माझ्याबद्दल थोडेसे


खरं तर देवाने या विश्वाची निर्मीती केली आणि मानवालाही त्यानेच जन्माला घातलं. माझ्याबद्दल मी स्वतःच काही वाईट बोललो तर ईश्वरच्या निर्मीतीचाच मी अपमान केला असं होईल नाsss!! सो.. जास्ती काही नाही, थोडेसेच, माझ्याबद्दल.

वय वर्ष ३४, विवाहीत, दोन गोंडस मुलांचा बाप. संगणक अभियंता, सॉफ्टवेएर मधील किडे (Bugs) पकडण्याचे काम (Testing) करतो.

मनमिळावु, Happy-Go-Lucky, थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा. छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा आणी तितक्याच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा मी.

सायकलींग ची प्रचंड आवड निर्माण झालेला, मराठी लेखनाची आवड असणारा, फोटोग्राफीबद्दल प्रचंड पॅशनेट असणारा अस्सा मी.

ब्लॉगवरील कथांबद्दल वाचकवर्गाचा ठरलेला प्रश्न म्हणजे “हे सगळं सुचतं कसं?” खरं तर ह्याचं श्रेय असंख्य इंग्रजी चित्रपट, डिस्कव्हरी वरील “जेल्ड अ‍ॅ्ब्रोड” आणि सर्वात महत्वाचे “जेम्स हॅडले चेस” ह्यांच्या कॉलेजजिवनात वाचलेल्या गुन्हेगारी कथा. त्यांच्या कथांमुळेच मला अश्या गुन्हेगारी कथा लिहायला प्रेरणा मिळते. काही चित्रपट मनाला भावतात, पण वाटतं असं नं घडता, तसं घडलं असतं तर? मग तेथील एखादा धागा घेउन एक नविनच रसायन निर्माण होते. तुम्हा सर्वांना कथा, माझं लिखाण आवडते हे वाचुन आनंद होतो. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिया लिहीण्याचा हुरुप वाढवतात. प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देता येतेच असे नाही, परंतु त्या वाचतो मात्र नक्की. तेंव्हा जरुर प्रतिसाद देत रहा…..

“डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा” ह्या माझ्या ब्लॉगला ‘स्टार-माझा’ वाहीनीने बेस्ट मरा्ठी ब्लॉग म्हणुन सन्मानीत केले.

ह्या ब्लॉगच्या माध्यमातुनच काही चांगल्या ओळखी झाल्या आणि त्यातुनच एक कमर्शीयल नाटक लिहायची संधी मिळाली आहे. लवकरच हे नाटक रंगभुमीवर येत आहे.

131 thoughts on “माझ्याबद्दल थोडेसे

  1. नमस्कार!
    “आपल्यासारखाच दुसरा किमान एक तरी सापडला” याचा आनंद लपविता आला नाही…. त्यासाठीच ही कमेंट…. मस्त लिहिता…

    लिहित रहा!
    शुभेच्छा!

  2. Aap mahaan ho .. ye mai nahi bolunga …
    lekin aap energetic ho … enthusiastic ho …. aap born photographer nahi ho .. ( u know what they say about such ‘highly gifted’ individuals), but then I will give you credit for a few things -
    a. The way you have cultivated a taste for clicking good photographs
    b. Your sense of creativity .. which borders from the unbelievable to the awesome.
    c. Your fitness levels , again which you cultivated by kicking out junk food, cycling , and jogging.

    Keep it coming.

  3. अप्रतीम आहेस बाबा तू…
    माझ्या मराठीमाती या संकेतस्थळास नक्की भेट दे.
    तुझ्या विचारांचे मराठीमाती परिवारात नेहमी स्वागत आहे.

  4. >>> यु आर जस्ट ए ग्रेटफुल पर्सनॅलिटी, आय येट सीन!
    >>> हाउ यु ऍडजस्ट ऑल धिस!
    >>> मी पण इंजिनिअरिंग करतोय, आय. टी. मध्ये (द्वितिय वर्ष)
    >>> आणि मस्ट सी माय साइट्स बिलो:
    १)http://www.kalatnakalat.co.cc
    २)http://www.vishaltelangre.tk
    >>> आपलं मार्गदर्शन लाभेल अशी आशा करतो.
    >>> माझा मेल आय डी आहे: send@vishaltelangre.tk आणि vishaltelangre@engineer.com
    >>> आपला मो.नं. क्रुपया मला पाठवा…..(काही अडचण असल्यास विचारण्यासाठी..)
    >>> किप इट अप!
    >>> जय महाराष्ट्र…..!!!

  5. आपण खूपच छान लिहिता माझी मुलगी कायम आपल्या ब्लोग चे वाचन करीत असते. अ ह, फक्त वाचनच नाही वाचता वाचता पोट धरून हसत हि असते. लिखाण असेच चालू ठेवण्याबद्दल शुभेच्छा.

  6. मी नुकताच पोळ्या पासून ब्लोग विश्वात पदार्पण केलंय. पण आपले कौतुक वाटते आपण एवढ सर्व लिहितात कधी.मला तर रात्री उशिराच लिहावे लागते. नाही तर घरच्यांची ओरड असतेच.

    • इतके दिवस “असंभव” नावाची मालीका चालु होती तेंव्हा घरातले सगळे जण त्यात मग्न असायचे, हीच वेळ बहुतांश वेळा मी साधत होतो. आता जरा घोळ होतो आहे, कारण कार्यालयातुन आल्यावर लगेच संगणकावर बसणे त्यांच्या नजरेत यायला लागले आहे. पण नविन सुरु झालेली मालीका बरी वाटते आहे, पुन्हा एकदा सर्व जण त्यात गुंगुन जाओत हीच प्रार्थना.

  7. Mast watala tumcha blog! Kaal pasun kaam dham sodun sampurn wachun kadhala. Only one question i wanted to ask. How did u get backgrounds in ur son’s pics? Have u created them using some software? If yes, plz let me know. Ur photographs r as good as those taken by professionals.

    Keep writing! ALL THE BEST!

  8. dhanyavad majhya lekh avadlyabaddal

    tech lihayla ithe aale ani pahilich post vachli ti “alvida” chi. :(

    mala ajibat asa vatat nahi ki lekh/ajun kahi post karnyat antar padla tar purna pane post karnach band karava. tyapeksha jasa suchel, jevha suchel, shakya hoil tevha lihit java…tumcha blog avadala…arthat blog chalu thevaycha ki nahi ha jyacha tyacha prashna pan blog chalu theva kimva naka thevu lihitya hatavar anyay karu naka bas yevhadhach sangen.

    navin varhsachya khup sarya shubheccha

  9. गेले काही दिवस वेग वेगळे मराठी ब्लॉग्स वाचत ( Follow करीत ) होतो. त्यातच आपला एक ..
    आपली सहज सोपी लेखन शैली खूपच आवडली.
    धन्यवाद आणि शुभेच्छा!!

  10. namskar, mi prathamach pratikriya pathavat ahe.
    tumchya mulach photo pahila, khup god aahe ojas. maza mulga sudha tyachyaevadhach asel(4 1/2 yr old-kalpak). kalpak nav ahe tyach, ojasche photo pahatana khupach aathavan ali kalpakchi, tyala sodun nighayala jivavar yeta.
    don tin divasapurvich tumacha likhan pahile, interesting vatle, bahutek sarvach katha vachun zalya. khupach chan lihita.

    • धन्यवाद आणि ब्लॉगवर आपले स्वागत.
      खरं आहे, मुलांना सोडुन कार्यालयात जायला मला सुध्दा फार जिवावर येते. वाटतं सोडुन द्यावं सगळं. पण खरंच ते इतकं सोप्प आहे का? त्यामुळे शक्य तितका जास्त वेळ मुलांबरोबर कसा घालवता येईल ह्यावरच माझा सदैव कटाक्ष असतो.

      असो, ब्लॉगला पुन्हा पुन्हा जरुर भेट् देत रहा.

  11. नमस्कार!

    मी तुमचा ब्लोग जवळपास १-२ महिन्यांपासून वाचतो आहे. प्रत्येक कथा एकदम मस्त आहे. प्रत्येक कथेची पार्श्वभूमी अतिशय सुंदररित्या मांडलेली असते. मला वाटते, ती अगोदरच ठरवलेली असते :) कथेची भाषा सुद्धा फारच छान असते, सोपी, सुटसुटीत.. अगदी आपल्या डे टू डे लँग्वेज सारखी :)

    सगळ्या कथा मस्त वर्गीकरण करून ठेवलेल्या असतात. फारच छान!

    फोटोग्राफी सुद्धा पहिली. एक नंबर फोटोज आहेत! तुमच्या मुलाचे फोटो सुद्धा अप्रतिम आहेत..

    असंच लिहित राहा, फोटो पोस्ट करत राहा..

    शुभेच्छा!

  12. Hi, Aniket Sir
    me 1 mahinyapasun tumacha blog vachtey kharch khup chhan lihita tumhi. tumhi kadalele photo hi khup chhan aahet actually maze pappahi photo kadatat te nature kiva function photography kartat aani my big bro is fashion photogarpher his name is Ashu Mungekar. He is in N.I.P. at Dadar.
    tumhi lihilele khup vachal me pan kahi comment pathaven asa vatala navata rather tharavala navata pan tumche photo baghitale aani gharatale hajaro photo dolyansamor aale. tyamulech he itaka jast lihitey. tumhi chhanch lihita pan maze ase vichar aahet ki ek line lihine hi pan ek art aahe aani you r the master. And 1 thing tumchya mulache photo khup chhan aahet, he is so cute.
    so, all the best and always give us your writing treat.
    GOD ALWAYS BLESS YOU AND YOUR FAMILY.

    BYE…

  13. Aniket, Aaj tujha blog baghun mi thakka jhalo… ani kshanbhar dang hi jhalo…. ekhadya bhungya sarkha eka phulawar ramaloooo…..karan mala jasa blog hawa hota agdi tashach … concept tujhya blog madhye ahe…. ….. tula asa achanak bheten asa kadhi swapna hi watala nvate … kadhi vichar kela nvhata….asa bhetu yacha…defenitely tula asaa unique …..jaga wegala blog karayala barech kashta & wel lagala asel….. majhya kadhun anek shubheccha. Prajaka kulkarni – Quexst …..ni mala tujhya blog baddal sangitale.. tujhya blog war majhaa “bhunga” mhanun pahila pravas aaj suru jhala…. Triwaar shubhechaa…. bhetu lawkarach…. ekhadya phulawar kinwa………

  14. yes,i got a new friend today.thanks to god .mala tuze lekhane khup awadele manapasun ani ur married tari vel kadun lihitose yache khereche khup ascherye watete.keep it up.i am also married and have two son.but nehemi changele katha wachayela awedetate.so can we be friend.

  15. अनिकेत मित्रा,
    चालेल ना मित्रा म्हटलेले ? समवयीन आहेस म्हणून म्हटलं
    छान छान कल्पना सुचतात तुला. कस रे जमत तुला हे ?
    असो, मस्त आहेत सर्व कथा
    भविष्यातील लिखाणासाठी शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  16. Dear BHOONGA,
    Greetings from East Indian Coast,
    Saglyaach BHOONGYAANAA ekatra krnyaa aaiwajee,purn jaiv vividhataa jamaa karun maaybolee chyaa sarvach kshtraat lakh dene aanee laksy saadhne jaruri aahe.
    Aapan fakt bhaashewarach jor deto,baakee kade koneech dhyaan det naahee..
    Suvarna jayantee saajree karat aslelyaa Maharashtraas 360 ansh,saadar karne jaruri aahe pan….

  17. Hello.
    मी तुमच्यासारखा भुंगा तर नाही, पण कधी कधी अशा ब्लॉग्जवर भटकणारी मधमाशी आहे.
    आणि अगदी प्रामाणिकपणे सांगते, आता पर्यंतचा सर्वांत चांगला ब्लॉग वाटला मला हा…
    खूपच छान… :)

  18. नमस्कार भुंगा.. मराठीत क्रिकेटवर लिखाण असलेले ब्लॉग्स शोधत असतानाच आपला ब्लॉग दिसला.. आपण क्रिकेटवर वरचेवर लिहिता का? हे विचारायचे कारण म्हणजे लवकरच झी नेटवर्कतर्फे भारतातील पहिलीवहिली क्रिकेटला वाहिलेली संपूर्णपणे मराठीतील वेबसाइट लॉन्च होणार आहे. त्यात आम्ही द्वारकानाथ संझगिरी, चंन्द्रशेखर संत यांसारख्या तज्ज्ञांनबरोबरच मराठी ब्लॉगर्सचेही लेख प्रसिद्ध करणार आहोत. तर आपणास या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल का ? सध्या तुम्ही काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेली आमची cricketcountry.com ही इंग्रजीतील साइट पाहू शकता. याच धर्तीवर आपली मराठीतील साइट येत आहे. तरी याबद्दल आपला प्रतिसाद कळवावा.. धन्यवाद.. कृपया ही कमेन्ट डीलीट करून टाकावी..

    अमेय गिरोल्ला
    ९८७००९४६२२
    sanmitra4@gmail.com

  19. tumchi Bhaykatha AVANI he atishay sundar kalpannik ka asena pan khup bhayanak katha ahe,prek shabddat angavar bhayane kata ubharto,mala tumchya blog madhil sarva katha atishay avadalya ahet tyatil pan AVANI he katha tar farch avadali ahe.mazi ashi iccha ahe ki tumhi ashich ek ankhi katha lihavi.

    Dhanyavad

    Nilam

  20. नमस्कार,
    मला तुमचा ब्लॉग आवडला. अजून कथा पूर्णपणे वाचल्या नाहीत. पण आता मुद्दाम वेळ काढून वाचणार आहे. मी या मागच्या फेब्रुवारीपासून मराठी ब्लॉग वाचायला लागलो आहे. त्या अगोदर ब्लॉग म्हणजे काय ते पण नीट माहित नव्हतं. इंटरनेटवर उगाच इकडेतिकडे भटकायचो, पण आता मराठीतले खूप ब्लॉग पाहिले आणि काय वाचू , किती वाचू आणि कधी वाचू तेच कळेनासं झालं आहे. वरील सर्व प्रतिक्रिया वाचल्या त्यावरून आपण 2 वर्षांपूर्वी हा ब्लॉग लिहायचा बंद करायचा विचार केला होता असं कळलं, पण अजूनही तो सुरु आहे म्हणून आनंद झाला. नाहीतर एका चांगल्या ब्लॉगला मी मुकलो असतो.
    सहज टाइमपास म्हणून मी पण एक ब्लॉग सुरु केला आहे. अजून नीट काही कळत नाही, पण जमेल हळूहळू.
    आपल्यला खूप शुभेच्छा.

    -विवेक वाटवे

    संकल्पसूची.ब्लॉगस्पॉट.इन

  21. hello aniket…
    mi pan eka IT company madhe kaam karto…! asach google war marthi katha ase search kelyawar tumachya blogparynt pohchlo. Aavani hi bhaykatha tar mala khup aavadli. wachtana mi office madhe aahe hi wisarun ch gele hoto. tya katheshi mi purnpane ekarup jhalo hoto. Ani janu kahi sarv majhya dolyasamor ghdtey ase watat hote…! kharach tumachya likhanat jadu aahe..! Keep writting….!!! Best Luck.!

  22. chan vatal tumcha blog vachun mi sarva goshti vachlya chan aahet asech lihat raha
    mala khup aavadtat rahasya goshti mala khup aavad aahe vachaychi .
    mi pan ek blog banvala aahe pan tyat mi lihalele ase kahi nahi je mala aavadale te ya
    blog madhe aahe.

    All the best……..
    &
    Thanks

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s