आजा गुन्हा कर ले (भाग-३)

भाग २ पासुन पुढे..

“दिन्या अरे हे काय चालवले आहेस तु?” बेडवर निपचीत पडलेल्या त्या वेट्रेसच्या प्रेताकडे बोट दाखवत मी विचारलं.. “म्हणजे आता इथुनही कल्टी मारावी लागणार तर..छ्छा!!”

“काला है तो काला होगा
मौत का ही मसाला होगाss
चुना कथ्थार जिंदगी तो
सुपारी जैसा छला होगा

बाप ने जना नही तो
पापीयोंने पाला होगा
भला बुरा, बुरा भला है
खोटे पर सब खरा भला है..”

दिन्या आपल्याच तंद्रीत मद-मस्त होता. शेवटी मीच त्या तरुणीचे प्रेत ओढत-ओढत बाथरुम मध्ये आणुन टाकले. एकुणच सगळ्या प्रकारांनी थकवा आला होता म्हणुन बेड वर स्वतःला झोकुन दिले, काही क्षणातच झोपेच्या आधीन होऊन गेलो.

डोळे उघडले तेंव्हा उन्ह खुप खाली उतरली होती. दिन्या खोलीत नव्हता, कुठेतरी बाहेर गेला होता. ‘आज रात्रीच इथुन निघायचे’, मी मनोमन ठरवुन टाकले. दिन्या आला तर बेस्टच नाहीतर एकटे..

तोंड धुवायला बाथरुम मध्ये गेलो.. ‘ते’ प्रेत अजुनही आहे त्याच स्थितीत पडुन होते. मला फार काळ बघवले नाही. पटकन फ्रेश होऊन बाहेर आलो. कपाटातुन बऱ्यापैकी दिसणारे कपडे काढले. आरश्यात स्वतःला एकदा न्हाहाळले आणि रुम लॉक करुन बाहेर पडलो.

हॉटेलच्या बेसमेंट मध्ये असलेला कॅसीनो पर्यटकांच्या गर्दीने तुडूंब भरला होता. दिन्याचा कुठेच ठावठिकाणा दिसत नव्हता.

“ऍन्टीक्वीटी.. ऑन द रॉक्स..” तेथील बारटेंडरला ऑर्डर देऊन तेथीलच एका खुर्चीवर स्थानापन्न झालो. दोन जळजळीत घोट घश्याला घासत पोटात गेले आणि जरा बरं वाटलं. डोकं एकदम हलके झाले. उरलेला घोटही एकादमात संपवला आणि अजुन एक ऑर्डर दिली. इतक्यात खिश्यात पैसे आहेत की नाही याची जाणीव झाली. खिश्यातुन पाकीट काढुन बघतच होतो इतक्यात.. “हाय हॅंडसम, कॅन आय बाय यु वन लार्ज व्हिस्की?” मागुन एक आवाज आला.

माझ्या मागेच एक २७-२८शीतील तरूणी माझ्याकडे अर्थपुर्ण कटाक्ष टाकत उभी होती. कुरळे केस, कॉफी कलरचे डोळे, लार्ज ओपन नेक टी-शर्ट आणि लो-वेस्ट जीन्स घातलेली एक तरूणी मला व्हिस्की ऑफर करत होती.

“वेल शुअर.. व्हाय नॉट!!.. मी पैसे रुममध्येच विसरुन आलो..”

शेजारचीच खुर्ची ओढुन ती तरूणी मला घसटुन बसली.

“दिन्या नसल्याचा फायदा.. तो असला की सगळ्या तरूणी त्याच्याभोवतीच घोटाळत असतात. मी सुध्दा इतका काही वाईट नाही.. जस्ट दॅट दिन्याचा इन्फ्ल्युएंन्स जास्त असतो..” स्वतःशीच विचार करत होतो

व्हिस्कीचे घोट एकावर एक पोटात जात होते. त्या तरूणीची घसट जास्तच वाढली होती. हळु हळु व्हिस्कीपेक्षा अधीक मादक आणि अधीक ज्वलंत मला ती तरूणी भासु लागली. डोळे जड होऊ लागले तसे मी पेग घेणे थांबवले.

“मग.. पैसे घ्यायला मी तुमच्याबरोबर रुम मध्ये येऊ..”.. माझ्या गालाला हलकाच स्पर्श करत ती तरूणी म्हणाली..

कदाचीत माझ्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले होते. समोर एखादा आरसा असता तर कदाचीत मी दिन्यासारखाच दिसलो असतो.. भेसुर, हिंस्त्र.

त्या तरूणीला घेउन मी रुमवर आलो. रुममध्ये अंधार होता. म्हणजे दिन्या अजुनही परत आला नव्हता. रुममधला दिवा लावला.. “बरं झालं ते प्रेत मगाश्शीच बाथरुममध्ये न्हेऊन टाकले ते…” मनामध्ये एक विचार येऊन गेला.

खोलीचे दार लावुन टाकले आणि त्या तरूणीला जवळ ओढले. तिचे गरम श्वास माझ्या मानेवर, कानावर जळजळीत आग ओतत होते. तिच्या छातीची धडधड एखाद्या पटरीवरुन धावणाऱ्या आगगाडिच्या आवाजाइतकी स्पष्टपणे मला ऐकु येत होती. मोठ्या मुश्कीलीने तिला माझ्या बाहुपाशातुन बाजुला केले आणि नकळत कपाटाकडे गेलो. माझे हात नकळतपणे काहीतरी शोधत होते..काय???.. कदाचीत दिन्याचा लाडका ७” सुरा.

“इथेच तर ठेवला होता!! कुठे गेला..”

इतक्यात पाठीला काहीतरी थंडगार वस्तुचा स्पर्श झाला.

“हॅन्ड्स-अप मिस्टर, यु आर अंडर अरेस्ट..” मागुन तिचा आवाज आला..
“कोण?? कोण आहेस तु??”
“सि.आय.डी. इन्स्पेक्टर निशा मेहता.. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय..”

मी सावकाश मागे वळलो. खोलीमध्ये अजुन दोन बंदुकधारी माझ्यावर नेम धरुन उभे होते.
********************************************

“इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर विश्वास ठेवा.. अहो यातील कुठलाही खुन मी केलेला नाही”
“अच्छा, मग तुमच्या रुममध्ये सापडलेले ते तरूणीचे प्रेत?..”
“ते.. ते.. दिन्याने मारले तिला..”
“दिन्या? कोण दिन्या? आहे कुठे तो?”
“मला..मला माहीत नाही कुठे आहे तो.. दुपारपासुन नाहीसा आहे तो..हायवे वरील खुन सुध्दा त्यानेच केले आहेत..”
“याला काही पुरावा?..”
“पुरावा?.. होता.. पुरावा होता.. संजु.. तो सुध्दा माझ्याबरोबर होता..”
“संजु? मग आता कुठे आहे तो??”
“त्याला… त्याला सुध्दा मारला दिन्यानेच.. त्या मॉटेलच्या मागे..”
“मग आम्हाला त्याची बॉडी सापडायला हवी होती! नाही का?? आम्हाला खोलीमध्ये सुध्दा फक्त एकाच माणसाचे ठसे सापडले.. आणि काही तासांतच ते ठसे तुमचे आहेत हे स्पष्ट होईल..”
“आहे.. अजुन एक पुरावा आहे.. पेट्रोल पंपावरचा तो पोरगा.. ज्याचे पैसे न देता दिन्याने गाडी बाहेर काढली होती. तो सांगु शकेल की माझ्याबरोबर ३ लोकं होती.”
“झालं.. ते सुध्दा झालं.. त्या पोऱ्यानेच आम्हाला सांगीतले की त्या गाडीत फक्त एकच माणुस होता.. मग??”
“एकच माणुस..?? कसं शक्य आहे ते.. एकवेळ संजु त्याला दिसला नाही म्हणुन दोन माणसं म्हणला असता तरी ठिक आहे.. पण एकच माणुस म्हणतो म्हणजे… इन्स्पेक्टर साहेब.. ही दिन्याचीच काहीतरी चाल आहे.. तो मला या प्रक्ररणांमध्ये अडकवुन स्वतःला सोडवु पहातोय.”
“हे बघा.. त्या हॉटेलच्या सि.सि.टी.व्ही. क्लिप्स मध्ये सुध्दा आम्हाला फक्त एकच माणुस रुम मधुन आतबाहेर करताना दिसला होता आणि तो म्हणजे फक्त तुम्ही..

ही काय गडबड आहे मला काहीच कळत नव्हते.. दिन्या असा अचानक कस्सा नाहीसा झाला होता. हे सगळे खुनाचे पुरावे माझ्या विरोधात कसे होते..?? प्रश्न.. फक्त प्रश्न..

“बर मिस्टर.. तुम्ही मला दिन्याचे आणि संजुचे वर्णन सांगु शकाल काय? आपण गोवा पोलीसांच्या मदतीने त्या दोघांचा काही माग लागतो का ते बघु..”
“हो.. हो.. सांगतो ना.. संजु.. ५.८”, गोरा रंग, मजबुत बांधा वय साधारण २८-३० च्या आसपास, चेहऱ्यावर नेहमी घाबरलेले भाव..”
“आणी दिन्या??”
“दिन्या.. ५.८”, गोरा रंग, मजबुत बांधा वय साधारण २८-३० च्या आसपास, चेहऱ्यावर नेहमी बेफीकीरीचे भाव..”

इस्न्पेक्टरच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरले.. त्याने माझी कॉलर धरुन ओढत न्हेले आणि एका आरश्यासमोर उभे केले..

“बघा मिस्टर.. काय दिसते समोर??”
मी समोर बघीतले.. “हा काय चमत्कार मला आरश्यात मी न दिसता चक्क संजु दिसत होता.. भयानाक घाबरलेला संजु!!”
इन्स्पेक्टरने माझ्या कानशीलात एक जोरदार भडकावली.. “साल्या.. तुला तर फाशीला लटकवणार मी..”

प्रहार एवढा जोरदार होता की माझी माने मागे फेकली गेली.. जेंव्हा मान सरळ करुन समोर आरश्यात पाहीले तेंव्हा संजुची जागा आता दिन्याने घेतली होती.. आरश्यात आता मला दिन्या दिसत होता…

हा काय प्रकार आहे मला काहीच कळत नव्हते. इन्स्पेक्टरने पोटात एक जोरदार लाथ घातली आणि मला लॉक-अप मध्ये कोंबले.

माझे डोके भुणभुणायला लागले होते. हा सगळा प्रकार माझ्या समजण्यापलीकडचा होता. समोरच टेबलावर तो हरामी इन्स्पेक्टर, सि.आय.डी. निशा आणि पांढरा कोट घातलेला, डॉक्टरसारखा दिसणारा एक इसम दिसत होता. मी त्यांचे बोलणे ऐकु लागलो.

तो हरामी इस्न्पेक्टर हसत म्हणत होता.. “विश्वास बसत नाही अश्या गोष्टींवर. इन्स्पेक्टर निशाला इंटरनेटवर माहीती कळाली आणि म्हणुन आम्ही तुम्हाला संपर्क केला. डॉक्टर हा काय प्रकार आहे?”

“एम.पि.डी.. अर्थात मल्टीपल पर्सनालीटी सिंन्ड्रोम असे ह्या मानसिक विकाराचे नाव आहे. ह्यामध्ये एकच मनुष्य दोन किंवा अधीक व्यक्तींचे आयुष्य जगत असतो आणि मुख्य म्हणजे तो त्या व्यक्तींमध्ये इतका गुंफला जातो की त्याला सत्यातच आपल्या भोवती त्या व्यक्ती आहेत असे वाटु लागते. मग ती व्यक्ती समवयीन असु शकते, एखादा लहान पोरगा किंवा इव्हन भिन्न लिंगी व्यक्ती सुध्दा.. ह्याच्या बाबतीत सुध्दा तस्सेच झाले. त्याच्या लेखी संजु आणि दिन्या ही भिन्न व्यक्तीमत्वाची लोक त्याच्या अवतीभोवती सत्यात होती. पण प्रत्यक्षात मात्र ह्या सर्व घटनांमध्ये एकच व्यक्ती होती. एखाद्या भितीदायक घटनेत त्याचा संजु व्हायचा तर त्याचे गुन्हेगार मन जागृत झाल्यावर दिन्या.”

“ऐकावे ते नवलच..तिन तिन माणसांच व्यक्तीमत्व एकच माणुस जगतो…कमाल.. अर्थात न्यायालयात हे सिध्द व्हायला वेळ लागेल पण अशक्य नाही. केवळ पेट्रोलपंपावरील ती क्षुल्लक घटनेचा मागोवा घेताना हे सत्य पुढे येत राहीले. त्या पोऱ्याने सांगीतलेले वर्णन.. एकच माणुस इकडे तिकडे बघत कधी दिन्या तर कधी संजुशी काही तरी बोलत होता आणि आजुबाजुला मात्र कोणीच नव्हते. त्याचवेळेस ड्राईव्ह-इन मधील घटनेची माहीती पोलीसांना मिळाली, क्लिप्स चा पुरावा मिळाला. नजदीक ठिकाण गोवा म्हणल्यावर तो गुन्हेगार तिथेच मिळणार असल्याची शक्यता पोलीसांनी उचलुन धरली आणि.. पुढे काय घडले हे वेगळे सांगायला नकोच..”

त्यांचे बोलणे खुंटले ते गाण्याच्या आवाजाने. सगळे जण आश्चर्याने माझ्याकडे बघत होते तर मी आश्चर्याने माझ्याच सेल मध्ये शेजारी अचानकपणे आलेल्या दिन्याकडे..

दिन्या गाणं गुणगुणत होता..

“वोह जो कही नही है
उसपे भी तो यकीन नही है
रहता है जो फलक फलक पै
उसका घर भी जमीन नही है
अकल का खयाल अगर वो
शकल से भी हसिंन नही है
पहले हर जगह पै था वोह..
सुना है अब वोह कहीं नही है..

.. आजा गुफा ओं मै आss.. आजा गुनाह कर ले, आजा गुनाहsss करले…!!”

आजा गुन्हा कर ले (भाग-२)

भाग १ पासुन पुढे..

“दिन्या अरे हे काय केलेस तु?”.. समोरचे ते भयानक दृश्य बघुन माझे डोळे अजुनही विस्फारलेले होते, तर संजुची नेहमीप्रमाणे दातखीळी बसली होती.

“जास्ती बोलु नका, चला आवरा पटापट, आपल्याला निघायला हवे..” दिन्या त्याचे सामान पटापट बॅगेत भरत म्हणाला.

आम्ही एकवार सगळी रुम परत एकदा तपासली. कुठे कुणाचे काही राहीले तर नाहीना याची खातरजमा केली. दिन्याने हळुच दार उघडले आणि तो व्हरांड्यात आला. व्हरांड्यात पिवळट्ट प्रकाशात एक मंद दिवा लागलेला होता. अर्थात तो दिवा असुनही नसल्यासारखाच होता. त्याचे असुन नसणे आमच्या पथ्यावरच पडणार होते. आम्ही हळुच दिन्याच्या मागोमाग बाहेर पडलो. रात्रीची वेळ होती. कड्यावर वसलेल्या त्या मॉटेलचे पत्रे मागुन दरी-डोंगरातुन येणाऱ्या वाऱ्याने थाड्थाड उडत होते.

“मी पोलीसांना फोन करतो..” संजु पहील्यांदाच काहीतरी बोलला..
“ए फट्टु.. डोके बिके फिरेल का तुझे.. चल.. बस गाडीत..” दिन्या दरडावुन बोलला.
“नाही, मी नाही येणार तुझ्याबरोबर. तु खुनी आहेस..तुझ्याबरोबर पकडले गेलो तर नाहक पोलीस आम्हाला सुध्दा आत टाकतील.. त्यापेक्षा आत्ताच पोलीसांना फोन करुन मी खरं खरं सांगुन टाकतो..” संजु म्हणाला.
“बरं संजु. जशी तुझी इच्छा.. तो बघ त्या मॉटेलच्या मागे एक पिसीओ आहे, जा फोन करुन ये..” दिन्या म्हणाला..

संजु झपझप चालत मॉटेलच्या मागे फोनबुथ शोधायला निघुन गेला. तो दिसेनासा होताच दिन्यासुध्दा त्याच्या मागोमाग धावला. जाताना दिन्याच्या चेहऱ्यावर ते भयानक हास्य मी पाहीले होते.

थोड्यावेळाने दिन्या परत आला.

“चल..” माझ्याकडे न बघताच दिन्या गाडीत बसला..
“संजु?”, उत्तर माहीती असुनही मी एक निरर्थक प्रश्न विचारला..
“तो आपल्या बरोबर नाही येणार.. त्याला मी दुसऱ्या गाडित बसवुन दिले आहे..” असं म्हणुन दिन्याने गाडी चालु केली.

काही क्षणातच आम्ही NH4 वर गोव्याच्या दिशेने सुसाट निघालो होतो.

“संजु आक्स्ड फॉर इट..” मी स्वतःशीच विचार करत होतो.. “कश्याला उगाच दिन्याच्या विरोधात जायचे? मुर्ख कुठला! झाली दिन्याच्या हातुन एक चुक.. काय त्यात एवढे? एक फडतुस व्होअरला तर टपकवले ना! एक दुःस्वप्न म्हणुन विसरुन जायचे..!”

“काय रे, कसला विचार करतो आहेस?” दिन्याच्या आवाजाने मी भानावर आलो.. दिन्याच्या चेहऱ्यावरचे टेंन्शन कुठल्या कुठे निघुन गेले होते.. तो नहमीप्रमाणे मस्त मुड मध्ये होता.. जसे काही, काही घडलेच नाही

“काही नाही रे.. मला आपलं असं वाट्त होते.. तो पिचपिच्या डोळ्याच्या म्हाताऱ्याने तुझं वर्णन पोलीसांना दिले तर? त्याच्याशिवाय आपल्याला कोणीच पाहीले नाहीये.. तो एक पुरावा राहीला बघ..”..

दिन्याने खाड्कन हॅन्ड्ब्रेक ओढुन गाडी ड्रिफ्ट केली..”यु आर राईट.. उगाच कश्याला पुरावे सोडा.. चल जाऊ परत..”, दिन्याने गाडी परत माघारी वळवली.

एक क्षण मी उगाचच दिन्याला सांगीतले असं वाटु लागलं.. तो बिच्चारा म्हातारा.. त्याचे काय होणार हे सांगायची आवश्यकताच नव्हती. जसं जसं मॉटेल जवळ यायला लागले तसं तसे माझे छातीचे ठोके वाढु लागले. लांबुनचे काळ्या-आकाश्याच्या पार्श्वभुमीवर ‘ड्राईव्ह-इन मॉटेलचे’ दिवे दिसु लागले. दिन्याने सावकाश गाडी कडेला उभी केली. मला गाडीत बसायला सांगुन दिन्या एकटाच आतमध्ये गेला. मला फार काळ वाट बघायला लागली नाही. आपले ‘काम’ उरकुन दिन्या काही वेळातच बाहेर आला. त्याने गाडी परत चालु केली आणि आम्ही गोव्याच्या दिशेने प्रयाण केले.

*********************************

“वॉस्को..वॉस्को..वॉस्को..वॉस्को..”
“पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..पणजीम..”

बसचालक, खाजगी वाहतुकदार, टॅक्सीवाल्याच्या आवाजाने गोव्याचा स्टेशनपरीसर गजबजला होता. काळरात्र ओसरली होती आणि सुर्याची सोनेरी किरणे गोव्याच्या निळ्याश्यार समुद्राला चमकवुन टाकत होती. कालच्या रात्रीचे आमचे ते विद्रुप मुखवटे अंधारात विरुन गेले होते आणि आम्ही गोव्यात आलेल्या असंख्य पर्यटकांपैकीच एक होऊन गेलो होतो.

दिन्याने यावेळेस एक बऱ्यापैकी हॉटेलपाशी गाडी थांबवली..
“दिन्या.. अरे लय महाग वाटतेय हॉटेल.. परवडायचे नाय..” दिन्याला म्हणालो..
दिन्या परत एकदा तस्साच भयानक हसला आणि त्याने जाकीटाच्या खिश्यातुन पैश्याची पुडकी काढुन माझ्यासमोर फेकली..
“दिन्या.. इतके पैसे?? कुठुन आणले..” मी चाचरतच विचारले..
“काल त्या म्हाताऱ्याला टपकवला ना.. त्याच्या खोलीत कॅश-पेटीची किल्ली होती.. म्हणलं इझी-कॅश… कश्याला सोडा..उचलली..” दिन्या बेफीकीरीने म्हणाला.. “शिवाय ते बघ वर काय लिहीले आहे..” दिन्याने कॅसिनोच्या ग्लो-साईनकडे बोट दाखवले..

दिन्या खऱंच स्मार्ट आहे हं.. कसं काय सुचतं त्याला हे सगळं.. म्हणुनच तो भयानक असुनही माझं आणि त्याचं जमतं.

आमची रुम मस्त होती.. शिवाय ए/सी. कॉम्लेमेंट्री म्हणुन वाईनची बॉटल सुध्दा होती. तिथल्याच एका खुर्चीत मी स्वतःला लोटुन दिले.. दिन्याने तोपर्यंत टि.व्हि. लावला. अनपेक्षितपणे “ड्राईव्ह-इन” ची बातमी न्युज चॅनल्स वर दाखवली जात होती. इतक्या लवकर ही गोष्ट मिडीया पर्यंत पोहोचेल असं वाटलं नव्हतं

ब्लर व्हिजन करुन न्युज वर त्या नग्नावस्थेतील पोरीचे आणि रुममध्ये मान मोडुन पडलेल्ल्या म्हाताऱ्या मॅनेजरच प्रेत दाखवत होते.

“कुठल्यातरी एखाद्या विकृत, मनोरुग्ण माणसाचे हे काम आहे..” पोलीस न्युज-रिपोर्टरला माहीती देत होते.. “आम्हाला खोलीत आणि मॅनेजरच्या डेस्क पाशी एका माणसाचे ठसे सापडले आहेत. इतकेच नव्हे तर ह्या मॉटेलचे मॅनेजर मोठ्ठे आंबट-शौकीन होते. आपली इच्छा भागवण्यासाठी त्यांनी मॉटलमध्ये कित्तेक ठिकाणी बेमालुमपणे क्लोज-सर्कीट कॅमेरे बसवले होते. मॉटेलवर एका-रात्रीपुरत्या येणाऱ्या जोडप्यांची लाईव्ह क्लिपींग्ज ते मोठ्ठ्या चवीने बघत असतं. अर्थात त्यामुळे आम्हाला क्ल्यु मात्र मिळाला आहे. ह्या रुम मध्ये येणाऱ्या त्या खुन्याचे क्लिप्स आम्हाला मिळाले आहेत. साधारणपणे २५-२७ वयोवर्षाच्या, ५ft.9″ च्या एका गोऱ्या तरुणाचा आम्हाला शोध आहे. “

“एकाच माणसाचे??” मला आश्रर्य वाटले.. “पण आम्ही तर तिघं होतो.. निदान खोलीत तरी आम्हा तिघांचे ठसे सापडायला हवे होते. म्हाताऱ्याला आम्ही दिन्याच्या मागे लपलो असल्याने दिसलो नसु पण कॅमेरात पण कुणीच कसे दिसले नाही.. आश्चर्य आहे. तस्सेच संजुच्या प्रेताचं काय? ते कसं कुणाला सापडले नाही? त्याबद्दल कोणीच कसं काही बोलत नाही.. दिन्याने काय केलं असेल नक्की त्याचं?”

“खुन्याबद्दल काही सुगावे आम्हाला हाती लागले आहेत.. पण त्याबद्दल अधीक आत्ताच सांगणं योग्य ठरणार नाही..” पोलीस बोलत होता..

“अबे छोड बे.. साला.. नाही सुगावा मिळाला म्हणुन मिडीया फाडुन खाईल या मामुला म्हणुन तो आपलं फेकतोय..आपल्यासारखे दिसणारे हजार सापडतील ह्या करोडो लोकांमध्ये आपल्याला ते शोधु पण शकणार नाय..” दिन्याने नेहमीचे बेफीकीरीचे विधान केले आणि त्याने चॅनेल बदलला.

काही वेळातच दारावर ‘टकटक’ झाली. दिन्या चित्याच्या चपळाईने उठला. तो दारापाशी गेला आणि त्याने ‘कि-होल’ मधुन बाहेर कोण आहे ते पाहीले. तो मागे वळला तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच भयानक हास्य होते. हळु आवाजात त्याने मला बाथरुमकडे जायला खुण केली.

बाहेरुन..”रुम सर्व्हिस..” एक मधाळ आवाज ऐकु आला.

मी धावत दारापाशी गेलो आणि की-होल मधुन डोकावुन बाहेर पाहीले.

गडद निळ्या रंगाचा बॉडी-फिट मीडी घातलेली, एका फिक्क्ट हिरव्या रंगाच्या रिबिनेचा आपल्या पाठीपर्यंत घनदाट मोकळे सोडलेल्या केसांचा पोनी बांधलेली एक तरुणी उभी होती.

दिन्याच्या मनामध्ये काय चालले आहे हे जाणवुन माझ्या अंगावर काटा आला.

“नको दिन्या.. आत्ता नको.. इथे भर वस्तीमध्ये..कालची घटना ताजी असतानाच अजुन एक..प्लिज नको..” मी काकुळतीला येऊन म्हणालो..

“रुम सर्व्हिस…” बाहेरुन परत तोच आवाज ऐकु आला..

“च्यायला.. ही पोरगी जात का नाहीये.. मरायचे आहे का हीला..” मी मनोमन विचार केला.
दिन्याने डोळे मोठ्ठे केले आणि मला बाथरुममध्ये जायची खुण केली.

केवळ नाईलाजास्तव, जड पावलांनी मी बाथरुममध्ये गेलो आणि दार आतमधुन लावुन घेतले.

बाहेरचे दार दिन्याने उघडले होते..

[क्रमशः]

भाग क्रमांक ३ पुढे वाचा..

आजा गुन्हा कर ले (भाग-१)

“दिन्या हळु चालव रे गाडी, काय घाई आहे एवढी?”, शेवटी मी न रहावुन दिन्याला म्हणालोच. भारी डँबीस आहे दिन्या, एक नंबरचं अवलादी कार्ट. कधी, कुठे तो कसा वागेल ते फक्त दिन्याच सांगु शकतो. मला तर कधी कधी जाम भिती वाटते त्याची. त्या उलट तो गाडीत मागे बसलेला संजु. महा-भित्रट, आम्ही तर त्याला फट्टुच म्हणतो. प्रत्येक गोष्टीची त्याला भितीच असते. मी मात्र अगदी बॅलन्स्ड आहे. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करुन निर्णय घेणारा. आम्ही तिघंही अगदी वेगळा विचार करणारे तरीही एकमेकांचे घट्ट मित्र.

लागुन आलेल्या सुट्टीचे निमीत्त साधुन आम्ही गोव्याला निघालो होतो माझ्या गाडीतुन. पण दिन्या इतकी भयानक गाडी चालवत होता ना!! “आजा गुन्हा कर ले..” दिन्याचं फार आवडतं गाणं. आमच्या सारखे मित्र भेटले म्हणुन बरं, नाही तर दिन्या नक्कीच एक अट्टल गुन्हेगार झाला असता.

दिन्याने झप्पदिशी वळवुन गाडी पेट्रोल पंपावर घेतली.

“टाकी फुल्ल करो..” दिन्याने ऑर्डर दिली. बाकी काही म्हणा, दिन्या स्मार्ट आहे एकदम, स्टाईल मध्ये असतो अगदी. गॉगल, केसांना जेल, महागडी पर्रफ्युम्स. टाकी भरत आली तसे दिन्याने एकदा माझ्याकडे पाहीले. त्याच्या चेहऱ्यावर ते विकृत हास्य होते. मला फार भिती वाटते त्याच्या त्या स्माईलची. असा काही तो हसत असला म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी काळं-बेरं चालु आहे हे समजावे. टाकी फुल्ल झाली तश्शी त्या पोऱ्याने पंप काढला, झाकण लावले आणि पंप तो जागेवर लावायला वळला. बस्स.. तोच क्षण, दिन्याने गाडीची किल्ली फिरवुन गाडी चालु केली आणि काही क्षणातच आम्ही परत हाय-वे वर होतो..

“दिन्या अरे पेट्रोलचे पैसे.. दिलेच नाहीस तु..” मी म्हणालो..
“अबे छोड बे.. काय त्यात एवढे.. काय करणार आहेत ते? गाडीचा नंबर सुध्दा दिसला नसेल त्या शेंबड्या पोराला.. वाचले ना पैसे आपले.. रात्री मोठ्ठा खंबा मागवु ..” दिन्याने परत गाडीला वेग दिला.

संजु बिच्चारा मागे घाबरुन बसला होता. मला ना, कधी कधी त्याची फार किव येते. माणसाने इतके पण भित्र असु नये.

बऱ्याच वेळ गाडी चालवुन दिन्या आता कंटाळला होता. सुर्य मावळतीला झुकला तशी दिन्याची नजर रहाण्यासाठी ठिकाण शोधु लागली. हाय-वे वरच एक बऱ्यापैकी कळकट, मंद दिवे लागलेले ‘मॉटेल’ बघुन दिन्याने गाडी कडेला घेतली.

“तुम्ही दोघं, माझ्या मागुन या..” असं म्हणुन दिन्या आतमध्ये घुसला.

आतमध्ये एका मोडक्या टेबलावर पेन्सीलीच थोटुक घेउन एक म्हातारं काहीतरी खुरडत बसलं होतं.

“१ रुम प्लिज..” दिन्या त्याच्या खर्जातल्या आवाजात म्हणाला..
त्या म्हाताऱ्याने कष्टाने वर बघीतले.
“किती जणांसाठी?” म्हाताऱ्याचा अशक्त आवाज कसा बसा आमच्या कानांपर्यंत पोहोचला.
“एक..” दिन्या म्हणाला आणि त्याने आमच्याकडे बघुन डोळे मिचकावले.
“७०० रु..” म्हाताऱ्याने काही नं बोलता रुमची किल्ली दिन्याच्या हातात दिली.

“काय हे दिन्या.. त्या म्हाताऱ्याला सुध्दा बनवलेस..? त्याला कळले तर आपण एक नाही तिघं आहोत.. थोडे दिले असतेस जास्ती पैसे तर??” मी म्हणालो.
“छोड बे..त्या म्हाताऱ्याला कुठलं दिसतंय, आणि सकाळी सुर्य उगवायच्या आधीच आपण कल्टी मारु ना..” दिन्या म्हणाला.

म्हाताऱ्याला आम्ही दिसणार नाही याची काळजी घेत मी आणि संजु दिन्याच्या मागोमाग रुममध्ये घुसलो.

फ्रेश झाल्यावर दिन्या म्हणाला इथेच थांबा मी आलोच दोन मिनीटांत.

बाहेरुन गाडीचा आवाज आला. “आता दिन्या कुठे गेला इतक्या रात्रीचा?”, त्याचं ना खरंच काहीच कळत नाही.

मी आणि संजु टी.व्हि. लावुन बघत बसलो.

साधारणं तासाभराने गाडीचा आवाज आला.. ‘दिन्या आला वाटतं परतं!!’ मी स्वतःशीच पुटपुटलो.

थाडकन खोलीचं दार लाथेने उघडत दिन्या आत आला. हातामध्ये मोठ्ठी दारुची बॉटलं.. ज्याला दिन्या खंबा म्हणतो ती अर्धी संपलेल्या अवस्थेत होती. दिन्या लटपटत आत आला आणि त्याच्या मागोमाग एक तोडके कपडे घातलेली एक टंच पोरंगी पण आत आली. दिन्यासारखीच ती पण हेलपांडत होती.

दिन्याने दार लावुन घेतले आणि त्या पोरीला जवळ ओढुन तिचे एक दीर्घ चुंबन घेतले.

“शी..काय हे.. आमच्या समोर??”
म्हणजे ती पोरगी तशी अंगापिंडाने भरलेली होती.. पण म्हणुन कुणाबरोबरही. दिन्याने आमचा टि.व्ही बंद केला, दिवे मालवले आणि डोळ्यानेच आम्हाला तिकडे कोपऱ्यात झोपायची खुण केली.

चंद्राच्या अर्धवट प्रकाशात आणि आवाजांवरुन दिन्याने आणि त्या मुलीने एकमेकांची वस्त्र काढली आहेत याचा आम्हाला अंदाज आला होता. दिन्याने तिला बेड मध्ये ओढले.

मी आणि संजु डोळे आणी कान बंद करुन कोपऱ्यात झोपुन गेलो.

रात्री कोणीतरी मला गदागदा हलवत होते… “अबे.. उठ ना.. लोचा झालाय.. चल आपल्याला सटकायला पाहीजे इथुन..उठा साल्यांनो..”

मोठ्या कष्टाने मी डोळे उघडुन बघीतले.. समोर दिन्या उभा होता.. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर मी भितीची एक छटा पाहीली.

“काय झालं..? इतक्या रात्री कुठे जायचे? आणि ती पोरगी कुठे आहे?”.. मी प्रश्नावर प्रश्न विचारत होतो. एव्हाना संजु पण उठुन बसला होता.

दिन्याने तोंडावर बोटं ठेवुन गप्प रहायची खुण केली. हळुच त्याने खोलीतला बारीक दिवा लावला आणि आम्हाला त्या बेडकडे पहायची खुण केली.

आम्ही आमच्या नजरा बेडकडे वळवल्या.

समोरच्या त्या बेडवर नग्नावस्थेत ती मुलगी पडली होती आणि तिच्या छातीमध्ये दिन्याचा तो लाडका ७” चाकु खुपसलेल्या अवस्थेत होता…

[क्रमशः]

पुढचा भाग>>

जंगल क्विन – ६

भाग-५ पासुन पुढे

रात्रभर सणकुन पडल्यावर पाऊस आता थांबला होता. आकाशात नुकतेच फटफटायला लागले होते. तिघींचा चालण्याचा वेग कमालीचा मंदावला होता. एक तर त्यांना आता ९ तास झाले होते, परत जंगलातला चिखलाने भरलेला रस्ता, कित्तेक ठिकाणी चिखल तुडवत चालताना शरीरातील जास्तीची शक्ती खर्च पडत होती. कित्तेक ठिकाणी जोरदार वाहणारे ओढे असल्याने वेढा घेऊन पुढे जावे लागत होते अर्थात वेळेचा आणि शक्तीचा अधीक अपव्यय. पावसाने अंगातले कपडे ओले झालेले. पण त्याचबरोबर त्यांना आता जपुन चालावे लागत होते. जरा कुठे खुट्ट वाजले तर झुलु तर नसेल या विचाराने झाडी-झुडुपात लपुन रहा मग परत चाला असा द्रविडी प्राणायाम चालु होता. परंतु दुसरा पर्याय नव्हता.

झोपेशिवाय एक रात्र काढल्यावर आता डोळ्यावर झापडं चढायला लागली होती. बरोबरचे मोजकेच पाणी पण संपले होते. शेवटी एका ठिकाणी साठलेले चिखलातले चॉकलेटी रंगाचे पाणी तोंडावर मारुन तात्पुरती का होईना झोप घालवली होती. इतक्या वेळ चालल्यावरही जंगल विरळ व्हायचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. सर्वत्र तितकीच दाट झाडी होती. उलट आजुबाजुचे गवतही उंच आणि दाट झाले होते.

“मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण एक सांगते चालताना जरा बघुन चाला.. एवढं लांब आल्यावर एखाद्या विषारी किडा किंवा सापाच्या चावण्याने आपल्याला आपले आयुष्य गमवायचे नाहीये..” पर्ल म्हणाली.

“ठिक आहे ना.. बघतो आम्ही काय करायचे ते..” नितु वैतागुन म्हणाली.. “काल पासुन बघतोय तुझं आपलं उपदेश देणं चालुच आहे..”

“नितु..ss”, पर्ल

“हो.. नितु म्हणतेय ते बरोबरच आहे. तु काय स्वतःला लिडर वगैरे समजती आहेस का? काल पासुन तुला सहन करतोय आम्ही. असंच करा, तसंच करा..” शमा..

“आम्हाला नाही चालवत आता.. आम्ही इथेच जरावेळ थांबुन विश्रांती घेणार आहोत. अशक्य आहे यापुढे चालत रहाणं. तुला थांबायचे असेल तर तु थांबु शकतेस नाही तर तु एकटी जाउ शकतेस..” नितु..

“ठिक आहे.. तुम्हाला असं वाटते तर..” आपले दोन्ही हात हवेत पसरवत पर्ल म्हणाली.. “पण मला तरी इथे थांबणे धोकादायक वाटते. मी पुढे जात आहे. नशीबात असेल तर पुन्हा भेटु..” असं म्हणुन पर्ल झपझप चालत जंगलात निघुन गेली.

“बरं झालं नितु तु बोललीस ते.. डोक्यात जात होती ती.. जाऊ देत तिला आपण दोघी तर एकत्र आहोत ना!! आपण निघु यातुन सही सलामत बाहेर. सध्यातरी थोडी विश्रांती आवश्यक आहे. चल आपण तिकडे झाडींत जाऊ..” असं म्हणुन नितु आणि शमा आडोश्याला जाऊन फतकलं मारुन खाली बसल्या. चालुन चालुन पायाचे तुकडे पडले होते. पोटऱ्यांना काटेरी झाडं लागुन जागोजागी खरचटले होते. बुटातुन पाय काढुन जमीनीवर ठेवताच मातीचा थंडगार-मऊ स्पर्श दोघींना सुखावुन गेला. अंग बधीर झाले होते. सर्व संवेदना शिथील झाल्या होत्या. एका मोठ्या दगडाला टेकुन दोघीही डोळे मिटुन बसल्या. काही क्षणातच अती-श्रमामुळे दोघींचा डोळा लागला आणि दोघीही गाढ झोपी गेल्या.

************************************************

“बरं झालं मी निघुन आले ते.. त्यांच्या नादाने चालत राहीले असते तरं मरणं ठरलेलचं आहे.” पर्ल स्वतःशीच विचार करत होती. “मॉडेल्स म्हणुन कुठेही नाटकीपणा करायचा? स्वतःचा जीव धोक्यात आहे म्हणल्यावर जरा त्रास सहन नको का करायला? जरा कुठे लागलं, टोचलं की लगेच आपलं आई गं..!! जाऊ देत ना!! इथुन बाहेर पडता आलं म्हणजे झालं.” आपल्याच विचारात मग्न पर्ल चालतं होती.. न थांबता.. न थकता.. कश्याचीही पर्वा न करता.

सुर्य डोक्यावर येऊन हळु-हळु मावळतीकडे झुकला. पर्ल चा सकाळचा तोरा आता कुठल्याकुठे गेला होता. सर्वांग ठणकायला लागले होते. पाय जड झाले होते. एक-एक पाऊल टाकणं मुश्कील झाले होते. पर्लचं लक्ष कोपऱ्यात एका दगडांच्या राशी एकावर एक पडुन तयार झालेल्या कपारीकडे गेले.

“थोड्यावेळ विश्रांती घ्यावी का?”.. पर्लला विश्रांतीची अतीशय गरज भासु लागली होती. “थोडेफार खाऊन परत निघालं तर जास्त चालता येईल.. या अश्या चालण्यात काही अर्थ नाही” पर्ल पाय रखडत-ओढत हळु-हळु त्या कपारीपाशी जाउन बसली. दगडांची एक मोठी खोबण तिथे तयार झाली होती. आतमध्ये बसल्यावर येता-जाता पटकन कुणालाही दिसेल असे ते ठिकाण नक्कीच नव्हते. पर्लच्या दृष्टीने ती जागा विश्रांतीसाठी एकदम सुरक्षीत होती. पर्ल दगडांच्या आडोश्याला शक्य होइल तितक्या आतमध्ये जाऊन टेकुन बसली. बॅगेतील काही पदार्थ खाल्यावर तिला जरा हुशारी वाटली.

“आपण खुपच पुढे आलो आहोत.. झुलु इतक्यात काही इथे पोहोचणार नाहीत… थोड्यावेळ डोळे झाकायला काहीच हरकत नाही..” तिथल्याच मऊशार गवतात डोळे मिटुन पडायचा मोह पर्ल ला आवरत आला नाही आणि क्षणार्धात ती झोपेच्या अधीन झाली.

तिला जाग आली तेंव्हा सर्वत्र दाट काळोख झाला होता. “बापरे कित्ती वेळ झोपलो आपण?” वेळ कळायला काहीच मार्ग नव्हता. हवेत प्रचंड गारठा निर्माण झाला होता. विश्रांतीमुळे शरीर अधीकच जड झालं होतं. पर्लला हलणंही कठीण झालं होतं. पर्लने जवळचे काडी-गवत एकत्र जमवुन पेटवले. त्या आगीत हात-पाय शेकल्यावर पर्लला जरा बरं वाटु लागले. इतक्यात तिच्या डोक्यात काहीतरी चमकले.. “पर्ल हे काय करती आहेस तु? विझवं ती आगं आधी. या काळ्याकुट्ट अंधारात आग/धुर झुलुंच्या कुठुनही नजरेस पडेल”..पर्ल ने पटापट सगळे विझवुन टाकले आणि रात्रीच्या त्या काळोखात दगडांना घट्ट खेटुन ती पडुन राहीली. डोळ्यांवर अजुनही झोपेची झापडं येत होती परंतु आजुबाजुच्या जंगलातुन येणाऱ्या आवाजाने ती दचकुन जागी होतं होती. कुठ्ल्या पक्षांचा आवाज, कधी माकडाचे ओरडणे तर कधी कुठल्या हिंस्त्र पशुची डरकाळी. पर्लच्या अंगाचा थरकाप उडत होता.

“शमा आणि नितुला आपण उगाचच सोडुन एकटे आलो. एकाला दोघं असलं की तितकीच भिती कमी झाली असती..”..इतक्यात जवळच काही पानं दाबली गेल्याचा, काटक्या मोडण्याचा आवाज आला… जवळं.. अगदी जवळं.. काही फुटांवर.. कुणीतरी पर्लच्या दिशेने दबकत-दबकत येत होते. पर्लने हळुच बॅगेत हात घालुन टॉर्च बाहेर काढली आणि अचानक त्याचा प्रकाश समोर फेकला. पर्लपासुन जवळच एक तरस तिच्या वासाने जवळ-जवळ येतं होते. लाईटच्या प्रकाशाने ते दचकले आणि पळुन गेले.

पर्लच्या छातीत धस्स झालं. ती टॉर्च जवळ धरुन बसुन राहीली. तिचे कान आजुबाजुला होणारा प्रत्येक आवाज टिपत होते. तासभर शांताता होती आणि परत तोच दबकत-दबकत चालण्याचा आवाज. आवाज अगदी जवळ आल्यावर पर्लने परत बॅटरीचा प्रकाश फेकला. परत तेच तरस, प्रकाश पडताच घाबरुन पळाले. दोन दिवस उपास-मार झाल्यामुळे ते तरस चेकाळले होते, भुकेने तडपत होते.

पर्लवर अजुनही झोपेचा अंमल होता. थोड्याश्या गुंगीतच ती दगडाला टेकुन बसली होती. एखाद्या भयानक माणसाच्या हसण्यासारख्या आवाजाने ती खडबडुन जागी झाली. थोड्याच दुरीवर ते तरस भुकेने व्याकुळ होऊन ओरडत होते. पर्लचा श्वासोच्छास जोरात चालु होता.

“सध्या जरी इथुन गेले असले तरी ते तरस आहे.. इथेच कुठे तरी बसुन आहे वाट बघत..” पर्ल ने विचार केला. डोळ्यांवर आलेली झापडं काही केल्या जात नव्हती. शेवटी तिने बॅटरी चालुच करुन ठेवली आणि बघता-बघता पुन्हा झोपेच्या आधीन झाली.

तरस.. अतीशय भित्रा प्राणी असतो असं म्हणतात, आणी ते खरं ही आहे. , पण तितकाच क्रुर.. मजबुत जबड्याचा, प्रसंगी एखाद्या माजलेल्या रानगेंड्याच्या पायाचाही लचका तोडु शकेल. भुकेलेले तरस काय किंवा कुठलाही वन्य प्राणी काय, काहीही करु शकतो. ते तरसं लांबुनच पर्लवर नजर ठेवुन होते.

इतके दिवस वापरलेली ती बॅटरी, दोन तास चालु राहील्यानंतर हळु-हळु क्षीण होऊ लागली होती. पर्ल अजुनही गाढ झोपेतच होती. थोड्यावेळातच बॅटरी संपली आणि सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले. तरस अजुनही लांबुन लक्ष ठेवुन होते. अंधार पडल्यावर काही क्षण त्याने वाट पाहीली. पर्लची अजुनही काही हालचाल नव्हती. शेवटी त्या तरसाचा संयम सुटला. दबकत दबकत ते जागचे हालले. समोरच्या प्राण्याकडुन आपल्याला फारसा धोका नाही हे त्या तरसाला समजुन चुकले होते. हळु-हळु अंदाज घेत ते तरस पर्लच्या अगदी जवळ येऊन पोहोचले.

पर्लची झोप मोडली ती अतीशय जोरदार टोकेरी वस्तु पायात घुसल्याच्या भावनेने. ती कळ तिच्या सर्वांगातुन विजेच्या वेगाने पोहोचली. तिने पायाकडे पाहीले आणि जिथे तिचा डावा तळपाय होता तिथे आता फक्त एक रक्ताचे डबके उरले होते. काही अंतरावरुनच कुणाचा तरी खाण्याचा आवाज येत होता. पर्ल दुःखाने आणि भितीने जोर-जोरात मदतीसाठी हाका मारु लागली.

दिस जंगल इज हंग्री…” सोरेन म्हणाला होता.

रक्ताचा वास जंगलात पसरायला वेळ लागत नाही. काही क्षणातच तिथे अजुन ३-४ तरसं जमा झाली. पहिल्यांदा त्यांची त्यांच्यातच पर्लच्या तुकड्यावरुन भांडणं झाली, पण लवकरचं असं मासं अजुनही कुठेतरी आहे हे कळायला त्यांच्या तिक्ष्ण नाकाला फार वेळ लागला नाही. पर्ल ला शेवटची वेदना जाणवली ती गळ्यामध्ये एखादी धारदार वस्तु घुसल्याची…

*************************************************

नितु आणि शमा कित्ती वेळ झोपल्या होत्या त्यांनाच माहीत. खरं तर त्या झोपल्या होत्या म्हणण्यापेक्षा त्यांची शुध्द हरपली होती म्हणणे जास्त योग्य ठरेल. जागं आली तेंव्हा सर्वत्र काळा-कुट्ट काळोख होता. दोघींना पहिल्यांदा आपणं कुठे आहोत हेच लक्षात येईना. मग मात्र दोघींच्या पोटात गोळा आला. आपण इथे कित्ती वेळ वाया घालवला याची काहीच जाणीव होईना. ‘झुलु कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील’ याची जाणीव दोघींना प्रकर्षाने होतं होती.

“नितु, आपणं पर्ल बरोबर जायला हवं होतं का गं? कुठे असेल आत्ता ती? कित्तीतरी दुर गेली असेल.. कदाचीत,.. कदाचीत जंगलाच्या बाहेरही पडली असेल.. सुरक्षीत..” शमा

“जाऊ देत.. चल तु आपण चालायला लागु… आता अधीक वेळ घालवण्यात काही अर्थ नाही..” नितु म्हणाली.

“खरं आहे गं.. पण चालणं अशक्य वाटते आहे. मांड्यांमध्ये, पोटऱ्यांमध्ये गोळे आले आहेत. एक काम करतेस का प्लिज? एखादी आधाराला काठी मिळाली तर बघ ना माझ्यासाठी निदान त्याच्या सहाय्याने तरी चालता येईल..” शमा..

“ओ.के.. तु इथेच थांब मी शोधते काही सापडेत का? या अंधारात शोधणे म्हणजे कठीणच काम आहे” असं म्हणुन ती टॉर्च घेउन बाजुच्या झाडीत गेली.

शमाने अंग ताणुन एक आळस दिला आणि ती निघण्याची तयारी करु लागली. बॅग उचलताना तिचं लक्ष बॅगेला लागलेल्या एका छोट्या बटनासारख्या वस्तुकडे गेले. “काय आहे हे? मी तर नाही लावलेले..” त्याच्यामध्ये एक बारीकसा लाल दिवा लुकलुकत होता… “कॅमेरा?” हा कॅमेरा तर नाही?.. म्हणजे ह्यांना सतत लाईव्ह-फिड मिळत रहातील त्यांच्या शो’मध्ये दाखवायला.. आणि.. आणि.. आपण कुठे आहोत हे सुध्दा….”

शमाच्या चेहऱ्यावरुन घामाची एक रेघ कोसळली. नितुला हाक मारण्यासाठी तिने तोंड उघडले पण तिची हाक तोंडातल्या तोंडातच राहीली. चेहऱ्यावर पडणारा चंद्राचा प्रकाश ४ काळ्याभिन्न आकृत्यांमुळे झाकला गेला होता. तिच्या समोर ४ झुलु हातामध्ये भाला रोखुन उभे होते. चंद्राच्या चांदण्यात चंदेरी भासणारी ती भाल्यांची टोकं पुढच्या क्षणी शमाच्या रक्ताने लालबुंद झाली होती. ज्या चपळाईने आणि सावधानतेने ते झुलु अचानक अंधारातुन आले होते त्याच चपळाईने ते तेथुन इतर दोघींचा शोध घेण्यासाठी पुढे अंधारात अढ्रुश्य झाले.

नितु हातामध्ये एक मोठ्ठी काठी घेउन जंगल-झाडीतुन बाहेर आली आणि समोरचे दृश्य बघुन ती जागच्या जागी खिळुन राहीली. समोर शमाचा छिन्न-विछीन्न झालेला देह पडला होता. काही क्षणांपुर्वी आपल्याशी बोलणारी शमा काळाच्या पडद्याआड नाहीशी झाली होती. मृत्यु नितुला थोडक्यात हुलकावणी देऊन गेला होता. डबडबलेल्या डोळ्यांनी ती शमापाशी आली. इथे जास्ती वेळ थांबुन वेळ घालवणं शक्य नव्हतं. झुलुंची फौज आधीच इथे येउन धडकली होती. तिने आपली बॅग उचलण्यासाठी हात पुढे गेला आणि तिचे लक्ष शमाच्या हाताकडे गेले. शमाच्या हातामध्ये एक छोटे लुकलुकणारे बटन होते. शमाने मरण्यापुर्वी ते बट्ण नितुला दिसावे अश्याप्रकारे काढुन घेतले होते.

क्षणात नितुच्या डोक्यात प्रकाश पडला. याचा अर्थ त्यांच्यावर सतत कोणीतरी नजर ठेवुन होते. “शमाकडे असा कॅमेरा आहे याचा अर्थ माझ्याकडे ही कुठेतरी असणार..” नितुने हळुवारणे आपल्या वस्तु तपासल्या आणि तिच्या बॅगेला ही लावलेले तस्सेच एक बट्ण तिला सापडले.
तिने हळुवर आपली बॅग उघडली त्यातुन आपले हिरे काढुन घेतले. मग तिने शमाची बॅग उघडली आणि तिचे हिरेही काढुन घेतले. आणि चपळाईने ती जंगलात दिसेनाशी झाली. जाताना आपली बॅग बरोबर न घेण्याचा शहाणपणा तिने दाखवला.

रोझिबेलला शमा आणि पर्ल चा मृत्यु आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसला होता.. पण नितु? ती कुठे होती? तिचा कॅमेराही आहे तेच ठिकाण दाखवत होता. काहीच हालचाल नव्हती. रोझीबेल संतापाने लाल-भडक झाल्या होत्या.

***************************************************

नितुच्या डोळ्यातुन पाण्याच्या धारा वाहत होत्या. एकटीच डोळे पुसत-पुसत ती त्या घनदाट अरण्यातुन चालत होती. कश्याचीही पर्वा नं करता. दुसरा दिवस उजाडु लागला होता. नितुने जगण्याची आश्या सोडुन दिली होती. जवळपास खाण्यासारखे ही काही नव्हते. पण नशीब कसे साथ देते पहा ना.. काही अंतर चालल्यावर तिला ‘पर्ल’ सापडली..तिकड्या-तुकड्यात विभागलेली. तरसांच्या झुंडीने फज्जा उडवलेली. आणि त्याशेजारीच सापडली पर्लची बॅग. नितुने काळजीपुर्वक ती बॅग न्हाहाळली. तरसांच्या मारामारीत बॅगेला लावलेला कॅमेरा फुटला नितुने बॅग उघडली. आतमध्ये काही सॅंन्ड्विचेस आणि ४-५ जंगली फळांनी होती. हिऱ्यांची पिशवी होती. नितुने सॅंन्ड्विचेस अधाश्यासारखी पोटात ढकलली. आज नितुकडे हिऱ्यांचे तिनही हिस्से होते.. खऱ्या अर्थाने तीच होती… “जंगल क्विन”

मृत्युने दोनदा नितुला हुलकावणी दिली होती. ती पर्ल बरोबर गेली असती तर आज तिथे नितुचाही असाच रक्ता-मासाचा चिखलं झाला असता. नशीबाचा कौल मिळालेल्या नितुला नंतर २ दिवस अथक चालल्यानंतर जंगलाबाहेर पडण्यात यश मिळाले. जंगली प्राण्यांची डॉक्युमेंटरी बनवायला आलेल्या एका पथकाने तिला बेशुध्दाअवस्थेत इस्पीतळात भरती केले.

नितुने डोळे उघडले. आपण जिवंतावस्थेत, सुखरुप आहोत यावर तिचा विश्वासच बसेना. तिने आपल्या खिश्यामध्ये हात घातला आणि हाताला हिऱ्यांची ती पुरचुंडी लागली. ते हिरे तर तिच्या आयुष्याची एक पुंजी होतेच, पण त्याचबरोबर गेले काही आठवडे घालवलेले ते भयानक दिवसही तिच्या सोबत रहाणार होते.. शेवटापर्यंत.. नितुच्या.. जंगल क्विनच्या..

[समाप्त]