बंद करुन ठेवली, आपला चष्मा काढुन तो केसमध्ये बंद करुन ठेवुन दिला आणि मग हाताची घडी घालुन डोळे मिटुन शांत बसुन राहीले.
कमीशनर आणि कर्णीकांची एकवार नजरानजर झाली. कमीशनर साहेबांनी हळुच हाताने खुण करुन कर्णीकांना शांत रहाण्याची खुण केली.
काही वेळानंतर कुमार म्हणाले, “तुम्ही दिलेल्या माहीतीवर माझा विश्वास तर बसत नाहीये, बट आय डोन्ट हॅव आदर चॉईस दॅन टु बिलीव्ह यु.. एनीवेज. तुमची नेक्स्ट प्लॅन ऑफ अॅक्शन काय आहे?”
“रिटाच्या खात्यामध्ये नुकतेच काही करोड रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. निल नावाच्या एका व्यक्तीने हे पैसे जमा केले आहेत. जर हे काही ब्लॅकमेल संबंधीच असेल तर त्याचाच संबंध ह्या खुनाशीही असु शकतो. रिसेंट केस आहे ही ब्लॅकमेलची. त्यामुळे आम्ही आमचे तपासकार्य त्याच्यापासुनच सुरु करणार आहोत.”, कर्णीक म्हणाले.
“तुम्हाला असे वाटते आहे कि हा खून ह्या कोणी नील ने केला आहे?”, कुमार
“नाही, तसे वाटत तर नाही. कारण त्यांची काहीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. शिवाय पोस्ट-मार्टम रिपोर्ट नुसार खून साधारण ७ च्या सुमारास झाला आहे ज्या वेळी नील आपल्या कार्यालयात होते हे आमच्या तपासात सिद्ध झाले आहे.”, कर्णिक
“हे बघा…”, कुमारांनी कर्णीकांच्या वर्दीवरील नेम प्लेट वाचली व पुढे म्हणाले, “हे बघा कर्णीक, जे व्हायचं ते होऊन गेले. एक लक्षात ठेवा, ह्यातील कुठलीही गोष्ट मिडीयापर्यंत जाता कामा नये. तुम्ही तुमचा रिपोर्ट बदला, रिटाचा मृत्यु खुनामुळे नाही, अपघाती होता हे तुम्ही सांगायचे आणि ही केस बंद करुन टाकायची. कदाचीत रिटाने एखाद्या पार्टीत पहील्यांदाच ड्रिंक घेतले असावे आणि घरी आल्यावर बेडरुममध्ये तिचा पाय घसरला आणि डोकं बेडवर आपटुन तिचा अपघाती मृत्यु झाला असे मिडीयाला कळले पाहीजे…”, थंडपणे कुमार म्हणाले.
“अहो पण सर, परिस्थिती स्पष्ट दर्शवते आहे कि मृत्यू अपघाती नाहीये, तिचा खून करण्यात आलाय आणि….”, कर्णिक त्वेषाने म्हणत होते..
कुमारांनी कर्णिकांचे बोलणे दुर्लक्षित केले आणि ते कामिशनारांना म्हणाले, “मला हे प्रकरण इथेच संपलेले हवेय कमिशनर, तुम्हाला ह्यासाठी अजून कुणाची वरून ओर्डर हवी असेल तर मला सांगा, मी तशी व्यवस्था करतो.”
कमिशनरांच्या उत्तराची वाट न बघताच कुमार खुर्चीतून उठून बाहेर गेले होते.
मोबाईलच्या स्क्रीन वर झळकणारा अनोळखी नंबर बघून काहीश्या कुठूहालानेच निलने फोन उचलला.
“हैलो मि.निल..??”
“येस्स, स्पिकिंग..”
“मि.निल सकाळी १०.३० वाजता ग्रांड हयात हॉटेल मध्ये प्रेसेडेनशिअल सूट ४ मध्ये मी तुमची वाट बघतोय, आशा करतो तुम्ही याल..”
“कोण बोलतेय?”
“धीरेन कुमार.. रिटा कुमार माझी मुलगी होती…”
निल काही बोलायच्या आताच फोन बंद झाला होता.
निल स्वतःच्या विचारात बुडून गेला.
कुमारांचे माझ्याकडे काय काम असू शकते?
त्यांनी मलाच का फोन केला असावा?
रीटाच्या खुनात माझा काही सहभाग आहे असे काही जग-जाहीर तर झाले नाही ना?
आधीच प्रश्न, चिंता काय कमी होत्या कि हे अजून के लोढनं वाढले होते..
निल ने परत आपला मोबाईल उचलला आणि `रमाकांत फडणीस’ ला फोन लावला. दोन-तीनदा प्रयत्न करूनही फोन `आउट=ऑफ-रिच’ येत होता. निल ने वैतागून फोन खाली ठेऊन दिला. त्याने घड्याळात पहिले. सकाळचे ८.३० वाजत होते. निल पटापट फ्रेश झाला, दाढी केली, बिझिनेस मिटिंग साठी वापरतो त्यापैकी एक चांगलासा शर्ट काढला आणि ९.३० च्या सुमारास तो आपल्या गाडीत बसून कुमारांना भेटायला बाहेर पडला.
ग्रांड हयात हॉटेल मधील प्रेसेडेनशिअल सूट ४ मध्ये जेंव्हा निल पोहोचला तेंव्हा एका अलिशान, आरामदायी खुर्चीवर बसून कुमार पेपर वाचण्यात मग्न होते. कडेला अनेक पेपर्स चा ढीग पडला होता. बहुदा रिटा कसे बद्दल विविध पेपर्स मध्ये आलेली बातमी ते वाचत होते.
नीलच्या येण्याने त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही फरक पडला नाही. रूम सर्विस द्यायला आलेल्या एखाद्या रूम बॉय कडे पाहावे तसे त्यांनी निल कडे पहिले आणि त्याला बसायची खुण केली.
हातातली बातमी वाचून झाल्यावर त्यांनी पेपर खाली ठेवली आणि आपली नजर निल कडे वळवली.
बराच वेळ ते आपल्या तीक्ष्ण नजरेने नीलकडे पाहत होते. निलला त्यावेळी जणू काही एखाद्या एक्स-रे मशीन खालून चालल्यासारखे वाटत होते. त्यांची भेदक नजर त्याच्या काळजाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होती.
थोड्यावेळाने कुमार म्हणाले, “मि. निल मला माहित आहे कि रिटाचा खुन तुम्ही केलेला नाही….”
निलला एकदम छातीवरून कित्तेक किलोंचा दगड बाजूला झाल्यासारखे वाटले. तो ह्या अपेक्षेने आला होता कि कुमार त्याच्यावर आरोप करतील, त्याला आपली बाजू मांडत बसावी लागेल वगैरे वगैरे. पण कुमारांनी एका क्षणात त्याच्यावर विश्वास दाखवला होता.
“..पण..”, कुमार पुढे बोलू लागले..”पोलिसांची अजून तशी खात्री नाही.. रीटाच्या ब्लॅकमेल लिस्ट मध्ये तुम्ही होतात हे पोलीस जाणून आहेत आणि त्यामुळेच आज नाहीतर उद्या त्यांचा ससेमिरा तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही.”
अस्वस्थपणे चुलबुल करणाऱ्या नीलकडे एकवार कुमारांनी पहिले आणि ते पुढे म्हणाले..”अर्थात ह्यातून मी तुम्हाला बाहेर काढू शकतो.. पण त्यासाठी मला तुझी मदत हवीये..”
“हम्म.. आता आलं लक्षात..”, निल स्वतःशीच म्हणाला..”हा म्हातारा फुकट कसे काय करेल…”
“फुकट नाही मि. निल..”, जणू काही निल च्या मनातील विचार वाचल्यासारखे कुमार म्हणाले.. “एक तर ह्या प्रकरणातून मि तुम्हाला सही सलामत बाहेर काढेन आणि दुसरे म्हणजे तुम्हाला हवा तो मोबदला मी तुम्हाला देईन.. तुमच्या वेळेच्या किमतीच्या दहा पट रक्कम मी देईन.. जर का माझे काम केलेत तर..”
“कसलं काम?”, नीलने चाचरत विचारले.
“सांगतो.. त्या-आधी मला तुम्हाला अवगत असलेली रीटाची सर्व माहिती हवी आहे.. सर्व..”, असं म्हणून कुमार खुर्चीत टेकून बसले. डावा पाय उजव्या पायावर टाकला तर दोन्ही हाताची बोट एकमेकांत अडकवून ते नीलच्या बोलण्याची वाट पाहू लागले.
नीलला एव्हाना खात्री पटली होती कि हा माणूस आपल्याला नक्की वाचवू शकेल. त्याच्यापासून लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. नीलने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याने घडलेला सर्व इतिहास पहिल्यापासून सांगायला सुरुवात केली.
[क्रमशः]
कथेचा १३वा भाग उलटून गेला तरी गुंता सुटण्याऐवजी वाढतच चाललाय. कुमारांचे निलकडे काय काम असू शकते? जतीन कुठे गायब झालाय? रीटाच्या खुनात त्याचा तर काही सहभाग नाही ना? कुशल दुबे आणि विनीत दरडा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कि खरच असा विनीत कोणी अस्तित्वात आहे? निल कुशल ला पैसे देऊन अजून एका ब्लॅकमेलचा बळी होणार का? केस सोडवण्यात माहीर असलेले कर्णिक केवळ कुमारांच्या सांगण्यावरून खुनाच्या केसला आत्महत्या म्हणून सोडून देणार कि ते त्याच्या मुळाशी जाणार? आणि सगळ्यात मुख्य.. निल ह्यातून सहीसलामत सुटणार का?
प्रश्न! प्रश्न!! आणि केवळ प्रश्न!!!!
वाचत रहा.. ब्लॅकमेलचा पुढचा भाग..
तळटीप – मंडळी वेळात वेळ काढून कथेचे दोन भाग एकदम टाकले आहेत.. पुढच्या भागासाठी जरा धीर धरा..
वेळ मिळाला कि लग्गेच टाकतो.
kay rav katha khupach chan lihili aahe ki mast lay zaaaaaak
मंडळ आभारी आहे
ब्लॉग वाचायला थोडा सुटसुटी केला. आधी थोडी गिचमिड वाटत होती आणि अक्षराचा आकार पण लहान होता. आता जरा छान वाटतेय वाचायला..
ho khupach sutsutit ani mast aahe thanks.
लई लई लई लई लई लैईईईईईईई भारी,
स्टोरी रुळावरून घसरून भलतीकडेच जाती आहे, तरी पण छान चालली आहे.
उत्तम. खूपच मज्जा येती आहे. जाऊ दे. जशी लिहायची तशी लिहा.
फारच उत्तम लिहिता तुम्ही
रुळावरून घसरली नाही मालक, रुळावरच आहे. हा सगळा गुंता सुटला कि कळेल तुम्हाला ट्रेक बदलला नव्हता..
Ya will surely wait for the next part. No hurry..
btw the new look of the blog is pretty cool…
Thanks Seeya, me too liked the look, its really neat
Vachtana ankhi interest vadhat challay……!! Waiting for next post……..
simply great… eagerly waiting for next part…
thanks a lot .next bhag lavakar dya.vachayachi ustukata lagali aahe.aani he bhag lavkar dilat tyabaddal thanks.@@@@@@@@@@@@@@@
zhakas ahe
kharach phar sundar lihita tumhi phudchya bhagachi aturtene vat pahat ahot.
Ith parayt tar mastach katha aahe …Pan….Parat intejar… Kiti vel ajun????
Excellent post……………..
Awaiting newer! but take your time for that
khup chan ……pudhchya bhagachi vat pahat aahye
very interesting twists and turns in the story….ani Blog cha navin look pan chan ahe…
Mitra yala katha mhanun nakos. Hi kadambari aahe.
Sadhya marathit kahi ashi pustake aahe jyanchi prushtsankhya tujhya kathe peksha kami aahet tari te tya pustakala kadambari mhantat.
Pustak publish karaiche swapn nahi baghat ka tu?
मला आठवतं, अनिकेत मध्ये केव्हा तरी म्हाणाला होता कि मरायच्या आधी एक तरी पुस्तक पब्लिश व्हाव अशी त्याच्या अनेक इच्छांपैकी एक इच्छा आहे..
अरे मित्रा, तू जे लिहितो, ते तर कुणीही प्रकाशक एका पायावर तयार होईल छापायला..
कथा नेहेमी प्रमांचे अतिशय मस्त वळणे घेत चालीलये.. पुढचा भाग येउदे पटकन..
बघतो ना मित्रा.. एक तरी पुस्तक काढायचं आहेच. बघु कसे जमते आहे ते..पण सध्या तरी दुसर्याच एका स्वप्नाच्या मागे आहे.. ते जर का पुर्ण झालं ना…!!
ty tumchya swapnavar purn zalyavar ektari blog aselch ashi asha karato amhi. Good day
तुझ्या स्वप्नासाठी अनेक शुभेच्छा..
फक्त ही कथा तेवढी पूर्ण कर स्वप्न पूर्ण करता-करता..
tumche swapn lavkar purn hovo hich amchya vachaka kadun sadichya.
अनिकेतराव तुम्ही आता मात्र कमालच केलीत.मी आशा करतो फक्त कथेचा शेवट रुळावरून जाणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्याल.